फार्स प्रांत

फार्स (फारसी: استان فارس , ओस्तान-ए-फार्स ) हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. इराणचे सांस्कृतिक हृदय मानला जाणारा हा प्रांत देशाच्या दक्षिणांगास असून शिराझ येथे याची राजधानी आहे. भौगोलिक विस्तारानुसार याने १,२२,६०८ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ व्यापले असून येथे ४५.७ लाख लोकसंख्येची वस्ती आहे. प्रांताच्या एकूण लोकसंख्येपैकी ६१.२ % प्रजा शहरी भागात वसत असून, ३८.१ % प्रजा ग्रामीण भागात वसते, तर ०.७ % प्रजा भटकी आहे.

फार्स
استان فارس
इराणचा प्रांत

फार्सचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
फार्सचे इराण देशामधील स्थान
देशइराण ध्वज इराण
राजधानीशिराझ
क्षेत्रफळ१,२२,६०८ चौ. किमी (४७,३३९ चौ. मैल)
लोकसंख्या४५,६९,२९२
घनता३७ /चौ. किमी (९६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२IR-07

आजच्या फार्स प्रांताचा भूप्रदेश इराणी लोकांचे मूळ वसतिस्थान मानला जातो. फारसी या शब्दाची व्युत्पत्ती याच भूप्रदेशाच्या अभिधानातून झाली आहे.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: