टेक्सास गायकवाड

टेक्सास भाऊसाहेब गायकवाड (जन्म १९४८) हे प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, लेखक, कलावंत आहेत. आम्ही देशाचे मारेकरी[१] हे त्यांचे गाजलेले नाटक. हिंदी व मराठी रंगभूमीवर त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. सुख की दौलत[२] हा हिंदी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टी या राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती[३].

टेक्सास गायकवाड
जन्मकुंभारवळण, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रअभिनय
भाषामराठी
शिक्षणबी. कॉम.; एल एल बी
प्रमुख नाटकेआम्ही देशाचे मारेकरी
प्रमुख चित्रपटसुख की दौलत
वडीलभाऊसाहेब गायकवाड

कार्य

टेक्सास गायकवाड यांनी कार्यकर्ता कलावंत म्हणून दलित रंगभूमी आणि प्रबुद्ध रंगभूमीस भरीव योगदान दिलेले आहे[४]. प्रबोधनात्मक नाट्य निर्मिती करून त्यांनी समाजात समता, स्वातंत्र्य व भ्रातृभाव ही संविधानिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला..


नाटके

  1. ॲट्रॉसिटी
  2. आम्ही देशाचे मारेकरी
  3. जळवा
  4. प्रबुद्ध जलसे (नवा इतिहास)
  5. ब्रह्महत्या
  6. मन्वंतर
  7. मानदंड
  8. माफीनायक
  9. रंग आंधळे
  10. सूर्योदय

दिग्दर्शित नाटके

आखरी जाम (उर्दू), काळोखाच्या गर्भात, घाशीराम कोतवाल (हिंदी), थॅंक्यू मि. ग्लाड (हिंदी), नटसम्राट (मराठी), फेअरवेल टू बॅबिलोन (सहदिग्दर्शन, इंग्लिश- द आफ्रिकन थिएटर ग्रुप सोबत केलेले), मनुकलंक (खैरलांजी हत्याकांडावर आधारित नाट्य.)


🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन