Jump to content

राहुल देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


राहुल देशपांडे

राहुल देशपांडे गायन करताना (मार्च, २०११)
आयुष्य
जन्म१० ऑक्टोबर, इ.स. १९७९
जन्म स्थानपुणे, महाराष्ट्र,भारत
व्यक्तिगत माहिती
धर्महिंदू
नागरिकत्वभारतीय
देशभारत ध्वज भारत
भाषामराठी
पारिवारिक माहिती
जोडीदारनेहा देशपांडे
अपत्येरेणुका देशपांडे
संगीत साधना
गुरूउषा चिपलकट्टी, मुकुल शिवपुत्र, गंगाधरबुवा पिंपळखरे, मधुसूदन पटवर्धन
गायन प्रकारहिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
नाट्यसंगीत
अभंग
संगीत कारकीर्द
पेशागायकी व संगीतकार
कार्य संस्थावसंतराव देशपांडे प्रतिष्ठान
गौरव
पुरस्कारराष्ट्रीय पुरस्कार विजेते
बाह्य दुवे
[www.rahuldespande.com संकेतस्थळ]

राहुल देशपांडे (१० ऑक्टोबर, इ.स. १९७९; पुणे, महाराष्ट्र - हयात) लोकप्रिय हिंदुस्तानी संगीतातील गायक आहेत. त्यांनी सुरू केलेला वसंतोत्सव हा भारतातील एक मोठा संगीतोत्सव समजला जातो. हिंदुस्तानी संगीतातील गायक वसंतराव देशपांडे त्यांचे आजोबा होते. त्यांनी हिंदुस्तानी शैलीतील गायनाचे प्रशिक्षण उषा चिपलकट्टी, मुकुल शिवपुत्र, गंगाधरबुवा पिंपळखरे, मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे घेतले.

राहुल देशपांडे यांना दूरचित्रवाणीवरील सूर-ताल आणि नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमांतून अफाट प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या संगीताच्या मैफिली ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, अमेरिका आणि इंग्लंडमध्येही झाल्या आहेत.

देशपांडे यांनी संगीत मानापमान या संगीतनाटकाचे पुनरुज्जीवन केले. तसेच त्यांनी कट्यार काळजात घुसली या नाटकामध्ये केलेले खाँसाहेब प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात.

तसेच "राहुल देशपांडे" यांनी "मी वसंतराव" हा त्यांच्या आजोबांच्या आयुष्याचा प्रवास उलगडणारा चित्रपटांमधे वसंतराव यांची भूमिका केली. त्या चित्रपटाचे संगीत देखील त्यांनी केले. हा संगीतकार म्हणून त्यांचा पहिला चित्रपट आहे परंतु त्यांनी खूप जास्त समर्पक संगीत केले आहे. त्यासाठी त्यांच्या या चित्रपटाला जवळपास "सहा" पुरस्कार मिळाले व राहुल देशपांडे यांना "राष्ट्रीय" पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुरस्कार

  • रसिकाग्रणी दत्तोपंत देशपांडे पुरस्कार
  • सुधीर फडके पुरस्कार
  • स्वरानंद प्रतिष्ठान चा २००८सालचा माणिक वर्मा पुरस्कार

संदर्भ


🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन