फर्मी गॅमा किरण अंतराळ दुर्बीण

फर्मी गॅमा किरण अंतराळ दुर्बीण ही गॅमा किरणांमध्ये खगोलीय स्रोतांचा वेध घेणारी अंतराळ वेधशाळा आहे. फर्मीला ११ जून २००८ रोजी नासाच्या डेल्टा २ या रॉकेटमधून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आले. नासा, यू.एस. ऊर्जा विभाग त्याचबरोबर फ्रान्स, जर्मनी, जपान, इटली आणि स्वीडन या देशातील सरकारी संस्थांच्या सहयोगाने या वेधशाळेची निर्मिती करण्यात आली.[३]

फर्मी गॅमा किरण अंतराळ दुर्बीण
Fermi Gamma-ray Space Telescope
साधारण माहिती
इतर नावे गॅमा-रे लार्ज एरिया स्पेस टेलिस्कोप
एनएसएसडीसी क्रमांक २००८-०२९ए
संस्थानासा · यू.एस. ऊर्जा विभाग
मुख्य कंत्राटदार जनरल डायनामिक्स[१]
सोडण्याची तारीख ११ जून, २००८
कुठुन सोडली केप कॅनावेरल, अमेरिका
सोडण्याचे वाहन डेल्टा २ ७९२०-एच
प्रकल्प कालावधी नियोजित: ५-१० वर्षे
पश्चात: &0000000000000015.000000१५ वर्षे, &0000000000000362.000000३६२ दिवस
कक्षेचा प्रकार भूकेंद्रीय कक्षा
कक्षेची उंची अर्धदीर्घ अक्ष: ६,९१२.९ किमी (४,२९५.५ मैल)
उत्केंद्रता: ०.००१२८२
अपसूर्य बिंदू: ५२५.९ किमी (३२६.८ मैल)
उपसूर्य बिंदू: ५४३.६ किमी (३३७.८ मैल)
कल: २५.५८ अंश
कक्षेचा कालावधी ९५.३३ मिनिटे
फिरण्याचा वेग ७.५९ किमी/से
तरंगलांबीkeV - ३०० GeV पेक्षा जास्त[२]
उपकरणे
GBM Gamma-ray Burst Monitor
LAT Large Area Telescope
संकेतस्थळ
fermi.gsfc.nasa.gov

यातील लार्ज एरिया टेलिस्कोप हे मुख्य उपकरण आहे. खगोलशास्त्रज्ञ याचा वापर मुख्यत: संपूर्ण आकाशाचा गॅमा किरणांमध्ये सर्व्हे करून सक्रिय दीर्घिकीय केंद्रक, पल्सार व इतर उच्च ऊर्जेचे स्रोत आणि कृष्णद्रव्य यांच्या अभ्यासासाठी करतात. यातील गॅमा-रे बर्स्ट मॉनिटर या दुसऱ्या उपकरणाचा गॅमा किरण स्फोटांचा अभ्यास करण्यासाठी वापर केला जातो.[४]

फर्मीपासून मिळणारा डेटा सर्वांसाठी खुला असून तो फर्मी सायन्स सपोर्ट सेलच्या संकेतस्थळावरून मिळवता येऊ शकतो. डेटाचे विश्लेषण करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअरसुद्धा सर्वांसाठी उपलब्ध आहे.

दृश्यफित: फर्मी काय आहे? (इंग्रजीतून)
प्रक्षेपणापूर्वी फर्मी

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन