गेल (इंडिया) लिमिटेड

गेल (इंडिया) लिमिटेड (इंग्लिश:Gas Authority of India Limited, बी.एस.ई.532155, एन.एस.ई.GAIL) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली गेल इंडिया देशातील नैसर्गिक वायू व द्रवित पेट्रोलियम वायूचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. १९८४ साली स्थापन झालेल्या गेल इंडियाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून तिच्या सेवेचे जाळे भारतभर पसरले आहे.

गेल (इंडिया) लिमिटेड
प्रकारसरकारी कंपनी
संक्षेपबी.एस.ई.532155
एन.एस.ई.GAIL
बी.एस.ई. सेन्सेक्स सदस्य
स्थापनाइ.स. १९८४
मुख्यालयभारत नवी दिल्ली, भारत
महत्त्वाच्या व्यक्तीबी.सी. त्रिपाठी
उत्पादनेनैसर्गिक वायू, खनिज तेल, वीज निर्मिती
महसूली उत्पन्न भारतीय रूपया ४७३.३३ अब्ज
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
भारतीय रूपया ४०.२२ अब्ज
कर्मचारी३,९९४ (मार्च २०१३)
संकेतस्थळwww.gailonline.com

गेल कंपनी ही वाहनांमध्ये वापरल्या जात असलेल्या नैसर्गिक वायू तसेच घरगुती वापरासाठी लागणाऱ्या एल.पी.जी.चे वितरण इतर सरकारी पेट्रोलियम कंपन्यांद्वारे करते. मुंबई महानगर क्षेत्रामधील अनेक स्थानांमधील घरांमध्ये स्वयंपाकासाठी पाईपने वायू पुरवणारी महानगर गॅस लिमिटेड तसेच पुणे परिसरात ही सेवा पुरवणारी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड इत्यादी अनेक कंपन्यांमध्ये गेल इंडियाची भागीदारी आहे.

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन