तब्रिझ

तब्रिझ ( फारसी: تبریز </link> , </link></link> ) हे वायव्य इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांतातील एक शहर आहे. तब्रिझ प्रांत, काउंटी आणि जिल्ह्याची राजधानी आहे. [१]

ताब्रिझ हे इराणच्या ऐतिहासिक अझरबैजान प्रदेशातील कुरु नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे सहंद आणि आयनाली पर्वतांमधील ज्वालामुखीच्या शंक्वाकृती उंच शिखरांच्या मध्ये असलेले तब्रिझ समुद्रसपाटीपासून १,३५०-१,६०० मी उंचीवर आहे.

तब्रिझची लोकसंख्या १७ लाख आसून हे[२] हे वायव्य इराणमधील सर्वात मोठे आर्थिक केंद्र आणि महानगर आहे. येथील लोकसंख्या द्विभाषिक आहे आणि बहुतेक लोक अझेरी ही त्यांची मूळ भाषा आणि फारसी बोलतात.. [३] येथे मोटारगाड्या, मशीन टूल्स, रिफायनरी, खनिज तेल, कापड आणि सिमेंट उत्पादन उद्योग आहेत. [४] हे शहर हाताने विणलेले गालिचे आणि दागिन्यांवरील कलाकुसरीसाठी प्रसिद्ध आहे. स्थानिक मिठाई, चॉकलेट, सुका मेवा आणि पारंपारिक तबरीझी खाद्यपदार्थ इराणमध्ये सर्वोत्कृष्ट गणले जातात.

१६व्या शतकातील तब्रिझचा नकाशा
मे २०१२मधील ईशान्य तबरीझचे विहंगम दृश्य

धर्म

१५०१ मध्ये तब्रिझ येथे राज्याभिषेक झाल्यानंतर, शाह इस्माईल ने शिया इस्लामची इस्रा अशरी शाखा सफवी साम्राज्याचा अधिकृत धर्म म्हणून घोषित केली. याचा परिणाम म्हणून, तबरीझमधील बहुसंख्य सुन्नी लोकसंख्या जबरदस्तीने शिया धर्मात रुपांतरित झाली. [५] [६] सध्या, बहुसंख्य लोक शिया इस्लामचे अनुयायी आहेत.

शहरात ख्रिश्चन धर्माचे अनुसरण करणारे आर्मेनियन अपोस्टोलिक लोक काही प्रमाणात आहेत. येथे एक लहान ज्यू समुदाय होता, परंतु त्यांपैकी बहुतेक लोक तेहरानमध्ये गेले आहेत. [७] शहरात बहाई धर्माचा एक लहान, समुदाय देखील आहे. यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. [८]

जुळी शहरे

तबरीझ हे जुळे आहेत: [९]

 

ऑगस्ट २०१०मधील तब्रिझचे दृश्य

संदर्भ