एड्सगर डिक्स्ट्रा
एड्सगर डिक्स्ट्रा (मे ११, इ.स. १९३० - ऑगस्ट ६, इ.स. २००२) हे डच संगणकशास्त्रज्ञ आहेत. प्रोग्रॅमिंग भाषांच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना १९७२ मध्ये ट्युरींग पुरस्कार मिळाला होता. संयुक्त संस्थानातील ऑस्टिनच्या टेक्सास विद्यापीठात १९८४ ते २००० पर्यंत ते संगणकशास्त्रात श्लंबर्गर शतकी अध्यासनावरील अध्यापक होते.इ.स. २००२ मध्ये त्यांच्या मृत्यूच्या आधी त्यांना वितरित संगणकशास्त्रातील स्वसंतुलन प्रणालीसाठी ए.सी.एम. प्रभावशाली संशोधननिबंध पुरस्कार मिळाला. या पुरस्काराला नंतर त्यांच्या स्मरणार्थ डिक्स्ट्रा पुरस्कार असे नाव देण्यात आले.
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे