ठिपकेदार मुनिया

ठिपकेदार मनोली किंवा ठिपकेदार मुनिया हा भारतात आढळणारा चटकाद्य कुळातील (चिमणीच्या कुळातील) सामान्य पक्षी आहे.

ठिपक्यांची मनोली
शास्त्रीय नावLonchura punctulata (Linnaeus)
कुळचटकाद्य (Ploceidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिशScaly-breasted Munia, Spotted Munia
हिंदीतेलिया मुनिया, सिनेवाज

वर्णन

ठिपकेदार मुनिया हा साधारण १० सें. मी. आकारमानाचा, चिमणीसारखा दिसणारा पक्षी आहे. ठिपकेदार मुनियाची मादी आणि वीणीच्या हंगामात नसणारा नर दिसायला सारखे मुख्यत्वे फिकट तपकिरी रंगाचे असतात, वीण काळात वयस्क नर गडद तपकिरी रंगाचा होतो. यावर असलेले काळे-पांढरे ठिपके याची महत्त्वाची ओळख आहे तर थव्याने राहणे हे याचे वैशिष्ट्य आहे. एकाच परिसरात अनेक जोडपी आपली घरटी बांधून राहतात.[ संदर्भ हवा ]

आढळस्थान

राजस्थान, पंजाब, हिमालयाचा काही भाग वगळता (हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात मुनिया सापडतात) संपूर्ण देशभर दिसून येणारा हा पक्षी असून याच्या आकारावरून आणि रंगावरून याच्या किमान दोन उपजाती आहेत.

खाद्य

ठिपकेदार मुनिया या मुख्यत्वे करून शेतातील दाणे, धान्य, छोटे किडे यावर आपली उपजीविका करतात.

विणीचा हंगाम

जुलै ते ऑक्टोबर हा ठिपकेदार मुनियाच्या विणीचा काळ असून त्यासाठी तो गवतात किंवा झुडपात आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी शुभ्र पांढऱ्या रंगाची ४ ते ८ अंडी देते. ठिपकेदार मुनिया नर-मादी मिळून अंडी उबविणे, पिलांची देखभाल करणे, पिलांना खाऊ घालणे, घरट्याची साफसफाई करणे आदी सर्व कामे करतात. एखादा धोका जाणवला की वेडा राघू 'टीर! टीर! टीर!' असा किणकिणणारा आवाज काढून जमिनीवरच्या मुनियांना सावध करतो. लगेच सगळे मुनिया जमिनीवरून उडतात आणि 'पटी! पटी!' अशा मंजूळ आवाज करत एखाद्या झुडपात लपून बसतात. म्हणजे आजूबाजूला एखादा रखवाली करणारा वेडा राघू असणे हे मुनियाच्या फायद्याचे असते. कदाचित जमिनीवर चरणाऱ्या मुनियांच्या हालचालीमुळे उडणारे किडे वेड्या राघूला टिपता येत असावेत.[ संदर्भ हवा ]

चित्रदालन

संदर्भ

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन