Jump to content
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तीर्थ या शब्दाचे पुढे दिल्याप्रमाणे अनेक अर्थ जैन ग्रंथात आढळतात : (१) धर्म, (२) संसारसागराच्या पैलतीरावरील मोक्षमंदिराकडे नेणारा पाण्याचा उतार व बंदर, (३) जैन साधू, साध्वी, श्रावक, श्राविका यांचा संघ, (४) जैनांचे १२ अंगग्रंथ इत्यादी. या अर्थांवरून तीर्थंकर म्हणजे धर्माध्यक्ष, जैन संघप्रमुख, मोक्षमार्ग दाखविणारा असे या संज्ञेचे अर्थ होतात. तीर्थंकरालाच ‘जिन’ म्हणजे इंद्रिये जिंकणारा, ‘अर्हत्’, सर्वज्ञ, वीतराग, केवली म्हणजे केवलज्ञानी अशी नावे दिलेली आहेत. जिन शब्दावरूनच या धर्माच्या अनुयायांना ‘जैन’ असे नाव पडले.

२४ तीर्थंकरांचे नाव आणि त्यांची चिन्हे:

* श्री ऋषभनाथ भगवान- बैल*  श्री अजितनाथ भगवान - हात्ती*  श्री संभवनाथ भगवान- घोडा*  श्री अभिनंदननाथ भगवान - माकड*  श्री सुमतिनाथ भगवान - चकवा*  श्री पद्मप्रभु भगवान- कमळ*  श्री सुपार्श्वनाथ भगवान - स्वास्तिक*  श्री चन्द्रप्रभु भगवान - चंद्र*  श्री पुष्पदंत भगवान- मगर*  श्री शीतलनाथ भगवान- कल्पवृक्ष*  श्री श्रेयांसनाथ भगवान - गैंडा*  श्री वासुपूज्य भगवान- म्हैस*  श्री विमलनाथ भगवान - शूकर*  श्री अनंतनाथ भगवान- सेही*  श्री धर्मनाथ भगवान - वज्र*  श्री शांतिनाथ भगवान- हिरण*  श्री कुंथुनाथभगवान- बकरी*  श्री अरहनाथ भगवन- मासा*  श्री मल्लिनाथ भगवान- कळस*  श्री मुनिस्रुव्रतनाथ भगवान - कासव*  श्री नमिनाथ भगवान- नीलकमल*  श्री नेमिनाथ भगवान- शंख*  श्री पार्श्वनाथ भगवान - साप*  श्री महावीर भगवान- सिंह
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन