पी.एस.एल.व्ही.

(पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल या पानावरून पुनर्निर्देशित)

धृवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन (P.S.L.V) ( Polar Satellite Launch Vehicle ) हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थचे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान आहे. इस्रोच्या कामगिरीतला हा मानाचा तुरा आहे. केवळ भारतीय नव्हे तर इतरही देशांचे उपग्रह सुद्धा अवकाशात पाठवुन परकीर चलन मिळवण्यात आणि अवकाश स्पर्धेत भारताला आघाडीत आणण्यात याचा महत्त्वाचा वाटा आहे.

पी.एस.एल.व्ही. वाहकाचे इस्त्रोच्या संकेतस्थळावरील चित्र

या प्रक्षेपकाची उंची ४४ मीटर तर, वजन २३० टन आहे. २००८ मध्ये "इस्रो'ने याचा वापर करून एकाचवेळेस दहा उपग्रह प्रक्षेपित करून विश्‍वविक्रमाची नोंद केली होती. हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे असून इस्रो (ISRO - Indian Space Reasearch Orgnization) ने केली आहे. पी.एस.एल.व्ही. भुस्थिर कक्षेत उपग्रह नेऊ शकते. आतापर्यंत १९ भारतीय तर २२ विदेशी असे ४१ भूस्थिर उपग्रह इस्त्रोने अवकाशात यशस्वी रित्या पाठवले आहेत. पी.एस.एल.व्ही.च्या एका उड्डाणाचा खर्च साधारण १.७ करोड अमेरिकन डॉलर इतका आहे.

पीएसएलव्हीच्या उड्डाणांचा इतिहास

वाहक नावसामुग्री/उपग्रहतारीखयशस्वी/अयशस्वी
पीएसएलव्ही डी १आयआरएस १ इ२० सप्टेंबर १९९३अयशस्वी
पीएसएलव्ही डी २आयआरएस पी-२१५ ऑक्टोबर १९९४यशस्वी
पीएसएलव्ही डी ३आयआरएस पी-३२१ मार्च १९९६यशस्वी
पीएसएलव्ही सी १आयआरएस १-डी२९ सप्टेंबर १९९७यशस्वी
पीएसएलव्ही सी २ओशनसॅट (आयआरएस पी-४), किटसॅट-३, टय़ुबसॅट२६ मे १९९९यशस्वी
पीएसएलव्ही सी ३टेस२२ ऑक्टोबर २००१यशस्वी
पीएसएलव्ही सी ४कल्पना-१(मेटसॅट)१२ सप्टेंबर २००२यशस्वी
पीएसएलव्ही सी ५रिसोर्ससॅट-१ (आयआरएस पी-६)१७ ऑक्टोबर २००३यशस्वी
पीएसएलव्ही सी ६कार्टोसॅट-१ व हॅमसॅट५ मे २००५यशस्वी
पीएसएलव्ही सी ७कार्टोसॅट-२ व एसआरई-१ लापान-टय़ुबसॅट, पेह्य़ुनसॅट-११० जानेवारी २००७यशस्वी
पीएसएलव्ही सी ८एगाईल२३ एप्रिल २००७यशस्वी
पीएसएलव्ही सी १०टेकसार२३ जानेवारी २००८यशस्वी
पीएसएलव्ही सी ९कार्टोसॅट-२ ए, आयएमएस-१ व आठ नॅनो उपग्रह२८ एप्रिल २००८यशस्वी
पीएसएलव्ही सी ११चांद्रयान-१२२ ऑक्टोबर २००८यशस्वी
पीएसएलव्ही सी १२रिसॅट-२ व अनुसॅट२० एप्रिल २००९यशस्वी
पीएसएलव्ही सी १४ओशनसॅट-२ व सहा नॅनो उपग्रह२३ सप्टेंबर २००९यशस्वी
पीएसएलव्ही सी १५कार्टोसॅट-२ बी व चार उपग्रह१२ जुलै २०१०यशस्वी
पीएसएलव्ही सी १६'रिसोर्ससॅट-२' व दोन नॅनो उपग्रह२० एप्रिल २०११यशस्वी
पीएसएलव्ही सी१७जीसॅट-१२१५ जुलै २०११यशस्वी
पीएसएलव्ही सी१८मेघाट्रॉपिक्स, जुगनू, एस.आर.एम.सॅट, व्हेसलसॅट१२ ऑक्टोबर २०११यशस्वी
पीएसएलव्ही सी-१९रिसॅट १२६ एप्रिल २०१२यशस्वी
पीएसएलव्ही सी-२१स्पॉट-६, प्रोइटर्स९ सप्टेंबर इ.स. २०१२यशस्वी
पीएसएलव्ही सी-२०सरल, सफायर, नेओसॅट, टगसॅट-१, युनिब्राईट, स्ट्रॅंड-१, अयुसॅट-३२५ फेब्रुवारी इ.स. २०१३यशस्वी
पीएसएलव्ही सी-२२आयआरएनएसएस १ ए१ जुलै इ.स. २०१३यशस्वी
पीएसएलव्ही सी-२३स्पॉट-७ व इतर३० जून इ.स. २०१४यशस्वी
पीएसएलव्ही सी-२४आयआरएनएसएस १ बी४ एप्रिल इ.स. २०१४यशस्वी
पीएसएलव्ही सी-२५मंगलयान५ नाेव्हेंबर इ.स. २०१३यशस्वी
पीएसएलव्ही सी-२६आयआरएनएसएस १ सी१६ ऑक्टोबर इ.स. २०१४यशस्वी
पीएसएलव्ही सी-३७कार्टोसॅट-२ डी,आयएनएस-१ए,
आयएनएस-१बी
१५ फेब्रुवारी इ.स. २०१७यशस्वी[१]

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे