बदनापूर विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

बदनापूर विधानसभा मतदारसंघ - १०२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, बदनापूर मतदारसंघात जालना जिल्ह्यातील १. बदनापूर तालुका, २. भोकरदन तालुक्यातील हसनाबाद आणि राजूर ही महसूल मंडळे आणि २. अंबड तालुक्यातील जामखेड, धनगर पिंपरी, अंबड ही महसूल मंडळे आणि अंबड नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. बदनापूर हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे नारायण तिलकचंद कुचे हे बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

वर्षआमदार[४]पक्ष
२०१९नारायण तिलकचंद कुचेभारतीय जनता पक्ष
२०१४नारायण तिलकचंद कुचेभारतीय जनता पक्ष
२००९संतोष वसंतलाल सांबरेशिवसेना

रमेश माने खराडी

निवडणूक निकाल

संदर्भ

बाह्य दुवे