मराठी लोक

मराठी भाषा बोलणारे लोक


मराठी लोक (महाराष्ट्रीय) हा गट मूळचा भारतीय उपखंडातील असून, दक्षिण भारताच्या दख्खन/डेक्कन प्रांत किंवा सध्याचे महाराष्ट्र राज्य, ह्या ठिकाणी या लोकांचे मूळ निवासस्थान आहे. मराठी ही त्यांची मातृभाषा असून, ती इंडो-आर्यन दक्षिण विभाग समूहातील एक प्रमुख भाषा आहे. मराठी माणसांचा लष्करी इतिहास हा असामान्य आहे. इंग्रजांच्या भारताच्या प्रवेशापूर्वी मराठा साम्राज्य हे भारतीय उपखंडात पसरले होते.महाराष्ट्र ह्या शब्दाचा अपभ्रंश माराष्ट्र महाराष्टे भवा: माहाराष्ट्रा:। माराष्ट्र म्हणजे मराठा. मराठा ह्या शब्दाचे दोन अर्थ, यादव, चव्हाण, जाधव, मोरे, जगताप, संकपाळ, सोनवणे, शिर्के, शिंदे, जाधव इत्यादी जे क्षत्रिय ह्यांना महाराष्ट्रिक अशी प्राचीन संज्ञा होती. त्यांना प्रथमारंभी मराठा हे उपपद अन्यव्यावृत्यर्थ लावीत. महाराष्ट्रिकांनी वसविलेला जो देश त्याला महाराष्ट्र असे नाव पडले. नंतर त्या देशात ब्राह्मणांपासून अंत्यजापर्यंत जेवढे म्हणून हिंदू वर्ण होते त्यांना "माराष्ट्र ऊर्फ मराठा ही व्यापक संज्ञा लावण्याचा प्रघात चालू झाला." ह्या व्यापक संज्ञेने विशिष्ट जे सर्व लोक त्यांचा जो धर्म तो महाराष्ट्रधर्म म्हणावा. भिन्न वर्ण, भिन्न गोत, भिन्न कर्म, भिन्न आचार, भिन्न पहिराव, भिन्न भूषणे, भिन्न भाषा, भिन्न कुळ्या, इत्यादीनाना उपभेद ह्या मराठ्यांत यद्यपि असले तत्रापि कांही धर्म ह्या लोकांत सामान्य आहेत. धर्म चार:- (१) देशाचार, (२) कुळाचार, (३) वंशाचार, (४) देवशास्त्राचार, आचारप्रधानो धर्मः। आचाराला प्रविणाचार्य धर्म म्हणतो. (१) देशधर्म, (२) कुळधर्म,(३) वंशधर्म, (४) देवधर्म. याज्ञवल्क्यादि ऋषींनी प्रचलित केला जो आचार, व्यवहार, प्रायश्चित्तादि त्रिविध धर्म तो देशधर्म. कुळात म्हणजे गोतात ज्या कुळमान्य चाली-रीती त्या कुळधर्म, वंशांत जे प्रचलित धर्म ते वंशधर्म. आणि देवसंबंधक जी कर्तव्ये ती देवधर्म. देशधर्म, कुळधर्म, वंशधर्म व देवधर्म ह्या चार धर्मांच्या अनुज्ञेप्रमाणे आपापल्या धर्मी सर्वांनी वर्तावे. त्यांत महाराष्ट्रधर्माची पहिली खूण म्हणजे, सर्वात ब्राह्मण श्रेष्ठ, हे मत मान्य असणे, तो सर्वाचा गुरू, देव गुरूरूपे सर्वास रक्षिता, सुख देता, मुक्तिदेता. हा धर्म सर्व धर्माचा जीव, म्हणून प्रविणाचार्य सांगतो. ही महाराष्ट्र धर्माची दुसरी खूण. प्रत्यही स्नान करणे ही, महाराष्ट्र धर्माची तिसरी खूण. मूळ महाराष्ट्रधर्म म्हणजे (१) स्नान, (२) गुरुपदेश, (३) मंत्रजप प्रत्यही करावा, स्नान म्हणजे शुचिर्भूतपणा, गुरुपदेश म्हणजे सर्व जातीत श्रेष्ठ जो ब्राह्मण त्याने उपदिष्ट जो आचार व्यवहार प्रायश्चितादि धर्मसमूह तो. आणि मंत्रजप म्हणजे गुरुपदेशानुरूप श्रद्धायुक्त आचरण. तीर्थगुरू तीर्थाचा स्थळगुरू, स्थळाचा, श्रीगुरू कुळाचा व जगद्गुरू जगताचा म्हणजे सर्व देशाचा. जगद्गुरू तोच शंकराचार्य. शंकराचार्यांनी धर्मस्थापना केली. [[दक्षिणेस सेतुबंध रामेश्वर, उत्तरेस काशी, पश्चिमेस द्वारका व पूर्वेस तुळजापुर, यांच्या मधील जो पुण्यदेश तो महाराष्ट्र धर्माचे स्थान.]]

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


मराठी माणसे (महाराष्ट्रीय)



छ. शिवाजी महाराजडॉ. बाबासाहेब आंबेडकर
ज्योतिबा फुलेबाळ गंगाधर टिळक
धुंडिराज गोविंद फाळकेसंत तुकाराम
सचिन तेंडुलकरमाधुरी दीक्षितरजनीकांत
एकूण लोकसंख्या

आठ ते नऊ कोटी

लोकसंख्येचे प्रदेश
प्रमुख लोकसंख्या

लक्षणीय लोकसंख्या

इतर

भाषा
मराठी
धर्म
हिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन, यहुदी
संबंधित वांशिक लोकसमूह
इंडो-युरोपीय, इंडो-इराणी, इंडो-आर्यन
*[[जो जो म्हणून स्वतःस माराष्ट्र म्हणवितो त्याने हा लक्षण त्रयांकित माराष्ट्रधर्म आचरिला पाहिजे. पैकी मराठा क्षत्रिय जो आहे त्याने कुक्कुटशब्दा (कोंबडा आरवल्या) पासोन उठावे, शौचस्नान संपादावे, देवपूजन नित्यकर्म आचार्य युक्त करावे, शास्त्र वचनाधारे न्याय निवडावा, पुराणेतिहास प्रत्यही आयकावा, व शस्त्र कमरेस बांधून भोजन सारावे, कदापि गाफील न रहावे, असे शास्त्रोक्त धर्मचोदित आचरण जो करील तो क्षत्रिय. गर्भादान, पुंसवन, चौल, व्रतबंध, विवाह, महोत्सव, विद्यारंभ,  इत्यादी कर्मे वेदोक्त करण्यास सर्वथा योग्य होय. ह्या धर्मापासून पतित असे बहुत राजे शंकराचार्ये शुद्ध केले. काही तसेच अशुद्ध राहिले त्यास निराळी पद्धती नेमून दिली. विप्रांस वैदिक मंत्र, अशुद्ध क्षत्रियांस पौराणिक मंत्र व शूद्रांस तांत्रिक पद्धत शंकराचार्यांनी घालून दिली. हे अशा स्वरूपाचे प्रविणाचार्य महाराष्ट्रधर्माचे विवरण करत आहे.]] विवरणावरून स्पष्टच होते की महाराष्ट्र धर्म म्हणजे केवळ महाराष्ट्राचा रहीवासी नव्हे. तर महाराष्ट्रधर्म म्हणजे देशधर्म + जाति धर्म + कुलधर्म + वंशधर्म + देवधर्म होय. महाराष्ट्रांतील देशधर्म म्हणजे याज्ञवक्ल्यस्मृतीवर विज्ञानेश्वराने केलेल्या टीकेत सांगितलेले सर्व धर्म. जातिधर्म म्हणजे प्रत्येक जातीचे विशिष्ट धर्म.    

१} कुलधर्म म्हणजे प्रत्येक कुलाचे विशिष्ट धर्म, २} वंशधर्म म्हणजे उपकुलांचे ऊर्फ वंशांचे धर्म. ३} देवधर्म म्हणजे देशांत, जातीत, कुलांत, वंशात मान्य असलेल्या देवासंबंधाने व स्वतः व्यक्तिमात्राला इष्ट असलेल्या देवते संबंधाने कर्तव्ये. हे सर्व धर्म मिळून महाराष्ट्रधर्म ऊर्फ माराष्ट्रधर्म होतो. महाराष्ट्रधर्माची मुख्य व एकच एक खूण म्हटली म्हणजे गुरुत्वाच्या नात्याने सर्व धर्मसंबंधक कर्मांचे ब्राह्मणाच्या म्हणजे तीर्थगुरूच्या किंवा स्थलगुरूच्या किंवा कुलगुरूच्या किंवा जगद्गुरूच्या हस्ते संपादन. ब्राह्मणाच्या हस्ते जो कोणी कोणचे ही धर्मकर्म संपादू इच्छीत नाही तो महाराष्ट्रधर्मी नव्हे. अशा ब्राह्मण द्वेष्ट्याला जुन्या काळी पाखंडी म्हणत व धर्मबाह्य म्हणजे कायद्याच्या व रूढीच्या बाहेरचा पतित समजत.

ज्या प्रमाणे जाणा-या राजा पुढे उग्र, प्रत्येनस्, सूत व ग्रामणी एकत्र गोळा होतात; त्या प्रमाणे, अंतकाली प्राणी उर्ध्वश्वासी होतो तेव्हा आत्म्यापुढे सर्व प्राण गोळा होतात. त्या दोन कंडिकांत उग्र, प्रत्येनस्, सूत व ग्रामणी, ह्या चार कामदारांचा निर्देश केलेला आहे. ग्रामणी म्हणजे गावाचा गावुडा, मुख्य पुढारी इत्यादि. सूत म्हणजे रथकार, भाट, उग्र म्हणजे लढाऊ शिपाई. आणि प्रत्येनस म्हणजे चोराचिलटांचा बंदोबस्त करणारा पोलिस. आदी शंकराचार्य ह्या शब्दांचा असा अर्थ देतातः- 

"उग्रा: जातिविशेषाः क्रूरकर्माणो वा। प्रत्येनस: प्रति प्रति एनसि पापकर्मणि नियुक्ताः प्रत्येनसः तस्करा-दिदंडनादौ नियुक्ताः। सूताःचे ग्रामण्यःच सूतग्रामण्यः। सूता: वर्णसंकरजाति विशेषाः। ग्रामण्यः ग्रामनेतारः।" अर्थ:- ग्रामणी अन्नपाण्याचा पुरवठा करी; सूत तंबू, रथ वगैरेच्या दुरुस्तीच्या कामी उपयोगी पडे; उग्र रखवालदारीचे कार्य संपादी; आणि प्रत्येनस् चोराचिलटा पासूनचे भय निवारी. उग्राः, प्रत्येनसः, सूताः, ग्रामण्यः हे सर्व शब्द अनेक वचनी आहेत. तेव्हा उघडच झाले की, शिपाई, गावचे पुढारी, डागडूजी करणारे रथकार व पोलीस हे राजाचे सेवक.

शब्दस्रोत

मराठ्यांच्या साम्राज्याचा झेंडा


मराठी ही यादव राजवटी मध्ये राजभाषा होती.यादव राजा सिंघण हे त्यांच्या दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध होते. त्याच्या दानशूर पणाबद्दलची माहिती ही मराठी शिलालेखांच्या स्वरूपात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात पहायला मिळते. हेमाद्री सारख्या विद्वान व्यक्तींच्या रचनाही मराठीत उपलब्ध आहेत. हेमाद्री यांची हेमाडपंती मंदिरांची रचना प्रसिद्ध आहे.
मराठीतील शिलालेख हे रायगड मधील आक्षी, पाटण, पंढरपूर वगैरे ठिकाणी आहेत. या शिलालेखांपैकी सर्वांत लोकप्रिय शिलालेख हा कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या (बाहुबली) पायाशी आहे. हा लेख खालीलप्रमाणे आहे.
चामुंडराये करवियले, गंगाराये सुत्ताल करवियाले....
या शिलालेखामधून पुतळ्याचे शिल्पकार व तत्कालीन राजाबद्दल माहिती मिळते. हा पुतळा श्रवणबेळगोळ

महाराष्ट्राचा इतिहास

प्राचीन ते मध्ययुगीन इतिहास कालखंड

इ.स.पू. २३० साली महाराष्ट्रात सातवाहन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता.

सन १६०० पूर्वीचा मराठ्यांचा इतिहास (छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वीचा)

उपलब्ध असलेल्या सर्वांत पुरातन माहितीनुसार हल्ली महाराष्ट्र या नावाने ओळखला जाणारा प्रदेश पूर्वी "दंडकारण्य" म्हणून ओळखला जात होता. दंडकारण्य या शब्दाचा अर्थ "कायद्याचे राज्य असलेले अरण्य" असा आहे.

इसवी सन पूर्व ६०० मध्ये महाराष्ट्र हा प्रदेश हे एक महाजनपद होते. इसवी सन पूर्व २३० मध्ये स्थानिक राजघराणे सातवाहन हे महाराष्ट्रात सत्तेवर आले. प्रतिष्ठाण येथील या घराण्याने पुढे उत्तर कर्नाटक व आंध्र प्रदेशातील विजयानंतर एक मोठे साम्राज्य स्थापन केले.आजचे चंद्रवंशी अत्री गोत्राचे, पणकनीस देवक लावनारे मराठी लोक हे या साम्राज्याचे वंशज आहेत. हे साम्राज्य गौतमपुत्र सत्कर्णी उर्फ शालिवाहन याच्या काळात उत्कर्षाला पोचले. हे शालिवाहन महाभारतातील पांडवांपैकी अर्जून पुत्र अभिमन्यूच्या वंशजांपैकी एक वंश. शालिवाहन राजाने नवीन दिनदर्शिका व कालगणना सुरू केली. शालिवाहन शक नावाची ही कालगणना मराठी माणसांकडून आजही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. या साम्राज्याचा अस्त इसवी सन ३०० च्या आसपास झाला. मराठीच्या पूर्वीची भाषा असलेल्या महाराष्ट्री भाषेचा वापर सातवाहन काळात सुरू झाला.सातवाहन काळानंतर या प्रदेशावर अनेक लहान लहान राजघराण्यांनी राज्य केले. हा प्रदेश पुढे आठव्या शतकात राष्ट्रकूट घराण्याने जिंकून आपल्या राज्याला जोडला. राष्ट्रकूट घराण्याच्या पाडावानंतर येथे देवगिरीच्या यादवांचे राज्य आले. त्यांनी मराठी ही अधिकृत भाषा बनवली. त्यांचे राज्य १३ व्या शतकापर्यंत चालले. पुढे हा प्रदेश मुस्लिम साम्राज्यांतर्गत आला. दख्खनच्या सुलतानीच्या अमलाखाली महाराष्ट्र सुमारे तीन शतके होता.

मराठा साम्राज्य

मराठा साम्राज्याचा विस्तार इ.स.१७६०, ज्या काळात मराठा साम्राज्य आपल्या शिखरावर होते.(पिवळ्या रंगाने दर्शविले आहे)

१७ व्या शतकाच्या मध्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. अनेक विजय व असामान्य कामगिरीनंतर शिवाजी महाराजांचे १६८० मध्ये निधन झाले. शिवाजी महाराजांकडून अनेक वेळा पराभव झालेल्या मोगलांनी १६८१ मध्ये महाराष्ट्रावर आक्रमण केले. शिवाजी महाराजांचे चिरंजीव संभाजी हे छत्रपतींच्या मृत्यूनंतर राजगादीवर आले. तुलनेने अधिक बलवान शत्रूशी लढा देताना छत्रपती संभाजींनी मराठ्यांचे उत्कृष्ट नेतृत्व केले. संभाजी एकही किल्ला किंवा प्रदेश हरले नाही. मात्र १६८९ मध्ये फितुरीमुळे औरंगजेबाच्या हाती सापडल्यानंतर संभाजींची क्रूरपणाने हत्या करण्यात आली. आपल्या नेत्याच्या मृत्यूमुळे निर्नायकी व निराश झालेल्या मराठ्यांचे नेतृत्व संभाजींचा धाकटा भाऊ राजाराम यांनी केले. त्यांच्या मृत्यूनंतर साम्राज्याची सूत्रे पत्नी ताराराणींनी घेतली. आपल्या अज्ञान मुलांच्या नावाने स्वतः राज्य कारभार पाहिला. पण त्याच वेळी औरंगजेबाच्या कैदेत असणाऱ्या शाहू यांनी मोर्चेबांधणी करून ताराराणीविरुद्ध बंड केले. मराठा सरदारांनी मध्यस्थी करून ताराराणीस कोल्हापूरची व शाहूस सातारची गादी दिली. पुढे शाहूने पेशवाई पंतप्रधान निर्माण करून बाळाजी विश्वनाथ यास पहिला पेशवा केले. त्यानंतर राज्य चालविण्याची जबाबदारी पेशव्यांच्या डोक्यावर आली. पहिला बाजीराव आणि बाळाजी बाजीराव यांनी मोठा साम्राज्यविस्तार केला. त्यांच्या काळखंडात संपूर्ण उपखंडावर मराठ्यांची सत्ता होती. पुणे हे सत्तेचे केंद्र झाले होते. मात्र पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर हे साम्राज्य छोट्या छोट्या प्रदेशात विभागले गेले. ब्रिटिशांनी दुसऱ्या बाजीरावाचा पराभव करेपर्यंत महादजी शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे हे प्रदेश एकत्र होते.

ब्रिटिश राजवट

बहुसंख्य मराठी लोक हे हिंदू आहेत.[१] अल्पसंख्यकात जैन, ख्रिश्चन, मुस्लिम आणि यहूदी यांचा समावेश होतो.[१]

सामाजिक इतिहास

ब्रिटिश शासनाच्या आधी, महाराष्ट्र प्रदेश अनेक राजस्व विभागात विभागला गेला. एक काउंटी किंवा जिल्हा मध्ययुगीन परगणासमतुल्य होते. परगणा प्रमुखांना देशमुख असे म्हटले गेले आणि रेकॉर्ड कपाट्यांना देशपांडे असे म्हटले गेले. गाव हे सर्वात कमी प्रशासकीय एकक होते. मराठी भागातील ग्रामीण समाज, पाटील किंवा गावाचे प्रमुख, महसूल गोळा करणारा आणि गावाचे रेकॉर्डकीपर कुलकर्णी हे गावकरी गणले जात. अशी वंशानुगत स्थिती होती. गावात बलुते नावाचे बारा वारसा सेवक देखील असत. बलुते यंत्रणा कृषी क्षेत्राला पाठिंबा देणारी होती. या प्रणालीच्या अंतर्गत शेतकरी शेतकऱ्यांना आणि गावाच्या आर्थिक व्यवस्थेला सेवा प्रदान करीत. या प्रणालीचा आधार जात होता. नोकर त्यांच्या जातींसाठी विशिष्ट कार्यांसाठी जबाबदार होते. बारा बलुते यांच्यामध्ये बारा प्रकारचे नोकर होते; हे जोशी (ब्राह्मण जातीचे गावचे पुजारी आणि ज्योतिषी), सोनार (दवाईदान्या जातीचे सुवर्ण), मातंग (दोरखंड तयार करणे), सुतार (सुतार), गुरव (देवळाचे पुजारी), न्हावी , परीट (वॉशरमन), कुंभार (कुंभार), चांभार (काॅबलर), धोर, कोळी (मच्छीमार किंवा जलवाहक), चौगुले (पाटलाचे साहाय्यक) आणि महार (गावचे चौकीदार आणि इतर कार्ये).

जाती आणि समाज

मराठी लोक लोक भाषा, इतिहास, सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथा, सामाजिक संरचना, साहित्य आणि कला यांसारख्या दृष्टीने इतरांपेक्षा वेगळे आहेत[२]

हिंदू जाती-समाज

  • बारी - हा समाज प्रामुख्याने अमरावती, यवतमाळ, अकोला, पुणे, नागपूर या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे.हा उच्चविद्याविभूषित क्षत्रिय समाज आहे.
  • आगरी - हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवीमुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्‍नागिरी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे. भातशेती हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. आगरी लोक खाऱ्या पाण्यापासून मीठ बनवतात.
  • चांभार – जनावरांच्या कातडीपासून वस्तू बनवणे हा यांचा परंपरागत व्यवसाय आहे. हा समाज अनुसूचित जातीत मोडतो. २०११ मध्ये यांची लोकसंख्या १२ लाख होती.
  • माळी -माळी ही भारतात आढळून येणारी एक व्यावसायिक जात आहे. हा समाज पारंपरिकपणे मळे लावणारा किंवा मळेवाला म्हणून काम करत होता. माळी समाज हा मुखत्वे शेती करणारा कुणबी समाजाशी साम्य असलेला समाज आहे. काही ठिकाणी हा समाज बलुतेदार आहे तर काही ठिकाणी अलुतेदार आहे.
  • चांद्रसेनीय कायस्थ प्रभू – हा उच्च-विद्याविभूषित क्षत्रिय समाज आहे.
  • भोई - अहिराणी भाषा बोलणाऱ्या २२ उप-जातींपैकी एक हा समाज आहे.
  • लोणारी - हा कोळसे तयार करणारा समाज आहे हा "कुणबी"या जातसमूहातील एक उपजातसमूह आहे. हे प्राचीन भारताच्या महाजनपदातील "मल्लवंशीय" आहेत. सद्या महाराष्ट्रात त्यांचा ओ.बी.सी.वर्गात समावेश आहे.
  • धनगर – हा मेंढ्या पाळणारा समाज आहे. महाराष्ट्रात भटक्या विमुक्त जातीत यांचा समावेश होतो.
  • कासार - हा समाज तांब्याची भांडी बनविणारा व विकणारा तसेच बांगड्या विकणारा समाज आहे.
  • गुरव – हा समाज हिंदू मंदिरात पाहिला जातो कारण पुजारी ह्यांचा परंपरागत व्यवसाय आहे.
  • कोळी – हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्‍नागिरी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे. भातशेती व मासेमारी हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे.
  • कुणबी — हा शेती करणारा समाज आहे. उच्चवर्णीय मराठा समाज याला स्वतःचीच उपजाती मानतो. याची राज्यात १५% संख्या आहे. हा ओबीसी प्रवर्गात मोडतो.
  • मातंग – झाडे व त्यांच्या पानांपासून दोर, झाडू इत्यादी वस्तू बनवणे ह्या समाजाचा परंपरागत व्यवसाय आहे. गावातील विविध समारंभात दफडी वाजवणे, दवंडी देणे सुद्धा ह्या समाजाचा व्यवसाय आहे. हा समाज अनुसूचित जातीमध्ये मोडतो. २०११ मध्ये यांची संख्या २१ लाख आहे.
  • मराठा – हिंदू वर्णव्यवस्थेमध्ये हा समाज पहिल्यापासून उच्चवर्गीय क्षत्रिय वर्गात गणला गेला आहे. महाराष्ट्रात यांची संख्या १५% आहे.
  • महार – हा समाज महाराष्ट्राच्या लोकसंख्येत १०% आहे.[३] बहुतेक सर्व महार समाजाने सन १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुकरण करत बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. दलितांच्या हक्कांसाठी हा समाज सर्वाधिक संघर्ष करीत असतो.[४][५] हा अनुसूचित जातीत मोडतो.
  • पाठारे प्रभु – गेल्या अनेक शतकांपासून हा समाज मुंबईत राहतो. मुंबईतील मूळ शासनकर्ता क्षत्रिय समाज हाच आहे.
  • वंजारी — काही शतकांपूर्वी पासून राजस्थानमधून महाराष्ट्रात, त्यातही मराठवाड्यात स्थलांतरित झालेला हा समाज आहे.
  • रामोशी
  • वाणी – हा व्यापार करणारा समाज आहे.
  • आरे, आर्य क्षत्रिय - सैनिकांचा आणि शेतकऱ्यांचा हा समाज आहे. हा समाज मूळ तेलुगू भाषिक प्रांतातील असून तीनशेहून अधिक वर्षापासून महाराष्ट्रात स्थायिक झालेला आहे.
  • गवळी - हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्‍नागिरी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे. भातशेती हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. गवळी लोक जोडधंदा म्हणून पशुपालन आणि दुग्धोत्पादन करतात.
  • कामाठी : जुन्या मुंबईतील बहुसंख्य इमारती, मुंबई-पुणे रेल्वे लाईन आण बोगदे या जमातीतील लोकांनी बांधले.
  • तेली समाज: हा समाज विदर्भामध्ये जास्त प्रमाणात आढळतो.पूर्वीच्या काळात तेल काढणाऱ्यास/विकनार्यास तेली म्हणायचे.हा समाज १८ पगड जातीपैकी एक होता.हा समाज (OBC) अनुसूचित जाती प्रवर्गात मोडतो.
  • नाभिक/वारिक: हा समाज केस कापन्याचा व्यवसाय करतो.

अ-हिंदू समाज

महाराष्ट्राबाहेरील मराठी लोक

भारताच्या दुसऱ्या राज्यात

जसे मराठा साम्राज्य भारतभरात पसरले तसतसे मराठी लोक त्यांच्या शासकांच्या बरोबर महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित झाले. जेव्हा पेशवे, होळकर, सिंधिया आणि गायकवाड या वंशाच्या नेत्यांनी महाराष्ट्राबाहेरील नवीन जागा जिंकल्या, तेव्हा ते त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने मराठी प्रशासक, कारकून, पुजारी, सैनिक, व्यापारी आणि कामगार घेऊन गेले.१८व्या शतकापासून हे लोक आपल्या शासकासोबत भारताच्या विविध भागामध्ये स्थायिक झाले आहेत. २०० वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांचे महाराष्ट्राबाहेर वास्तव्य असले तरीही या गटांतील अनेक कुटुंबे ठरावीक जुन्या मराठी परंपरेचे पालन करतात.

भारताबाहेरील मराठी

१९व्या शतकात मोठ्या संख्येने भारतीय लोक मॉरिशस, फिजी, दक्षिण आफ्रिका, त्रिनिदाद आणि टोबॅगो, गयाना, सुरिनाम , आणि जमैका येथे ऊसलागवडीसाठी काम करण्यासाठी वेठबिगार मजूर म्हणून नेले गेले. बहुतेक स्थलांतरित हिंदुस्थानी भाषा बोलणारी किंवा दक्षिण भारतीय होती, तथापि, मॉरिशसला स्थलांतरित करणाऱ्या माणसांमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी लोक होते.

पानिपतात लढलेले बलुची सन्य हे वेगवेगळ्या बलुची जमातींनी बनलेले होते. त्यामुळे मराठे युद्धकैदीही पानिपतात लढलेल्या निरनिराळ्या बलुची जमातींना विभागून देण्यात आले. मराठा युद्धकैद्यांची संख्याही बरीच मोठी होती. आणि सगळ्या मराठय़ांना एकाच ठिकाणी ठेवण्यात मोठा धोकाही होता. त्यामुळे या युद्धकैद्यांना विभागण्याचा निर्णय मीर नासीर खान नुरी याने घेतला.

संस्कृती

खानपान

marathi people was eat thebhaji and bhakari and also zunaka bhakari now in modern life they eat some forign foods because litercy is incresing so also they eat there ancient food (traditional foods)

पोशाख

रोटरी क्लब पार्टीसाठी पारंपारिक नऊवारी लुगडे परिधान केलेल्या महिला

बाह्य दुवे


संदर्भ