तुंगभद्रा नदी

तुंगभद्रा ही भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक प्रमुख नदी आहे. शिमोगा जिल्ह्याच्या कुडली ह्या गावाजवळ तुंगाभद्रा ह्या नद्यांच्या संगमामधून तुंगभद्रा नदीची निर्मिती होते. येथून ही नदी सुमारे ५३० किमी अंतर वाहता जाऊन तेलंगणाआंध्र प्रदेश राज्यांची अंशतः सीमा आखते व कृष्णा नदीला मिळते. हरिहर, हंपी, हॉस्पेट, मंत्रालयम, कुर्नूल ही तुंगभद्रेच्या काठावर वसलेली प्रमुख शहरे आहेत.

तुंगभद्रा नदी
हंपी येथे तुंगभद्रेचे पात्र
उगमकुडली, शिमोगा जिल्हा (तुंगा नदी व भद्रा नदीच्या संगमावर)
मुखकृष्णा नदी, आलमपूर, महबूबनगर जिल्हा
पाणलोट क्षेत्रामधील देशकर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश
लांबी५३१ किमी (३३० मैल)
उगम स्थान उंची६१० मी (२,००० फूट)