दादाकांत धनविजय

दादाकांत धनविजय (९ सप्टेंबर, १९५३, नागपूर, महाराष्ट्र - ) हे एक मराठी साहित्यिक आहेत. दलित रंगभूमीच्या चळवळीसाठी त्यांनी योगदान दिले आहे[१]. हे महाराष्ट्रातील विदर्भ भागातील असून त्यांच्या लेखनातून विदर्भीय भाषेचा प्रभाव आहे. 'गुलसिंता' या ठाणे लघुपट मोहोत्सवात निवड झालेल्या लघुपटाचे ते निर्माते व लेखक आहेत[२].

परिचय

दलित साहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक व कलावंत म्हणुन फुले, आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीत १९७५पासून अभिनव कलानिकेतन, नागपूर या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. फुले आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीकरीता आयु(??). धनविजय यानी अनेक नाटके रंगमंचावर आणली आहेत. ‘अकिंचन’ हे नाटक पुण्याच्या टिळक सभागृहात २४ मे १९८७ रोजी सादर करून वैदर्भीय भाषेची त्यांनी पुण्यात छाप पाडली. ‘विकल्प’ या नाटकाचा प्रयोग दिनांक २६.०९.१९९२ रोजी दिल्लीच्या महाराष्ट्र रंगायन इथे यशस्वी सादर करून दलित नाट्याचे खरे स्वरूप दिल्लीकरांना दाखवून दिले. महाराष्ट्र राज्य संगित नाट्य महोत्सवात सांगली येथे २८ जानेवारी १९८३ रोजी आयु(??). धनविजय यांनी ‘विकल्प' सादर केले व प्रथमच दलित संगीत नाटकास पुरस्कृत करण्यात आले.

‘जागरण' (हिंदी) हे नाटक दिल्लीच्या मालवणकर सभागृहात विश्व बौद्ध संमेलनात आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपुढे २ मे १९९२ला सादर केले. जानेवारी १९७५मध्ये अभिनव कला निकेतन या संस्थेची स्थापना करून १४ एप्रिल १९७५ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी पहिला प्रयोग सादर केला. नाटकाचे दिग्दर्शन लेखक, व कलावंत धनविजय या बहुआयामी नाटककाराने महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्या आहेत. दिल्ली, भोपाळ, हैद्राबाद, इंदूर आदी ठिकाणी नाट्य प्रयोग करून मराठी मातीतला हा वैदर्भीय दलित नाटककार यशस्वी झाला आहे.

पथनाट्य चळवळ

विदर्भातील पथनाट्य चळवळ राबविण्याचे प्रथम श्रेय दादाकात धनविजय यानांच आहे. दिनांक १९७६ च्या जानेवारी महिन्यात त्यांनी रोजी ' मृत्युदिन वा मुक्तीदिन' या पथनाट्याचे प्रयोग सुरू केले. पुढे संपूर्ण महाराष्ट्रात या पथनाट्याचे पाचशे प्रयोग सादर केले. नागपुर येथील दिक्षामूमीवर लाखो प्रेक्षकांपुढे म. भी. चिटणीस यांच्या ‘युगयात्रा’ या नाटकानंतर ‘मृत्यु दिन वा मुक्ती दिन’ हे नाटक सादर झाले. त्यानंतर दादाकांत यांनी बरीच पथनाट्य लिहून आणि दिग्दर्शित करून पथनाट्य चळवळीला महत्त्वाचे योगदान दिले.

नागपूर आणि इंदोर आकाशवाणी करिता आयु. धनविजय यानी बरिच नाटके लिहिली आहेत आणि ती प्रसारित झाली आहेत. नागपूर आकाशवाणीवर धनविजय लिखीत प्रतिशोध हे नभोनाट्य प्रसिद्ध नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यानी दिनांक 26.09.1930 रोजी दिग्दर्शीत केले होते, आयु, धनविजय यांचे अखिल भारतीय पातळीवर नाटक दिल्लीहून प्रसारीत झाली आहेत, त्यात प्रामुख्याने मार्गदाता, महामानव फुले, प्रतिशोध, आदी नाटके होत.

दलित रंगभूमीवर आलेली आयुष्यमान धनविजय यांची नाटके

  1. अकिंचन
  2. अग्निपथ
  3. अतिक्रमण
  4. अंधत्व
  5. अस्त
  6. उत्खनन
  7. उषःकाल
  8. कटाक्ष
  9. कफल्लक (हिंदी)
  10. कस्तुरी
  11. क्राउड
  12. चरित्र
  13. जागरण (हिंदी आणि मराठी)
  14. प्रतिशोध
  15. प्रायश्चित
  16. बलिदान
  17. मार्गदाता
  18. विकल्प
  19. सिद्धान्त
  20. स्वर्गीय शांततेच्या दाराकाठी

कथा

  1. मज़हब, (लोकमत)
  2. काळोख (लोकमत)
  3. अनौरस (लोकमत)
  4. आत्मदहन (बहुजन टाइम्स)
  5. पठ्ठासदाशिव (लोकानुकम्पा)
  6. ती (अक्षरछाया)
  7. प्रतिशोध (लोकमत)
  8. पुढारी (लोकमत)
  9. निर्धार (लोकमत)
  10. अस्तित्व (लोकमत) (बयान पत्रिका, हिंदी, नई दिल्ली)
  11. उत्सव (बहुजन टाइम्स)
  12. विघटन (आकाशवाणी,नागपूर येथून प्रसारित) (लोकवादी भूमिका)
  13. भूमिका (लोकमत)

पुरस्कार

  1. ‘विकल्प' या नाटकास महाराष्ट्र शासन साहित्य व सांस्कृतिक संचालनालय मुंबई यांचा अण्णासाहेब किर्लोस्कर नाट्य पुरस्कार, २००६.
  2. ‘अस्तित्व’ या कथा संग्रहास डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार (पुर्णा) 22.05.2004 तसेच समाज प्रबोधन प्रतिष्ठान, नागपूर यांचा उत्कृष्ट कथा पुरस्कार (२००४)
  3. ’अस्तित्व’ सावित्रीबाई फुले वाचनालय, नागपूर यांचा उत्कृष्ट पुरोगामी साहित्य पुरस्कार २००४-२००५.
  4. ’विकल्प’ या नाटकास महाराष्ट्र रंगायन दिल्ली यांचा उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार १९९२
  5. ’विकल्प’ या नाटकास मराठी नाट्य परिषद, मुंबई व महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवमध्ये संगित दिग्दर्शन पुरस्कार १९९३.
  6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार २०१४-१५.

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन