Jump to content

नोलिनी कांत गुप्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नोलिनी कांत गुप्ता

नोलिनी कांत गुप्ता (१३ जानेवारी १८८९ - ७ फेब्रुवारी १९८४) हे एक क्रांतिकारी, भाषाशास्त्रज्ञ, विद्वान, समीक्षक, कवी, तत्त्वज्ञ आणि योगी आणि श्रीअरविंदांच्या शिष्यांपैकी सर्वात ज्येष्ठ होते.

प्रारंभिक जीवन

त्यांचा जन्म पूर्व बंगालमधील फरीदपूर येथे एका सुसंस्कृत आणि संपन्न वैद्य-ब्राह्मण कुटुंबात झाला. किशोरवयात असताना त्यांच्यावर ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या प्रसिद्ध क्रांतिकारक श्रीअरविंद घोष यांचा प्रभाव पडला.

क्रांतिकार्यात सहभाग

बारीन्द्र कुमार घोष यांच्या एका लहान क्रांतिकारक गटात सामील होण्यासाठी [१], त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज, कलकत्ता येथे चौथ्या वर्षात शिकत असताना, एक आश्वासक शैक्षणिक कारकीर्द सोडली. तसेच एक आकर्षक सरकारी नोकरी नाकारली.

मे १९०८ मध्ये अलीपूर बॉम्ब खटल्यात कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये त्यांचा समावेश होता. एक वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.[२]

वैवाहिक जीवन

श्रीअरविंद आश्रमात नऊ वर्षांच्या वास्तव्यानंतर ते बंगालमध्ये परतले आणि डिसेंबर १९१९ मध्ये त्यांनी विवाह केला.[१]

लेखन व संपादन

त्यांनी १९०९ आणि १९१० मध्ये 'धर्म' आणि 'कर्मयोगिन' या श्रीअरविंदांच्या दोन राष्ट्रवादी वृत्तपत्रांसाठी 'उपसंपादक' म्हणून काम केले. त्यांना ग्रीक, लॅटिन, फ्रेंच आणि इटालियन या भाषा श्रीअरविंदांनीच शिकविल्या होत्या.[३]

विविध विषयांवर लेखन करणारे लेखक म्हणून ते परिचित आहेत. त्यांनी एकूण ६० पुस्तके लिहिली आहेत. त्यात सुमारे १६ इंग्रजी आणि ४४ बंगाली भाषेत आहेत. तसेच इंग्रजी, बंगाली आणि फ्रेंच भाषेत अनेक लेख आणि कविता प्रकाशित झालेल्या आहेत.

श्रीअरविंद आश्रम

१९१० मध्ये पाँडिचेरी येथे श्रीअरविंदांसोबत आलेल्या चार शिष्यांपैकी ते एक होते. [२] १९२६ मध्ये जेव्हा श्रीअरविंद आश्रमाची स्थापना झाली, तेव्हा ते पाँडिचेरी येथे कायमचे स्थायिक झाले. श्रीअरविंदआश्रमाचे सचिव म्हणून [१] आणि नंतर त्याचे विश्वस्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. श्रीअरविंद यांच्याकडे साधकांकडून येणाऱ्या पत्रांचा एवढा ओघ असे की त्यातील बऱ्याच पत्रांना उत्तरे लिहिण्याचे काम नोलिनी यांच्याकडे सोपविण्यात येत असे. श्रीअरविंद यांच्या निर्देशानुसार ते पत्र लिहीत असत. [१]

निधन

नोलिनी कांता गुप्ता यांचे ७ फेब्रुवारी १९८४ रोजी श्रीअरविंद आश्रमात निधन झाले.

ग्रंथसंपदा

  • कलेक्टेड वर्क्स ऑफ नोलिनी कांता गुप्ता (८ खंड), श्रीअरविंद आश्रम, पाँडिचेरी
  • १. द कमिंग रेस
  • २. एसेज ऑन पोएट्री अँड मिस्टीसिझम
  • ३. द योग ऑफ श्रीअरबिंदो
  • ४-५. लाईट ऑफ लाईट्स (कविता)
  • ६-७.स्वीट मदर
  • ८. वैदिक स्तोत्रे

अन्य ग्रंथसंपदा

  • आठवणी (के. अमृतासोबत)
  • एव्होल्युशन अँड द अर्थली डेस्टिनी
  • अबाउट वुमन (संकलन, 'साकार' द्वारे संपादन)
  • ट्रिब्युट टू नोलिनी कांत गुप्ता - संपादक निरोदबरन
  • नोलिनी: अर्जुन ऑफ अवर एज - डॉ. व्हीएम रेड्डी
  • लाईट्स फ्रॉम नोलिनी कांता गुप्ता

संदर्भ-सूची

०१ Sri Aurobindo - A biography and a history by K.R.Srinivasa Iyengar, Published by Sri Aurobindo International Centre of Education, Pondicherry, ISBN 81-7058-813-8

बाह्य दुवे

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन