कोल्हापूरची लढाई

१६५९ मध्ये मराठा साम्राज्य आणि आदिलशाही घराण्यातील लढाई
कोल्हापूरची लढाई
मराठे-अदिलशाही युद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांकडिसेंबर २८ १६५९
स्थानकोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
परिणतीमराठ्यांचा विजय
प्रादेशिक बदलकोल्हापूरचा सारा प्रदेश महाराजांच्या ताब्यात
युद्धमान पक्ष
मराठा साम्राज्यआदिलशाही
सेनापती
शिवाजी महाराजरुस्तमजमान
सैन्यबळ
५,०००१०,०००
बळी आणि नुकसान
२,०००७,०००

'== पार्श्वभूमी ==शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा नोव्हेंबर १० १६५९ रोजी वध करून त्याच्या सेनेचा प्रचंड धुव्वा उडवला व काही दिवसातच अतिशय आक्रामक भूमिका घेउन अनेक किल्ले आपल्या अखत्यारीत घेतले. डिसेंबर १६५९ मध्ये शिवाजी महाराज कोल्हापूर नजीक पन्हाळ्यानजीक पोहोचले व याच सुमारास अदिलशाही सरदार रुस्तमजमान मिरजेपाशी पोहोचला.

लढाई

रुस्तमजमान कडे अनेक मातब्बर सरदार होते फ़ाजलखान, मलिक इत्बार, सादतखान, याकुबखान, हासन खान, संताजी घाटगे इत्यादी व त्याचे सैन्यबळही मोठे होते. शिवाजी महाराजांच्या सेनेत नेतोजी पालकर , हणमंतराव खराटे, हिरोजी इंगले, भिमाजी वाघ इत्यादी सरदार होते.

शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आहेत असे कळाल्यानंतर पन्हाळ्यावर आक्रमणकरण्याच्या बेतात रुस्तमजमान होता. परंतु २८ डिसेंबरला पहाटेच अचानकपणे शिवाजी महाराजांनी रुस्तमजमानच्या सेनेवर जोरदार हल्ला चढवला. पूर्ण जोरदार हल्ला न चढवता पुढून मागून आजूबाजूने तुकड्यांनी हल्ले चढवले व आदिलशाही सेनेला नामोहरम केले. रुस्तमजमान रणांगण सोडून पळून गेला.

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन