माधुरी बळवंत पुरंदरे


माधुरी पुरंदरे (जन्म दिनांक : २९ एप्रिल १९५२ - हयात), या मराठी भाषेतील एक लेखिका आहेत.[ संदर्भ हवा ] बाबासाहेब पुरंदरे हे त्यांचे वडील आणि समाजसेविका निर्मला पुरंदरे ह्या त्यांच्या आई आहेत. मराठीची काव्य-संगीत समृद्धी चंद्रकांत काळे यांच्यासह आखलेल्या अनेक विशेष कार्यक्रमांतून श्रोत्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या त्या गायिका-अभिनेत्री आहेत.[ संदर्भ हवा ]

माधुरी बळवंत पुरंदरे
जन्म२९ एप्रिल, १९५२
महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य, नाटक, संगीत, चित्रपट
भाषामराठी
साहित्य प्रकारकथा, कादंबरी, चरित्र, भाषांतर
वडीलबाबासाहेब पुरंदरे
आईनिर्मला पुरंदरे
पुरस्कार‘पिकासो’ पुस्तकासाठी केशवराव कोठावळे पारितोषिक (१९८९), समग्र बालसाहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार (२०१४), टाटा ट्रस्टतर्फे 'बिग लिटल बुक' पुरस्कार (२०१६)

शिक्षण

शालेय शिक्षण पुण्यात घेतल्यावर माधुरी पुरंदरे यांनी त्यांचे पुढील शिक्षण पुण्यातील अभिनव कला महाविद्यालय आणि मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे घेतले.[ संदर्भ हवा ] जे.जे. स्कूल ऑफ आर्ट'मधून जी.डी. आर्ट केल्यानंतर त्यांनी फ्रेंच शिष्यवृत्तीवर पॅरिस येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्टचे शिक्षण घेतले. फ्रान्स वास्तव्यात चित्रदालने, प्रदर्शने, चित्रपट, नाटके भरपूर पाहातानाच ‘एकटेपणाच्या अनुभवातून माणूस म्हणून समृद्ध’ होऊन भारतात परतल्या.[ संदर्भ हवा ]

कारकीर्द

माधुरी पुरंदरे या एक उत्तम गायिका आहेत. त्यांनी मंचावर सादर केलेली 'हमामा रे पोरा हमामा’ ही ज्ञानेश्वरांची रचना अतिशय गाजली आहे. ‘अमृतगाथा’, 'प्रीतरंग', 'साजणवेळा' आणि ‘शेवंतीचे बन’ हे त्यांचे गायनाचे कार्यक्रम श्रवणीय आहेत. ते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत.[ संदर्भ हवा ] जब्बार पटेल दिग्दर्शित ‘तीन पैशाचा तमाशा’ या नाटकामध्ये त्यांनी केलेली भूमिका आणि त्यात गायलेली गझल गाजली होती. वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्या द्वैमासिकाचे त्यांनी अनेक वर्षे संपादन केले.[ संदर्भ हवा ]

कादंबरी

एकांकिका

चरित्रे

अनुवादित[ संदर्भ हवा ]

  • झाडं लावणारा माणूस (२००१) (मूळ फ्रेंच लेखक : जॉं जिओनो)
  • त्वान आणि इतर कथा (१९९५) (मूळ फ्रेंच लेखक : गी द मोपासां)
  • न भयं न लज्जा (१९९८) (मूळ फ्रेंच लेखक : मोलिएर)
  • मोतिया (लोककथा)
  • वेटिंग फॉर गोदो (१९९६) (मूळ फ्रेंच लेखक : सॅम्युएल बेकेट)
  • व्हिन्सेंट व्हॅन गॉग (१९७७) (मूळ लेखक : आयर्व्हिंग स्टोन)
  • हॅनाची सूटकेस (२००८) (मूळ लेखक : करेन लेव्हिन)

फ्रेंचमध्ये भाषांतरे[ संदर्भ हवा ]

बालसाहित्य व कुमारसाहित्य[ संदर्भ हवा ]

  • आमची शाळा (मराठी, इंग्रजी) (२००५)
  • घोटाळा (मराठी, इंग्रजी, हिंदी) (२०२२)
  • आता का? (मराठी, हिंदी) (२०२२)
  • नाही माहित (मराठी, इंग्रजी, हिंदी) (२०२२)
  • नदीवर (मराठी, इंग्रजी, हिंदी, फ्रेंच) (२०२२)
  • आनंदी रोप (मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड) (२०२२)
  • मुखवटा (मराठी, इंग्रजी, हिंदी) (२०२२)
  • ठिपके (मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड) (२०२२)
  • रेषा (मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड) (२०२२)
  • एकशेसदतिसावा पाय (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड) (२०१५)
  • काकूचं बाळ (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगू) (२०१२)
  • किकीनाक (मराठी, इंग्रजी) (२००९)
  • खजिना (२०१३)
  • जादूगार आणि इतर कथा (१९९९)
  • त्या एका दिवशी (मराठी, इंग्रजी) (२०१२)
  • परी, मी आणि हिप्पोपोटॅमस (२०१४)
  • बाबाच्या मिश्या (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगू, बंगाली) (२०१२)
  • मासोळी आणि चिमुकलं पाखरू (मराठी, इंग्रजी) (२००५)
  • यशच्या गोष्टी (सहा पुस्तकांचा संच - कंटाळा, मामाच्या गावाला, पाहुणी, मुखवटे, मोठी शाळा, हात मोडला) (मराठी, इंग्रजी) (२००९)
  • राजा शहाणा झाला (मराठी, इंग्रजी) (२००५)
  • राधाचं घर (६ पुस्तकांचा संच; मराठी, इंग्रजी, फ्रेंच) (२००३)
  • लालू बोक्याच्या गोष्टी (मराठी, इंग्रजी) (२००९)
  • शेजार १ : सख्खे शेजारी (मराठी, इंग्रजी) (२०१४)
  • शेजार २ : पाचवी गल्ली (मराठी, इंग्रजी) (२०१४)
  • शाम्याची गंमत आणि इतर कथा (१९९९)
  • सुपर बाबा आणि इतर कथा (१९९९)

संपादन/संकलन/शैक्षणिक[ संदर्भ हवा ]

  • माय मराठी - सहसंपादन व सहलेखन (२०१४)
  • वाचू आनंदे - बाल गट १ व २, कुमार गट १ व २ (डिसेंबर २००१)

शैक्षणिक[ संदर्भ हवा ]

  • कागदी खेळ (मराठी, इंग्रजी) (२०१२)
  • चित्र वाचन - पोस्टर : भाग १ (२००३); भाग २ (२००६); पुस्तक (२००६) (मराठी, इंग्रजी)
  • लिहावे नेटके (भाग १, २, ३ व उत्तरे) (२०१०)

माधुरी पुरंदरे यांनी गायलेली हिंदी-मराठी गीते[ संदर्भ हवा ]

  • अगं अगं सखूबाई
  • कुणी धावा गं धावा
  • डेरा गं डेरा
  • देवळाच्या दारी
  • देवाचा गं देवपाट
  • देवा सूर्यनारायणा
  • पंढरीची वाट
  • माझी भवरी गाय
  • रात पिया के संग जागी रे सखी
  • सासों में दर्द, दर्द में सॉंसें बसी हुई हम में कोई, किसी में समायें हुएं हैं हम (चित्रपट आक्रोश)
  • हमामा रे पोरा हमामा
  • निळे हे व्योम
  • क्षण एक मना

ध्वनी फिती[ संदर्भ हवा ]

  • अमृतगाथा
  • कधी ते
  • कधी हे
  • प्रीतरंग
  • शेवंतीचं बन
  • साजणवेळा

पुरस्कार

  • केशवराव कोठावळे पारितोषिक (१९८९)
  • समग्र बालसाहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार (२०१४)[१]
  • द हिंदू यंग वर्ल्ड गुड बुक्स पुरस्कार (सर्वोत्कृष्ट रेखाटनासाठी विशेष उल्लेख - पाचवी गल्ली) (२०१६)[२]
  • टाटा ट्रस्टतर्फे पहिला 'बिग लिटल बुक' पुरस्कार (२०१६)[३][permanent dead link]

संदर्भ

बाह्य दुवे

माधुरी पुरंदरे यांना 'साहित्य अकादमी' - लोकसत्ता

ज्योत्स्ना प्रकाशन

राजहंस प्रकाशन

प्रथम बुक्स

पुरंदरे प्रकाशन Archived 2014-01-25 at the Wayback Machine.

ॲमेझॉन फ्रान्स

बुक गंगा

टाटा ट्रस्ट 'बिग लिटल बुक पुरस्कार'[permanent dead link]

विनिंग् हार्ट्स ॲन्ड अवॉर्डस् - द हिंदू

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन