अपूर्वाई (पुस्तक)

अपूर्वाई हे पु. ल. देशपांडे यांनी मराठी भाषेत लिहिलेले प्रवासवर्णनपर पुस्तक आहे. इ.स. १९६० साली हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झाले.

अपूर्वाई
लेखकपु. ल. देशपांडे
भाषामराठी
साहित्य प्रकारप्रवासवर्णन
प्रकाशन संस्थाश्रीविद्या प्रकाशन
प्रथमावृत्तीइ.स. १९६०
मुखपृष्ठकारदीनानाथ दलाल
पुस्तकातील चित्रांचे चित्रकारशि. द. फडणीस
पृष्ठसंख्या२५०

त्यांनी केलेल्या इंग्लंड, स्कॉटलंड, फ्रान्सजर्मनी या देशांतल्या भ्रमंतीवर आधारित प्रवासवर्णन आहे. बी.बी.सी. संस्थेतर्फे आयोजलेल्या दूरचित्रवाणी क्षेत्रातल्या अभ्यासक्रमानिमित्त पु.ल.देशपांडे हे पत्नी सुनीता देशपांडे यांच्यासमवेत इंग्लंडात गेले होते. तेथील अभ्यासक्रम आटोपल्यानंतर त्यांनी नाताळाच्या सुटीत जर्मनीस भेट दिली. जर्मनीहून त्यांनी पुढे दूरचित्रवाणी क्षेत्राशी निगडित पुढील अभ्यासानिमित्त पॅरिसास प्रयाण केले. तेथील त्यांचे वास्तव्य २ महिन्यांचे होते.

या प्रवासाला निघण्याआधी केलेल्या तयारीचे, कागदपत्रे प्राप्त करण्याचे, वैद्यकीय सोपस्कार पूर्ण करायचे विविध प्रसंग पु.ल.देशपांडे विनोदी शैलीत मांडतात. प्रवासात भेटलेल्या, ओळख झालेल्या माणसांचे वर्णन यात येते. लंडन, एडिंबरा, पॅरिस इत्यादी शहरांतल्या वास्तव्यात त्यांनी अनुभवलेल्या स्थानिक नाटके, गायनवादनादि कार्यक्रमांबद्दल त्यांनी लिहिले आहे. तसेच, या विविध देशांतील सांस्कृतिक पैलूदेखील पुस्तकात विविध प्रसंगांतून दृग्गोचर होतात.

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन