ऐरोली विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

ऐरोली विधानसभा मतदारसंघ - १५० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, ऐरोली मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ५, ८ ते ९, २७ ते ४२ आणि ६१ यांचा समावेश होतो. ऐरोली हा विधानसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे गणेश रामचंद्र नाईक हे ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

वर्षआमदार[४]पक्ष
२०१९गणेश रामचंद्र नाईकभारतीय जनता पक्ष
२०१४संदीप गणेश नाईकराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९संदीप गणेश नाईकराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका

विजयी

संदर्भ