कनौज

कन्नौज हे उत्तर प्रदेश राज्यातील कन्नौज जिल्ह्यातील एक शहर, प्रशासकीय मुख्यालय आणि एक नगरपालिका किंवा नगर परिषद आहे. शहराचे सध्याचे नाव हे कन्याकुब्जा या शास्त्रीय नावाचे आधुनिक रूप आहे.[१] ९ व्या शतकाच्या आसपास गुर्जर-प्रतिहार सम्राट मिहीरा भोजाच्या काळात याला महोदय म्हणूनही ओळखले जात असे. तसेच हे शहर सम्राट हर्षवर्धन यांची राजधानी होती.

कनौज
शहर
Nickname(s): 
परफ्यूम कॅपिटल ऑफ इंडिया; पूर्वेकडील ग्रास
देशभारत ध्वज भारत
राज्यउत्तर प्रदेश
जिल्हाकनौज
Elevation
१३९ m (४५६ ft)
लोकसंख्या
 (2011)
 • एकूण८४,८६२
 • लोकसंख्येची घनताएक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
भाषा
 • अधिकृतहिंदी, उर्दु
Time zoneUTC+5:30 (IST)
पिन
२०९ ७२५
Vehicle registrationUP-७४
संकेतस्थळwww.kannauj.nic.in

कन्नौज हे एक प्राचीन शहर आहे. असे म्हटले जाते की कन्याकुब्ज ब्राह्मण जे शांडिल्य येथील तीन प्रमुख कुटुंबांपैकी एक कुटुंब मानले जाते ते कन्नौज मधून होते.[२] शास्त्रीय भारताच्या काळात हे साम्राज्य भारतीय राजवंशांचे केंद्र म्हणून काम करीत होते. सर्वात आधी हे मौखरी राजघराण्याच्या वर्चस्वाखाली होते आणि नंतर वर्धन घराण्याचे सम्राट हर्ष यांच्या वर्चस्वाखाली.[३] ७ व्या आणि ११ व्या शतकाच्या दरम्यान, कन्नौज हे त्रिपक्षीय संघर्षाचे केंद्र बनले, जे पाल साम्राज्य, राष्ट्रकूट साम्राज्य आणि गुर्जर-प्रतिहार साम्राज्य दरम्यान होते. हा संघर्ष दोन शतकांपेक्षा जास्त काळ टिकला. नंतर हे शहर गहदावळा घराण्याच्या ताब्यात आले, गोविंदाचंद्रांच्या कारकिर्दीत या शहराला अभूतपूर्व प्रसिद्धी मिळाली. परंतु, कन्नौजची गौरवशाली गाथा दिल्लीच्या सुल्तानांनी संपवली.[४]

कन्नौज सुगंधित अत्तर बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. याला भारतातील अत्तरांची राजधानी म्हणून ओळखले जाते. प्रसिद्ध पारंपारिक कन्नौज अत्तराची कृती सरकाराकडून संरक्षित केलेली आहे.[५][६] खुद्द कन्नौजमध्ये २०० पेक्षा अधिक परफ्यूम डिस्टिलरी आहेत आणि तंबाखू, अत्तर (परफ्यूम) आणि गुलाबपाणी साठीची एक मोठी बाजारपेठ आहे.[५] कानौजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेगळ्या हिंदुस्थानी बोलीला त्याचे नाव दिले गेले आहे, ज्यात दोन भिन्न कोड किंवा रजिस्टर आहेत.

इतिहास

प्रारंभिक इतिहास

पुरातत्त्व संशोधनात असे दिसून येते की कन्नौज ग्रे वेर आणि नॉर्दन ब्लॅक पॉलिश वेर संस्कृतीपासून वसवलेले आहे.[७] या संस्कृतीचा कालावधी अनुक्रमे सीए १२०० - ६०० बीसीई आणि सीए. ७०० - २०० बीसीई असा होता. या शहराचे पूर्वीचे नाव कन्याकुब्ज होते. या नावाचा उल्लेख हिंदू महाकाव्य, महाभारत आणि रामायण या मध्ये सापडतो. हे शहर एक प्रसिद्ध शहर म्हणून उल्लेले आहे. तसेच याचा उल्लेख पतंजली (सी.ए. १५० बीसीई) या व्याकरणज्ञानेही केला आहे.[८] प्राचीन बौद्ध साहित्यात कन्नौजचा उल्लेख कन्नकुज्जा असा आहे आणि मथुरा ते वाराणसी आणि राजगीर या व्यापार मार्गावरील शहर असा उल्लेख आहे.[९]

संदर्भ

बाह्यदुवे