जागतिक विद्यार्थी दिन

(जागतिक विद्यार्थी दिवस या पानावरून पुनर्निर्देशित)

जागतिक विद्यार्थी दिवस हा भारताचे माजी राष्ट्रपती आणि विख्यात अंतराळ शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस भारतात सर्वत्र पाळला जातो.[१] परंतु संयुक्त राष्ट्र संघटनेने अशी अधिकृत घोषणा केलेली नाही, त्यामुळे हा अधिकृत 'जागतिक दिवस' म्हणून मानला जाऊ शकत नाही.[२] याचा उगम कधी आणि कसा झाला हे कोणालाच माहीत नाही. राजीव चंद्रन, 'भारत आणि भूतानचे संयुक्त राष्ट्र माहिती केंद्राचे राष्ट्रीय माहिती अधिकारी' यांनी इंडियन एक्स्प्रेस या वर्तमनपत्राद्वारे असे सांगितले की संयुक्त राष्ट्राने असा कोणताही ठराव अजून मंजूर केलेला नाही.[३]

डॉ. कलाम


हे सुद्धा पहा

संदर्भ