नरहर अंबादास कुरुंदकर

मराठी लेखक व विचारवंत

नरहर कुरुंदकर (१५ जुलै, इ.स. १९३२ - १० फेब्रुवारी, इ.स. १९८२) हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते. कुरुंदकर यांचा जन्म १५ जुलै १९३२ रोजी महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील नांदापूर (जि. हिंगोली ) गावात झाला. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा हे त्यांचे मूळ गाव.

नरहर अंबादास कुरुंदकर

त्यांनी प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय, नांदेड‎ येथे शिक्षक म्हणून तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राचार्यपद भूषविले होते.विशेष बाब म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता.[१]

व्यक्तिगत जीवन

नरहर कुरुंदकरांचा विवाह प्रभावती यांच्याशी झाला होता. या दांपत्याला एक मुलगा आणि तीन मुली अशी अपत्ये होती. प्रभावती कुरुंदकरांचा मृत्यूजानेवारी इ.स. २०१० या दिवशी झाला. त्यांच्या एका मुलीचे नाव श्यामल पत्की आहे.

कारकीर्द

प्रतिष्ठान

कुरुंदकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नांदेड शहरात त्यांच्या नावाचे ’नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान’ स्थापन झाले आहे. श्यामल पत्की या प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आहेत (२०१४). या प्रतिष्ठानने २०१० साली, नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या आणि काही विद्यार्थ्यांच्या मदतीने सोसायटीच्याच स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्रात नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्र सुरू केले आहे. या अभ्यास केंद्रातर्फे वेगवेगळ्याक्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांना त्यांच्या प्रकल्पासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. संशोधकासाठी येथे शैक्षणिक अर्हतेची अट नसल्याने अनेक नवे प्रकल्प मार्गी लागले आहेत. शिष्यवृत्ती मिळाल्यापासून दोन वर्षात प्रकल्प सादर करणे एवढीच अट आहे.[२]

आतापर्यंत पूर्ण झालेले प्रकल्प :

  • दासोपंतांच्या पदरचनांचा सांगीतिक व वाङ्‌मयीन अभ्यास
  • मराठ्यांचा इतिहास-कुरुंदकरांची भूमिका, वगैरे.

या अभ्यास केंद्राच्या वतीने व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. आतापर्यंत (२०१४) येथे अशोक वाजपेयी, गंगाधर गाडगीळ, डॉ.जयंत नारळीकर, दुर्गा भागवत, भालचंद्र फडके, डॉ.म.द. हातकणंगलेकर, डॉ.य.दि. फडके, डॉ.यशवंत सुमंत, डॉ.सदानंद मोरे आदींची व्याख्याने झाली आहेत.

कुरुंदकरांचे स्मारक

कुरुंदकरांसह विनोबा भावे, वसंतदादा पाटील, बालगंधर्व, जी.डी. बापू लाड, नागनाथ‍अण्णा नायकवडी, बाळासाहेब देसाई (सातारा), भाई सावंत, बाळासाहेब सावंत (रत्‍नागिरी), चिंतामणराव देशमुख, संताजी घोरपडे, मारोतराव कन्नमवार, आदी व्यक्तीची स्मारके उभारण्याचे महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने ठरवले होते, पण यांतील एकही स्मारक पूर्णत्वास गेले नाही.

प्रकाशित साहित्य

नावसाहित्यप्रकारप्रकाशनप्रकाशन वर्ष (इ.स.)
अभयारण्यइंद्रायणी साहित्य
आकलनव्यक्तिचित्रेदेशमुख आणि कंपनी
जागरलेखसंग्रह (राजकीय)देशमुख आणि कंपनी
थेंब अत्तराचेदेशमुख आणि कंपनी
धार आणि काठदेशमुख आणि कंपनी
निवडक कुरंदकर ग्रंथवेध भाग १, २ (संपादक विश्वास दांडेकर)निवडक प्रस्तावनांचा संग्रहदेशमुख आणि कंपनी
निवडक पत्रे-नरहर कुरुंदकर (संपादक- जया दडकर)
पं.नेहरू-एक मागोवा (सहलेखक- डॉ. एन.जी. राजूरकर)
परिचय[१]इंद्रायणी साहित्य१५ जुलै १९८७
पायवाट[२]मॅजेस्टिक बुक स्टॉलऑगस्ट १९७४
भजन
मनुस्मृती (इंग्रजी)
मागोवादेशमुख आणि कंपनी
रूपवेधदेशमुख आणि कंपनी
रंगशाळादेशमुख आणि कंपनी
शिवरात्र
छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य
हैदराबाद : विमोचन आणि विसर्जन
वाटचाल[३]इंद्रायणी साहित्य१० फेब्रुवारी १९८८

प्रस्तावना लेखन

कुरुंदकरांनी अनेक पुस्तकांना प्रदीर्घ प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्‍यांनी लिहिलेल्या प्रस्तावनांमधून आठ प्रस्तावनांची निवड करून ‘निवडक नरहर कुरूंदर’ हे संपादित पुस्तक आकाराला आलेले आहे. ‘देशमुख आणि कंपनी’ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील प्रस्तावनांची निवड विश्वास दांडेकर यांनी केलेली आहे. ‘ग्रंथवेध भाग-१’ असे या पुस्तकाला म्हटलेले असून इतर निवडक प्रस्तावना भाग-२ मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.

कुरंदकरांच्या प्रस्तावना लाभलेली व ग्रंथवेध-१ मधे उल्लेखलेली पुस्तके

  • अमेरिकन निग्रो साहित्य आणि संस्कृती (जनार्दन वाघमारे)
  • चक्रपाणी (रा.चिं. ढेरे)
  • चलो कलकत्ता (बिमल मित्र)
  • महाडचा मुक्तिसंग्राम (झुंबरलाल कांबळे-राम बिवलकर)
  • लोकायत (स.रा.गाडगीळ)
  • श्रीमान योगी (रणजित देसाई) : सत्तर पानी प्रस्तावना
  • संस्कृती (इरावती कर्वे)
  • हिमालयाची सावली (वसंत कानेटकर)

इतर लेखन

पुरस्कार

' धार आणि काठ' या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन