आयुष मेहरा

आयुष मेहरा ( ७ नोव्हेंबर १९९२) हा एक भारतीय मॉडेल आणि अभिनेता आहे जो यूट्यूबवरील त्याच्या व्हिडिओ आणि वेब सीरिजसाठी प्रसिद्ध आहे. फिल्टर कॉपी, डाइस मीडिया आणि अरे यांसारख्या चॅनेलवर तो काम करत असतो. विशेषतः फिल्टर कॉफीवरच्या विनोदी व्हिडीओंसाठी तो ओळखला जातो.[१][२]

आयुष मेहरा
जन्मआयुष मेहरा
७ नोव्हेंबर १९९२
मुंबई, महाराष्ट्र
निवासस्थानमुंबई
राष्ट्रीयत्वभारतीय
पेशाअभिनेता
ख्याती
  • ऑपरेशन एमबीबीएस
  • इसी लाइफ में
  • फिल्टर कॉपीचे युट्यूब व्हिडीओ
कार्यकाळ२०१०- सद्य

सुरुवातीचे जीवन

आयुषचा जन्म मुंबईतील कुटुंबातील आहे. त्याचे शालेय शिक्षण चत्रभुज नरसी मेमोरियल स्कूलमधून झाले. पुढे त्याने नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवीचे शिक्षण घेतले.

कारकीर्द

२०१३ मध्ये आयुष एक मनोरंजन कंपनी असलेल्या CricketCountry.com मध्ये काम करू लागला. तिथे त्याने दोन वर्षे अँकर म्हणून काम केले. त्याच वेळी त्यांनी फ्रीलांसर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

यानंतर आयुषला 'इसी लाइफ में' या चित्रपटात संधी मिळाली. यामधील त्याचा अभिनयाचे कौतुक झाले. २०१५-१६ मध्ये, आयुष टीव्ही मालिका "ये है आशिकी" मध्ये काम केले. त्याने "हार्टली युअर्स" आणि "बेस्ट फ्रेंड्स फॉरएव्हर" या मालिकांमध्ये अनुक्रमे आरव आणि आदित्यची भूमिका साकारली. त्याच वर्षी, तो "लाइफ लफडे और बंदियां" या मालिकांमध्ये अभिनय केला.[२][३]

याशिवाय त्याने "मायनस वन" या वेब सीरिजमध्ये वरुणची भूमिका साकारली. यामध्ये दिल्लीत राहणारे एक जोडपे आणि नंतर ब्रेकअपची कथा आहे, ज्यात ते पुन्हा फ्लॅटमेट म्हणून राहत आहेत. त्याशिवाय, आयुष मेहरा फिल्टर कॉपी, मोस्टली सेन आणि आरजेव्हीसीच्या विनोदी व्हिडिओ आणि इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिसतो.[४]

२०२२ मध्ये त्याने नेटफ्लिक्सच्या ‘कॉल माय एजंट बॉलीवूड’ चित्रपटात अभिनय केला.[५] हा चित्रपट "डिक्स पोर सेंट" या फ्रेंच मालिकेचे भारतीय रूपांतर आहे.[६]

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन