मेहरुन्निसा दलवाई

भारतीय मुस्लीम समाज सुधारक

मेहरुन्निसा दलवाई (जन्म : २५ मे १९३०; निधन : ८ जून २०१७) या हमीद दलवाई ह्यांच्या पत्‍नी असून त्यांच्या पश्चात मुस्लिम सत्यशोधक चळवळीच्या अग्रणी होत्या.[ संदर्भ हवा ] हमीद दलवाई यांच्याशी १९५६ मध्ये त्यांचा इस्लामिक पद्धतीने विवाह झाला आणि एक महिन्याच्या आतच त्यांनी विशेष विवाह कायदा १९५४ नुसार विवाहाची नोंदणी केली.[ संदर्भ हवा ] उर्दू भाषिक मेहरुन्निसा दलवाई यांनी काही दिवसांतच मराठी भाषा अवगत केली.[ संदर्भ हवा ] त्यांच्या दोन्ही मुली, रुबिना आणि इला यांनी आंतरधर्मीय विवाह केल्याने त्या अनुक्रमे रुबिना चव्हाण आणि इला कांबळी झाल्या.[ संदर्भ हवा ]

मेहरुन्निसा दलवाई
जन्म नावमेहरुन्निसा हमीद दलवाई
जन्म२५ मे १९३०
मृत्यू८ जून २०१७
धर्मइस्लाम
कार्यक्षेत्रसमाज सुधारणा
भाषाउर्दू, मराठी
चळवळमुस्लिम सत्यशोधक चळवळ
प्रसिद्ध साहित्यकृतीमी भरून पावले आहे
प्रभावहमीद दलवाई
अपत्येरुबिना चव्हाण, इला कांबळी
पुरस्कारअमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार (जानेवारी २०१७)
विकिस्रोत
विकिस्रोत
मेहरुन्निसा दलवाई हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.

शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायम रहावा म्हणून मेहरुन्निसा यांनी संघर्ष केला. त्यांनी १९८६-८७ मध्ये महाराष्ट्रात तलाक मुक्ती मोर्चा काढला होता.[ संदर्भ हवा ]

पतीच्या निधनानंतर गेली चाळीस वर्षे त्यांचे विचार सातत्याने पुढे नेण्यात मेहरुन्निसा यांची महत्त्वाची भूमिका होती. 'हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या.[ संदर्भ हवा ]

मुस्लिम समाजातील समाजसुधारणा चळवळी, मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नांबद्दलच्या चळवळी आणि आंदोलने यांत मेहरुन्निसा यांचा सक्रिय सहभाग असे. आपल्या कार्यात त्या अखेरपर्यंत व्यस्त होत्या.[ संदर्भ हवा ]

हमीद दलवाई यांनी समाजसुधारणेचा पायंडा घालून देण्यासाठी आपल्या अंतिम इच्छेनुसार मुस्लिम असूनही मरणोत्तर आपल्या देहाचे दहन करावे, असे त्याकाळी सांगितले होते.[ संदर्भ हवा ] मेहरुन्निसा दलवाई यांनी त्याही पुढे एक पाऊल पुढे जात, आपल्या देहदानाचा निर्णय आधीच घेतला होता. त्यानुसार, पुणे शहरातल्या हडपसर येथील साने गुरुजी रुग्णालयात त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे देहदान केले गेले.[ संदर्भ हवा ]

प्रकाशित साहित्य

  • मी भरून पावले आहे (आठवणी/आत्मचरित्र)[१]
  • मैं कृतार्थ हुई (हिंदी)[ संदर्भ हवा ]

पुरस्कार

  • आंतरभारतीचा सूसन बी. अँथनी पुरस्कार (१९८०)[२]
  • माईसाहेब पारखे आदर्श माता पुरस्कार (१९८३)[३]
  • राजर्षी शाहू छत्रपती स्मारक पुरस्कार (जुलै १९८५)[३]
  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार (जानेवारी २०१७)

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन