पॉल रायन

पॉल डेव्हिस रायन (इंग्लिश: Paul Davis Ryan, २९ जानेवारी १९७०) हा एक अमेरिकन राजकारणी व प्रतिनिधींच्या सभागृहाचा ६२वा सभापती आहे. २०१० पासून सभापतीपदावर राहिलेल्या जॉन बेनरने ह्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर २९ ऑक्टोबर २०१५ रोजी रायनची नवा सभापती म्हणून निवड केली गेली. पॉल रायन १९९९ सालापासून विस्कॉन्सिन राज्याच्या क्र. १ मतदारसंघामधून प्रतिनिधींच्या सभागृहाचा सदस्य निवडून येत आहे. जानेवारी २०११ ते जानेवारी २०१५ दरम्यान रायन सभागृहाच्या अर्थसंकल्प समितीचा चेरमन होता.

पॉल रायन

कार्यकाळ
२९ ऑक्टोबर २०१५ – ३ जानेवारी २०१८
राष्ट्राध्यक्षबराक ओबामा
मागीलजॉन बेनर
पुढीलनॅन्सी पेलोसी

प्रतिनिधींच्या सभागृहाचा सदस्य
विस्कॉन्सिन
कार्यकाळ
३ जानेवारी १९९९ – ३ जानेवारी २०१८
पुढीलब्रायन स्टेइल

जन्म२९ जानेवारी, १९७० (1970-01-29) (वय: ५४)
जेन्सव्हिल, विस्कॉन्सिन, अमेरिका
राष्ट्रीयत्वअमेरिका
राजकीय पक्षरिपब्लिकन पक्ष
पत्नीजॅना लिटल
धर्मख्रिश्चन

रिपब्लिकन पक्षाच्या सदस्य असणाऱ्या रायन ह्याला नोव्हेंबर २०१२ मधील अध्यक्षीय निवडणुकीत मिट रॉम्नीने उपराष्ट्राध्यक्षपदाच्या लढतीसाठी निवडले होते परंतु रॉम्नी-रायन जोडगोळीचा निवडणुकीत पराजय झाला.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत