अशोक जैन

अशोक चंदनमल जैन (जन्म : घोडेगाव, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत, ११ एप्रिल १९४४; - मुंबई, १८ फेब्रुवारी २०१४) हे एक मराठी पत्रकार व लेखक होते. ते काही काळ महाराष्ट्र टाइम्स या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक होते.[ संदर्भ हवा ]

अशोक जैन
जन्म नावअशोक चंदनमल जैन
जन्म११ एप्रिल, इ.स. १९४४
घोडेगाव, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत
मृत्यू१८ फेब्रुवारी, इ.स. २०१४
मुंबई, महाराष्ट्र
कार्यक्षेत्रपत्रकारिता, साहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारअनुवाद
प्रसिद्ध साहित्यकृतीराजधानीतून, कानोकानी
पत्नीसुनीति अशोक जैन

आरंभिक जीवन

अशोक जैन यांचा जन्म ११ एप्रिल, इ.स. १९४४ रोजी पुण्याजवळील घोडेगाव येथे झाला [१].

पत्रकारिता आणि साहित्यिक कारकीर्द

इ.स. १९६४ साली जैन यांनी बी.ए.ची पदवी मिळवली [२]. महाविद्यलयात असतानाच त्यांनी पुण्यातील दैनिक सकाळमधून पत्रकारितेचे धडे गिरवायला सुरुवात केली. पुढे पुण्यातील दैनिक तरुण भारतमध्ये काम केल्यानंतर ते केसरीमध्ये रुजू झाले [२]. इ.स. १९६६ साली अशोक जैन यांनी मुंबईला स्थलांतर करून महाराष्ट्र टाइम्समध्ये काम मिळविले.

मुंबईत १२ वर्षे काम केल्यावर अशोक जैन हे महाराष्ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी म्हणून दिल्लीला गेले. इ.स. १९७८ ते इ.स. १९८९ या काळात त्यांनी दिल्लीहून 'राजधानीतून' या नावाने साप्ताहिक वार्तापत्रे लिहिली. जैन यांची चौफेर दृष्टी, विचक्षणपणा, आणि त्यांच्या खेळकर शैलीने ही वार्तापत्रे चांगलीच गाजली. इ.स. १९८९ साली महाराष्ट्र टाइम्सचे सहसंपादक झाल्यावर मटाच्या 'मैफल' या साप्ताहिक पुरवणीची जबाबदारी अशोक जैन यांना देण्यात आली. विषयवैविध्य आणि नावीन्य यांमुळे या पुरवणीला त्यांच्या काळात प्रतिष्ठा मिळाली. अशोक जैन पुढे महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहसंपादक आणि कार्यकारी संपादकही [१] झाले.

अशोक जैन यांनी कलंदर या टोपणनावाने 'कानोकानी' हे राजकीय-सामाजिक-साहित्यिक-सांस्कृतिक घटना-घडामोडींवर मिश्कील टिप्पणी करणारे सदर लिहायला सुरुवात केली. पुढे 'कानोकानी' या त्यांच्या सदरातील लेखांचे त्याच नावाचे पुस्तक झाले. पुस्तकाचा पुढचा भागही 'आणखी कानोकानी' या नावाने प्रकाशित झाला.

इंग्रजीतील अनेक चांगल्या चांगल्या पुस्तकांचे त्यांनी सुबोध मराठीत अनुवाद केले आहेत. 'इंडिया टुडे'च्या दोन अंकांत पुपुल जयकर लिहीत असलेल्या इंदिरा गांधींच्या आगामी चरित्राचे भाग आले होते. ते वाचल्यावर राजहंस प्रकाशनच्या दिलीप माजगावकर हे त्या पुस्तकाच्या अनुवादाचे हक्क घेण्यासाठी प्रयत्‍न करू लागले. तेव्हा त्याच्या अनुवादासाठी श्रीकांत लागू यांचे नाव आले. माजगावकर त्यांच्याकडे गेले. पण लागूंनी 'याचा माझ्यापेक्षा अशोक जैन चांगला अनुवाद करतील' असे सुचविले [२]. तेव्हा जैन दिल्लीत होते. त्यामुळे त्यांनी लेखकाने अनुभवलेला सगळा काळ, माहोल अनुवादात उतरवण्याचा प्रयत्‍न केला आणि तो अनुवाद चांगलाच यशस्वी ठरला.

अशोक जैन यांच्या पत्‍नीचे नाव सुनीती जैन. शेवटची दहा वर्षे अर्धांगवायूने आजारी असणाऱ्या अशोक जैन यांच्याकडून अपुरे राहिलेले अनुवाद पूर्ण करवून घेण्यात त्यांची मोठीच मदत झाली.

अशोक जैन यांचे गाजलेले लेख

  • नाट्य-चित्रअभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या 'परमेश्वराला रिटायर करा' हा लेख.

प्रकाशित साहित्य

नावसाहित्यप्रकारप्रकाशक / प्रकाशनप्रकाशन वर्ष (इ.स.)भाषाटिप्पणी
अंतस्थअनुवादितमराठीमूळ लेखक : पी.व्ही. नरसिंह राव
अत्तराचे थेंबलेखसंग्रह२००९मराठी
आणखी कानोकानीलेखसंग्रह२००३मराठी
इंदिरा- अंतिम पर्वअनुवादितमराठीमूळ लेखक : पी.सी. अलेक्झांडर
इंदिरा गांधीअनुवादितमराठीमूळ लेखिका : पुपुल जयकर
इंदिरा गांधी, आणीबाणी आणि भारतीय लोकशाहीअनुवादितमराठीमूळ लेखक : पी.एन. धर
कस्तुरबा - शलाका तेजाचीअनुवादितमराठीमूळ लेखक : अरुण गांधी
कानोकानीलेखसंग्रह१९९६मराठी
डॉक्युमेन्टकादंबरीअनुवादितमराठीमूळ लेखक : आयर्विंग वॉलेस
फॅन्टॅस्टिक फेलुदाअनुवादित पुस्तक मालिकामराठीमूळ लेखक : सत्यजित राय
बॅचलर ऑफ आर्ट्‌सअनुवादितमराठीमूळ लेखक : आर.के. नारायण
राजधानीतूनलेखसंग्रह२००३मराठी
लतादीदीअनुवादितमराठीमूळ लेखक : हरीश भिमाणी
लक्ष्मणरेषाअनुवादित१९९८मराठीआर.के. लक्ष्मण यांचे आत्मचरित्र
वॉकिंग विथ द लायनअनुवादितमराठीमूळ लेखक : नटवरसिंग
व्योमकेश बक्षी - रहस्यकथाअनुवादितमराठीमूळ लेखक : शरदिंदू बंडोपाध्याय
लालबहादूर शास्त्री-राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तमअनुवादितमराठीमूळ लेखक : सी.पी. श्रीवास्तव
शेषनचरित्रअनुवादितमराठीमूळ लेखक : के.गोविंदन कुट्टी
सोंग आणि ढोंगमराठी
स्वामी व त्याचे दोस्तअनुवादितमराठीमूळ लेखक : आर.के. नारायण

पुरस्कार

संदर्भ व नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन