विजयसिंह मोहिते-पाटील

भारतीय राजकारणी

विजयसिंह मोहिते-पाटील (१२ जून १९४४) हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामधील एक राजकारणी आहेत. विजयदादा या नावाने ते प्रसिद्ध आहेत. २००३-०४ मध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्याचे ६ वे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. मोहिते-पाटील हे महाराष्ट्र विधानसभेवर १९८० ते २००९ दरम्यान माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले होते. त्यांनी २५ वर्षे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री म्हणून काम केले आहे.

विजयसिंह मोहिते-पाटील

मतदारसंघमाढा
कार्यकाळ
१६ मे २०१४ – १९ मे २०१९
मागीलशरद पवार
पुढीलरणजितसिंह नाईक निंबाळकर
मतदारसंघमाढा

कार्यकाळ
२७ डिसेंबर २००३ – १९ ऑक्टोबर २००४
मागीलछगन भुजबळ
पुढीलआर आर पाटील

कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य
कार्यकाळ
९ नोव्हेंबर २००४ – १ डिसेंबर २००८
कार्यकाळ
१९ ऑक्टोबर १९९९ – १६ जानेवारी २००३

कार्यकाळ
४ मे २०१२ – १६ मे २०१४
मतदारसंघराज्यपालांद्वारे नामनिर्देशित

कार्यकाळ
१९८० – २००९
मागीलशामराव भीमराव पाटील
पुढीलहनुमंत डोळस
मतदारसंघमाळशिरस विधानसभा मतदारसंघ

जन्मजून १२, इ.स. १९४४
महाराष्ट्र
राजकीय पक्षराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पत्नीनंदिनीदेवी
अपत्ये*रणजितसिंह
  • रेणुका कर्णिक
निवासशिवरत्न बंगला, अकलूज, माळशिरस
व्यवसायराजकारणी
धर्महिंदू

सहकारमहर्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शंकरराव मोहिते पाटील यांचे ते पुत्र आहेत. त्यांचे मोहिते पाटील घराणे हे राजकीयदृष्ट्या खूप प्रभावी मानले जाते.[१][२][३]

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये मोहिते-पाटील ह्यांनी माढा लोकसभा मतदारसंघामधून स्वाभिमानी पक्षाचे सदाभाऊ खोत ह्यांचा सुमारे २५,००० मतांनी पराभव केला.

वैयक्तिक जीवन

शंकरराव मोहिते पाटील आणि रत्नाप्रभादेवी यांच्या पोटी १२ जून १९४४ रोजी माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे विजयसिंह यांचा जन्म झाला. अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयातून १९६२ मध्ये ते दहावी उत्तीर्ण झाले.

विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या पत्नी नंदिनीदेवी यांना एक मुलगा रणजितसिंह आणि एक मुलगी रेणुका कर्णिक आहे. अकलूजमधील शिवरत्न बंगला हे त्यांचे निवासस्थान आहे.

राजकीय कारकीर्द

विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजचे सरपंच म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी १९७१ ते १९७९ या काळात सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले. १९८० ते २००९ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेत माळशिरसचे आमदार होते. या काळात त्यांनी साखर कारखाने, दूध डेअरी आणि प्रक्रिया उद्योग, पोल्ट्री फार्म, शाळा, नर्सिंग, अभियांत्रिकी आणि डी. एड. कॉलेज सुरू केले.

२५ डिसेंबर २००३ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मोहिते पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. २००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा माळशिरस मतदारसंघ राखीव बनला, ज्यामुळे त्यांना शेजारच्या पंढरपूरच्या जागेवर जाण्यास भाग पाडले. भारत भालके यांच्याविरोधात झालेल्या या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नंतर त्यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड केली. [४]

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे राहिले. देशात मोदी लाट असतानादेखील ते निवडून आल्याने त्यांचे राजकीय वजन वाढले. स्वाभिमानी पक्षाच्याच्या सदाभाऊ खोत यांच्याविरोधात त्यांनी २५,००० मताधिक्य घेतले. [५]

भूषवलेली पदे

  • अकलूज ग्रामपंचायत - सदस्य, सरपंच
  • सोलापूर जिल्हा परिषद- सदस्य, अध्यक्ष (१९७१ ते १९७९)
  • राज्य विधानसभा - माळशिरस मतदारसंघ-आमदार (१९८० ते २००९)
  • उपमुख्यमंत्री. महाराष्ट्र राज्य (२५ डिसेंबर २००३ - १ नोव्हेंबर २००५)
  • PWD मंत्री
  • पर्यटन मंत्री
  • ग्रामविकास मंत्री
  • अध्यक्ष- इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया.
  • अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य साखर संघ (राज्य साखर सहकारी महासंघ)
  • MLC - राज्यपालांद्वारे नामनिर्देशित (४ मे २०१२ - १६ मे २०१४)
  • खासदार – माढा लोकसभा मतदारसंघात (१६ मे २०१४ – २०१९)

बाह्य दुवे

हे सुद्धा पहा

संदर्भ