बॉर्डर-गावस्कर चषक

(बॉर्डर-गावसकर चषक या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी क्रिकेट सामन्यांत विजयी संघाला देण्यात येणाऱ्या चषकाला बॉर्डर-गावस्कर चषक असे नाव आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार व अष्टपैलू खेळाडू ऍलन बॉर्डर व भारताचा माजी कर्णधार व आघाडीचा फलंदाज सुनिल गावस्कर ह्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ ह्या मालिकेला हे नाव दिले गेले आहे.

बॉर्डर-गावस्कर चषक
बॉर्डर-गावस्कर चषक
आयोजकक्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि बीसीसीआय
प्रकारकसोटी
प्रथम१९९६-९७
शेवटची२०१८-१९
पुढील२०२०-२१
स्पर्धा प्रकारमालिका
संघ
यशस्वी संघभारतचा ध्वज भारत (७ विजेतीपदे)[१]
सर्वाधिक धावाभारत सचिन तेंडूलकर (३,२६२)[२]
सर्वाधिक बळीभारत अनिल कुंबळे (१११) [३]
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९

खालील तक्त्यामध्ये बॉर्डर-गावस्कर चषकाचा इतिहास दिला आहे.

वर्षठिकाणनिकालमालिकावीर
१९९६-९७भारतचा ध्वज भारतएकमेव कसोटी सामना भारताने जिंकला (१-०)नयन मोंगिया
१९९७-९८भारतचा ध्वज भारततीन सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकलीसचिन तेंडुलकर
१९९९-२०००ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियातीन सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने ३-० अशी जिंकलीसचिन तेंडुलकर
२०००-०१भारतचा ध्वज भारततीन सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकलीहरभजन सिंग
२००३-०४ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाचार सामन्यांची मालिका १-१ बरोबरीत सुटलीराहुल द्रविड
२००४-०५भारतचा ध्वज भारतचार सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकलीडेमियन मार्टिन
२००७-०८ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाचार सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकलीब्रेट ली
२००८-०९भारतचा ध्वज भारतचार सामन्यांची मालिका भारताने २-० अशी जिंकलीइशांत शर्मा
२०१०-११भारतचा ध्वज भारतदोन सामन्यांची मालिका भारताने २-० अशी जिंकलीसचिन तेंडुलकर
२०११-१२ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाचार सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने ४-० अशी जिंकलीमायकेल क्लार्क
२०१२-१३भारतचा ध्वज भारतचार सामन्यांची मालिका भारताने ४-० अशी जिंकलीरविचंद्रन आश्विन
२०१४-१५ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाचार सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने २-० अशी जिंकलीस्टीव्ह स्मिथ
२०१६-१७भारतचा ध्वज भारतचार सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकलीरवींद्र जडेजा
२०१८-१९ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाचार सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकलीचेतेश्वर पुजारा
२०२०-२१ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाचार सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकलीपॅट कमिन्स
२०२२-२३भारतचा ध्वज भारत

संदर्भ आणि नोंदी