ओकायामा
ओकायामा (जपानी:岡山市) हे जपानच्या ओकायामा प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. चुगोकु प्रदेशात असलेल्या या शहराचा विस्तार ७९० किमी२ असून त्यात ७,०५,२२४ व्यक्ती राहतात.
ओकायामामधील कोराकु-एन ही जपानी पारंपारिक बाग आहे. पुण्यातील पु.ल. देशपांडे उद्यानाची रचना या बागेवर आधारित आहे.
इतिहास
इ.स. १६००च्या सुमारास ओकायामाच्या आसपासचा प्रदेशातील शेतजमीन व कुरणांमधील वस्तीला महत्त्व आले व त्यातून हे शहर निर्माण झाले. इ.स. १८८९मध्ये शहराची अधिकृत स्थापना झाली परंतु त्याआधी इ.स. १८७१मध्येच या शहरास ओकायामा प्रांताची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान येथे लश्करी तळ होता. २९ जून, इ.स. १९४५ रोजी अमेरिकेच्या वायुसेनेने केलेल्या तुफान बॉम्बफेकीत १,७०० व्यक्ती ठार झाल्या व हे शहर जवळजवळ संपूर्णपणे नष्ट झाले होते.
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे