महाराष्ट्रामधील जिल्हे

महाराष्ट्र
(महाराष्ट्रातील जिल्ह्यांची यादी या पानावरून पुनर्निर्देशित)

महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे.[१] राज्याचे भौगोलिकदृष्ट्या ५ प्रमुख प्रदेश होतात विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. क्षेत्रफळाचे दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर हा सर्वात मोठा तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ही १०० टक्के शहरी जिल्हे असल्यामुळे त्या जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही. महाराष्ट्रात ३६ जिल्हे असले तरी एकूण जिल्हा परिषद ३४ आहेत.

महाराष्ट्रातील जिल्हे विभागानुसार

इतिहास

  • १८१८ मध्ये बॉम्बे स्टेट मध्ये महाराष्ट्रातील खान्देश, नासिक, पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्‍नागिरी, अलिबाग आणि बॉम्बे हे १० जिल्हे होते
  • १९०६ मध्ये खान्देश जिल्ह्याचे विभाजन करून धुळे व जळगाव हे दोन जिल्हे बनविण्यात आले
  • राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ नुसार कच्छ, बडोदा ही संस्थाने व सौराष्ट्र राज्य हा गुजराती भाषिक प्रदेश, तसेच हैद्राबाद संस्थानमध्य प्रांत आणि वऱ्हाड ह्या भागातील मराठी भाषिक प्रदेश पूर्वीच्या मुंबई राज्याला जोडून द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली होती. १ मे १९६० रोजी द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन करून मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र तर गुजराती भाषिकांसाठी गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली.
  • महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्रात १) ठाणे, २) कुलाबा, ३) रत्‍नागिरी, ४) बृहन्मुंबई, ५) नाशिक, ६) धुळे, ७) पुणे, ८) सांगली, ९) सातारा, १०) कोल्हापूर, ११) सोलापूर, १२) औरंगाबाद, १३) बीड, १४) धाराशिव, १५) परभणी, १६) नांदेड, १७) बुलढाणा, १८) अहिल्यादेवीनगर, १९) अकोला, २०) अमरावती, २१) नागपूर, २२) वर्धा, २३) यवतमाळ, २४) जळगाव, २५) भंडारा आणि २६) चांदा ही २६ जिल्हे होती.[२][३] सन १९६४ मध्ये चांदा शहराचे नाव बदलून चंद्रपूर करण्यात आले.[४]
  • १ मे १९८१ रोजी अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना रत्‍नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे विभाजन करून जालना या दोन नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली.[५][६]
  • बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना, १६ ऑगस्ट १९८२ ला धाराशिव जिल्ह्याचे विभाजन करून लातूर तर २६ ऑगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली या दोन नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली.[७][८]
  • १ ऑक्टोबर १९९० रोजी शरद पवार मुख्यमंत्री असताना, मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई शहर व मुंबई उपनगर ही जिल्हे तयार झाली.[९]
  • १९९५ मध्ये राज्यात शिवसेनेचे सरकार आल्यानंतर बॉम्बे शहराचे नाव बदलून मुंबई असे करण्यात आले.[१०]
  • १ जुलै १९९८ रोजी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना, धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार व अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम या दोन नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.[११]
  • १ मे १९९९ रोजी नारायण राणे मुख्यमंत्री असताना परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली व भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.[१२]
  • १ ऑगस्ट २०१४ रोजी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.[१३] पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे झाले.

प्रदेश आणि विभाग

भौगोलिक प्रदेश

भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राचे पाच प्रदेशांमध्ये विभाजन केले जाते.

विभाग

महाराष्ट्र राज्याची सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे.[१] विभागानुसार जिल्ह्यांची यादी खाली दिली आहे.

अनुक्रमविभागाचे नावमुख्यालयक्षेत्रजिल्ह्यांची संख्याजिल्हेसर्वात मोठे शहर
अमरावती विभागअमरावतीविदर्भअकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिमअमरावती
छत्रपती संभाजीनगर विभागछत्रपती संभाजीनगरमराठवाडाछत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणीछत्रपती संभाजीनगर
कोकण विभागमुंबईकोकण

मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग

मुंबई
नागपूर विभागनागपूरविदर्भ

नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

नागपूर
नाशिक विभागनाशिकखान्देश

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर

नाशिक
पुणे विभागपुणेपश्चिम महाराष्ट्रपुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरपुणे

जिल्ह्यांची यादी

खालील तक्त्यामध्ये सर्व ३६ जिल्ह्यांचे क्षेत्रफळ व त्यांची लोकसंख्या व संबंधीत माहिती दिली आहे. लोकसंख्येची आकडेवारी २०११ च्या जनगणनेनुसार आहे.[१४][१५][१६] साक्षरता दर हा ० ते ६ या वयोगटातील लहान मुलांना वगळून आहे. म्हणजेच, साक्षरता दर = एकूण साक्षर / (एकूण लोकसंख्या - ० ते ६ वयोगटातील लोकसंख्या)

क्र.नावकोडस्थापनामुख्यालयक्षेत्रफळ (किमी)लोकसंख्या (२०११)राज्याच्या लोकसंख्येच्या (%)घनता (/किमी)शहरी लोकसंख्या(%)साक्षरता दर (%)लिंग गुणोत्तरतालुकेअधिकृत संकेतस्थळ
अकोलाAKमे १९६०अकोला५,६७६१८,१३,९०६१.६१%३२०३९.६८%८८.०५%९४६जिल्हा संकेतस्थळ
अमरावतीAMमे १९६०अमरावती१२,२१०२८,८८,४४५२.५७%२३७३५.९१%८७.३८%९५११४जिल्हा संकेतस्थळ
पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरAHमे १९६०पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर१७,०४८४५,४३,१५९४.०४%२६६२०.०९%७९.०५%९३९१४जिल्हा संकेतस्थळ
धाराशिवDSमे १९६०धाराशिव७,५६९१६,५७,५७६१.४८%२१९१६.९६%७८.४४%९२४जिल्हा संकेतस्थळ
छत्रपती संभाजीनगरCSमे १९६०औरंगाबाद१०,१०७३७,०१,२८२३.२९%३६६४३.७७%७९.०२%९२३जिल्हा संकेतस्थळ
कोल्हापूरKOमे १९६०कोल्हापूर७,६८५३८,७६,००१३.४५%५०४३१.७३%८१.५१%९५७१२जिल्हा संकेतस्थळ
गडचिरोलीGA२६ ऑगस्ट १९८२गडचिरोली१४,४१२१०,७२,९४२०.९५%७४११.००%७४.३६%९८२१२जिल्हा संकेतस्थळ
गोंदियाGOमे १९९९गोंदिया५,२३४१३,२२,५०७१.१८%२५३१७.०८%८४.९५%९९९जिल्हा संकेतस्थळ
चंद्रपूरCHमे १९६०चंद्रपूर११,४४३२२,०४,३०७१.९६%१९३३५.१८%८०.०१%९६११५जिल्हा संकेतस्थळ
१०जळगावJGमे १९६०जळगाव११,७६५४२,२९,९१७३.७६%३६०३१.७४%७८.२०%९२५१५जिल्हा संकेतस्थळ
११जालनाJNमे १९८१जालना७,७१८१९,५९,०४६१.७४%२५४१९.२७%७१.५२%९३७जिल्हा संकेतस्थळ
१२ठाणे [१७]THमे १९६०ठाणे४,२१४८०,७०,०३२७.१८%१९१५८६.१६%८७.२३%८७०जिल्हा संकेतस्थळ
१३धुळेDHमे१९६०धुळे७,१९५२०,५०,८६२१.८३%२८५२७.८४%७२.८०%९४६जिल्हा संकेतस्थळ
१४नंदुरबारNBजुलै १९९८नंदुरबार५,९५५१६,४८,२९५१.४७%२७७१६.७१%६४.३८%९७८जिल्हा संकेतस्थळ
१५नांदेडNDमे १९६०नांदेड१०,५२८३३,६१,२९२२.९९%३१९२७.१९%७५.४५%९४३१६जिल्हा संकेतस्थळ
१६नागपूरNGमे १९६०नागपूर९,८९२४६,५३,५७०४.१४%४७०६८.३१%८८.३९%९५११४जिल्हा संकेतस्थळ
१७नाशिकNSमे १९६०नाशिक१५,५३०६१,०७,१८७५.४३%३९३४२.५३%८२.३१%९३४१५जिल्हा संकेतस्थळ
१८परभणीPBमे १९६०परभणी६,२१४१८,३६,०८६१.६३%२९५३१.०३%७३.३४%९४७जिल्हा संकेतस्थळ
१९पालघर [१७]PLऑगस्ट २०१४पालघर५,३४४२९,९०,११६२.६६%५६०५२.२१%७७.०४%९३६जिल्हा संकेतस्थळ
२०पुणेPUमे १९६०पुणे१५,६४३९४,२९,४०८८.३९%६०३६०.९९%८६.१५%९१५१४जिल्हा संकेतस्थळ
२१बीडBIमे १९६०बीड१०,६९३२५,८५,०४९२.३०%२४२१९.९०%७६.९९%९१६११जिल्हा संकेतस्थळ
२२बुलढाणाBUमे १९६०बुलढाणा९,६६१२५,८६,२५८२.३०%२६८२१.२२%८३.४०%९३४१३जिल्हा संकेतस्थळ
२३भंडाराBHमे १९६०भंडारा४,०८७१२,००,३३४१.०७%२९४१९.४८%८३.७६%९८२जिल्हा संकेतस्थळ
२४मुंबई उपनगरMUऑक्टोबर १९९०वांद्रे४४६९३,५६,९६२८.३३%२०९८०१००.००%८९.९१%८६०जिल्हा संकेतस्थळ
२५मुंबई शहरMCमे १९६०१५७३०,८५,४११२.७५%१९६५२१००.००%८९.२१%८३२जिल्हा संकेतस्थळ
२६यवतमाळYTLमे १९६०यवतमाळ१३,५८२२७,७२,३४८२.४७%२०४२१.५८%८२.८२%९५२१६जिल्हा संकेतस्थळ
२७रत्‍नागिरीRTमे १९६०रत्‍नागिरी८,२०८१६,१५,०६९१.४४%१९७१६.३३%८२.१८%११२२जिल्हा संकेतस्थळ
२८रायगडRGमे १९६०अलिबाग७,१५२२६,३४,२००२.३४%३६८३६.८३%८३.१४%९५९१५जिल्हा संकेतस्थळ
२९लातूरLA१६ ऑगस्ट १९८२लातूर७,१५७२४,५४,१९६२.१८%३४३२५.४७%७७.२६%९२८१०जिल्हा संकेतस्थळ
३०वर्धाWRमे १९६०वर्धा६,३०९१३,००,७७४१.१६%२०६३२.५४%८६.९९%९४६जिल्हा संकेतस्थळ
३१वाशिमWSजुलै १९९८वाशिम४,८९८११,९७,१६०१.०७%२४४१७.६६%८३.२५%९३०जिल्हा संकेतस्थळ
३२सांगलीSNमे १९६०सांगली८,५७२२८,२२,१४३२.५१%३२९२५.४९%८१.४८%९६६१०जिल्हा संकेतस्थळ
३३साताराSTमे १९६०सातारा१०,४८०३०,०३,७४१२.६७%२८७१८.९९%८२.८७%९८८११जिल्हा संकेतस्थळ
३४सिंधुदुर्गSIमे १९८१सिंधुदुर्गनगरी (ओरस बुद्रूक)५,२०७८,४९,६५१०.७६%१६३१२.५९%८५.५६%१०३६जिल्हा संकेतस्थळ
३५सोलापूरSOमे १९६०सोलापूर१४,८९५४३,१७,७५६३.८४%२९०३२.४०%७७.०२%९३८११जिल्हा संकेतस्थळ
३६हिंगोलीHIमे १९९९हिंगोली४,८२७११,७७,३४५१.०५%२४४१५.१८%७८.१७%९४२जिल्हा संकेतस्थळ
-महाराष्ट्र--मुंबई३,०७,७१३११,२३,७४,३३३१००%३६५४५.२२%८२.३४%९२९३५८-

हे देखील पहा

संदर्भ

बाह्य दुवे