ऋणशब्द

ऋृणशब्द किंवा तत्समशब्द म्हणजे असे शब्द जे एका भाषेमधून (देणारी भाषा) दुसऱ्या भाषेमधे किंवा इतर भाषांमधे (स्विकारणारी भाषा), कोणत्याही भाषांतराशिवाय, वापरले जातात. प्रत्येक वेळेस देणारी भाषा ही मुळ भाषा असायलाच हवी असे काही नाही, मध्यस्ती करणाऱ्या भाषेतून सुद्धा शब्द घेतले जातात. जसे की अनेक भारतीय शब्द पारसीअरबी भाषांच्या माध्यमातून इंग्रजी तसेच इतर भाषांमध्ये वापरले आहेत.

प्रकार व उदाहरणे

बोली भाषा आणि सवयी

समाजाच्या व लोकांच्या काही सवयींमुळे अनेक शब्द, ज्यांचा मूळ अर्थ वापराशी संबंधीत नसला तरी, बोली भाषेत वापरले जात आहेत. उदाहरणार्थ, अनेक लोक पिण्याच्या पाण्याच्या बाटलीला बिसलरी (bisleri) म्हणतात. भारतासोबत इतर अनेक देशांत या प्रकारचे ऋणशब्द आढळतात. जसे की ३ ते ५ वर्षांच्या लहान मुले जिथे एकत्र जबाबदार व्यक्तीच्या देखरेखीखाली खेळतात अशा शाळेला जर्मन भाषेत किंडरगार्टन (Kindergarten) हा शब्द वापरला जातो, हा शब्द अनेक देशांत वापरला जातो. हा शब्द बऱ्याच वेळेस किंडर गार्डन (Kinder Garden) असा बदल करून वापरला आहे.[१]

अन्य भाषांतून भारतात

इंग्रजी भाषा

जे तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्रयंत्रशास्त्र बाहेरील देश, जिथे इंग्रजी बोलतात, तिथून भारतात आले त्या संदर्भातील शब्द इतर भाषांमधून भारतीय भाषांमध्ये वापरले आहेत. उदाहरणार्थ- इंजिन, टेलीफोन, टेलीव्हिजन, डॉक्टर, सायकल, सिनेमा, हिरो असे अनेक शब्द मराठी भाषेत वापरले जातात.

तुर्की भाषा

कालगी, बंदूक, कजाग हे शब्द तुर्की भाषेतून मराठीत आले.

फारशी भाषा

अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, कामगार, फडणवीस, गुन्हेगार हे फारशी शब्द मराठीत आले.

पोर्तुगीज भाषा

बटाटा, लोणचे, काडतुस, पगार, चावी, तुरूंग, तंभाखू, मेज हे शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आले.

भारतीय भाषांमधून अन्य भाषांमध्ये

तसेच अनेक शब्द मराठी किंवा हिंदीतून इंग्रजीत वापरले आहेत. खास करून सर्वत्र प्रसिद्ध झालेल्या भारतीय अन्नपदार्थाच्या संदर्भातील शब्द, जसे की "गरम मसाला (Garam Masala), चटणी (Chutney)" हे शब्द इंग्रजीत सर्रासपणे वापरले जातात. नवीन जोडलेला शब्द म्हणजे "पक्का (Pukka)", जो स्वयंपाकाबाबत वापरला जातो.

सुरुवात

परकीयांनी भारतावर केलेली आक्रमणे व काही शतके केलेल्या राज्यामुळे अनेक शब्द अरबीतून, इंग्रजीतून भारतीय भाषांमध्ये वापरलेले आहेत. तसेच अनेक शब्द भारतीय भाषांतून इंग्रजीत वापरले आहेत. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्श्नरीने एक नोंद केलेली आढळते की सर्वात जुना ऋणशब्द "qila" हा शब्द मराठीतील "किल्ला " किंवा हिंदीतील "किला " या शब्दापासून इंग्रजीत वापरला गेला.[२]

संदर्भ


🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन