मिलिंद बोकील

मराठी लेखक

मिलिंद बोकील (जन्मदिनांक १ मे १९६० - हयात) हे मराठी लेखक, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मराठी व इंग्रजी भाषांतून लेखन केले आहे. मिलिंद बोकील हे बारावीनंतरच जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीशी जोडले गेले. त्यांच्या "छात्र युवा संघर्ष वाहिनी‘त ते काम करत होते.

मिलिंद बोकील
जन्म नावमिलिंद बोकील
जन्म१ मे १९६०
कार्यक्षेत्रसाहित्य, सामाजिक कार्य
भाषामराठी
प्रसिद्ध साहित्यकृतीशाळा
स्वाक्षरीमिलिंद बोकील ह्यांची स्वाक्षरी

मिलिंद बोकील यांची पहिली कथा त्यांनी वयाच्या २१व्या वर्षी लिहिली. ’पुन्हा सूर्य, पुन्हा प्रकाश‘ ही ती कथा. ती १९८१ मध्ये किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध झाली. ती पुष्कळ गाजली.

मिलिंदे बोकील यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांचा डॉक्टरेटसाठीचा ’कातकरी - विकास की विस्थापन?‘ हा प्रबंध महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागांतील सहकारी पाणी व्यवस्थापनावर आधारित होता. विविध सरकारी समित्यांवर, प्रशिक्षण संस्था व बिगरशासकीय संघटनांमध्ये प्रकल्प साहाय्यक, संशोधन साहाय्यक, प्रकल्प समन्वयक, मुख्य संशोधन अधिकारी अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.

मिलिंद बोकील यांच्या 'शाळा' या कादंबरीवर 'ग म भ न' ही एकांकिका व नाटक झाले. नंतर तिच्यावरून मिलिंद उके दिग्दर्शित 'हमने जीना सीख लिया' हा हिंदी, व सुजय डहाके दिग्दर्शित 'शाळा', असे दोन चित्रपट. निघाले.

'समुद्र' या कादंबरीवर आधारित नाटकामधून श्रेया बुगडे प्रथमच रंगभूमीवर आली.

विक्रांत पांडे यांनी 'शाळा' कादंबरीचे इंग्रजी भाषांतर करून प्रकाशित केले आहे. पद्मजा घोरपड़े यांनी 'समुद्र'चे 'समंदर' नावाचे हिंदी भाषांतर केले आहे.

कार्यक्षेत्रे

  • नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन व उपजीविका
  • लैंगिकताविषयक समस्या
  • आदिवासी व ग्रामीण समस्या
  • आपत्ती व्यवस्थापन

मिलिंद बोकील यांची कौशल्ये

  • संशोधन व दस्तऐवजीकरण
  • मूल्यमापन व निरीक्षण
  • मनुष्यबळ प्रशिक्षण व क्षमताविकास

प्रकाशित साहित्य

नावसाहित्यप्रकारप्रकाशनप्रकाशन वर्ष (इ.स.)
उदकाचिया आर्तीकथासंग्रहमौज प्रकाशन-
एकम्कादंबरीमौज प्रकाशन१ जून २००८
कहाणी पाचगावचीवैचारिकमौज प्रकाशन१ जून २००८
कातकरी समाज विकास आणि व्यवस्थापनवैचारिकमौज प्रकाशन
कार्य आणि कार्यकर्तेवैचारिकमौज प्रकाशन
गवत्याकादंबरीमौज प्रकाशन
गांधी, विनोबा आणि जयप्रकाशवैचारिकमॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसजून २०१८
गोष्ट मेंढा गावाची[१]वैचारिकमौज प्रकाशन
जनाचे अनुभव पुसतांसामाजिक लेखसंग्रहमौज प्रकाशन१० जून २००२
झेन गार्डनकथासंग्रहमौज प्रकाशन२०००
धुनी तरुणाईआत्मकथन (सहलेखक अमर हबीब)परिसर प्रकाशन
पतंगलघुकथा संग्रहमॅजेस्टिक प्रकाशन२०२०
महेश्वर नेचर पार्ककादंबरीमौज प्रकाशन
मार्गकादंबरीमौज प्रकाशन२०१५
रण-दुर्गकादंबरीमौज प्रकाशन
वाटा आणि मुक्कामआत्मकथन (सहलेखक आशा बगे, भारत सासणे, सानियामौज प्रकाशन
शाळाकादंबरीमौज प्रकाशन१४ जून २००४
समुद्रकादंबरी (+ऑडिओ बुक + नाटक)मौज प्रकाशन
समुद्रापारचे समाजप्रवासवर्णनमौज प्रकाशन२०००
सरोवरकादंबरीमौज प्रकाशन
साहित्य, भाषा आणि समाज मार्गवैचारिकमौज प्रकाशन

महेश्वर नेचर पार्क

पुरस्कार

  • शाळा या मराठी चित्रपटाला २०११ सालचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
  • 'प्रिय जी.ए. कथाकार' पुरस्कार (२०१२)