रतन टाटा

भारतीय उद्योगपती

रतन नवल टाटा (जन्म: २८ डिसेंबर १९३७) हे एक भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आहेत. १९९० ते २०१२ या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते आणि ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत ते समूहाचे अंतरिम अध्यक्ष होते, तसेच त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टचे नेतृत्व करत होते.[१] ते पद्मविभूषण (२००८) आणि पद्मभूषण (२०००) या भारतातील दोन सर्वोच्च नागरी पुरस्कारांचे प्राप्तकर्ते आहेत.[२]

रतन टाटा
जन्म२८ डिसेंबर इ.स. १९३७
मुंबई, ब्रिटीश भारत
निवासस्थानकुलाबा, मुंबई, भारत
राष्ट्रीयत्वभारतीय
वांशिकत्वपारशी
नागरिकत्वभारतीय
प्रशिक्षणसंस्थाहार्वर्ड विद्यापीठ
कारकिर्दीचा काळइ.स. १९६२ ते इ.स. २०१२
मालकटाटा उद्योगसमूह
प्रसिद्ध कामेटाटा नॅनो
धर्मपारशी धर्म
संकेतस्थळ
http://www.tata.in/aboutus/articles/inside.aspx?artid=uBZjT+/ooH8= Ratan N Tata

१९३७ मध्ये जन्मलेले रतन हे टाटा कुटुंबातील वंशज आणि नवल टाटा यांचे पुत्र आहेत, ज्यांना नंतर टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पुत्र रतनजी टाटा यांनी दत्तक घेतले होते. ते कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलचे व्यवस्थापन कार्यक्रमाचे माजी विद्यार्थी आहेत जेथे त्यांनी १९७५ मध्ये शिक्षण पूर्ण केले.[३] १९६१ मध्ये ते त्यांच्या कंपनीत रुजू झाले. तेव्हा ते टाटा स्टीलच्या शॉप फ्लोअरवर काम करायचे आणि १९९१ मध्ये जेआरडी टाटा यांच्या निवृत्तीनंतर ते त्यांचे उत्तराधिकारी होते. त्यांनी टाटा टी मिळवून टेटली विकत घेतली, टाटा मोटर्स घेऊन जग्वार लँड रोव्हर विकत घेतली आणि टाटा स्टील घेऊन कोरस कंपनीचे अधिग्रहण केले. त्यांनी मोठ्या प्रमाणावर भारत-केंद्री गटातील टाटा समूहाला जागतिक व्यवसायात रूपांतरित करण्याच्या प्रयत्न केला.

प्रारंभिक जीवन

मुख्य लेख: टाटा कुटुंब

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी ब्रिटीश राजवटीत मुंबई येथे झाला होता. ते नवल टाटा यांचे पुत्र आहेत, ज्यांचा जन्म सुरत येथे झालेल्या आणि नंतर टाटा कुटुंबात दत्तक घेतले गेले. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या भाची सूनी टाटा या त्यांच्या आई होत. टाटांचे आजोबा होर्मुसजी टाटा हे रक्ताने टाटा कुटुंबाचे सदस्य होते. 1948 मध्ये, टाटा 10 वर्षांचे असताना, त्यांचे आई-वडील विभक्त झाले तेव्हा, आणि त्यानंतर त्यांचे संगोपन केले आणि रतनजी टाटा यांच्या आजी आणि विधवा नवजबाई टाटा यांनी त्यांना दत्तक घेतले. [४] त्यांना एक धाकटा भाऊ (जिमी टाटा) आहे [५] आणि, नोएल टाटा हे सावत्र भाऊ आहेत, जे त्यांच्या वडिलांच्या दुसऱ्या पत्नी सिमोन टाटा यांचे पुत्र आहेत. टाटांची पहिली भाषा गुजराती आहे. [६]

मुंबईच्या कॅम्पियन स्कूलमध्ये त्यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर, त्यांनी मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, शिमला येथील बिशप कॉटन स्कूल आणि न्यू यॉर्क शहरातील रिव्हरडेल कंट्री स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि त्यांनी १९५५ मध्ये पदवी प्राप्त केली. [७] [८] [९] पदवी घेतल्यानंतर, टाटा यांनी कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश घेतला, ज्यामधून त्यांनी 1959 मध्ये आर्किटेक्चरमध्ये बॅचलर पदवी प्राप्त केली. 1975 मध्ये, त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या सात-आठवड्याच्या प्रगत व्यवस्थापन कार्यक्रमात भाग घेतला. [१०] [११]

शिक्षण

चॅम्पियन स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्‍ट होण्याची मनीषा बाळगून रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले. आपले टाटा हे नाव विसरून आपण आपल्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण करायचे, या ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या दहा वर्षांच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही केले. कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवीही घेतली. याच काळात टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख जे. आर. डी. टाटा यांच्याशी त्यांची भेट झाली.

जीवन

दिल्ली येथे रतन टाटा

टाटा समूहाचे संस्थापक असलेल्या जमशेदजी टाटांचा नातू अशा पद्धतीने धडपड करतो आहे हे पाहून जे. आर. डी. प्रभावित झाले. आजीची तब्येत बिघडल्यामुळे तिला भेटायला भारतात आलेल्या रतन यांना जे. आर. डी. यांनी टाटा उद्योगसमूहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. इ.स. १९६२ च्या डिसेंबर महिन्यात रतन टाटा समूहात दाखल झाले; मात्र समूहाच्या परंपरेनुसार ६२ ते ७१ त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले. जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच इ.स. १९७१ मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपविण्यात आली.नेल्को ही तोट्यात चालणारी कंपनी होती. रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढील तीन वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांनी यश मिळविले. संपूर्ण बाजारपेठेतील नेल्कोचा हिस्सा दोन टक्‍क्‍यांवरून वीस टक्के झाला; पण देशात आणीबाणी जाहीर झाली. पाठोपाठ आलेल्या मंदीमध्ये नेल्कोला आपल्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात अपयश आले आणि ही कंपनी बंद पडली. रतन टाटा यांना अनुभवाला आलेले ते पहिले अपयश होते. इ.स. १९७७ मध्ये रतन टाटांवर एम्प्रेस मिल या टाटा समूहातील बंद पडावयास आलेल्या मिलची जबाबदारी सोपविण्यात आली. एम्प्रेस मिलच्या यंत्रसामग्रीमध्ये अनेक वर्षांमध्ये गुंतवणूक करण्यात आली नव्हती. कामगारांची संख्याही मोठी आणि त्याच्या तुलनेत उत्पादन तूटपुंजे असे चित्र असलेल्या या मिलमध्ये पन्नास लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची विनंती रतन टाटा यांनी टाटा उद्योगसमूहाला केली; पण नानी पालखीवाला, अजित केरकर आणि रुसी मोदी या संचालकांनी त्याला विरोध केल्याने अखेर ही मिलही बंद करण्यात आली. रतन टाटांच्या नावावर दुसरे अपयश जमा झाले. या सर्व प्रकारामुळे रतन टाटा चांगलेच दुखावले गेले होते; पण त्याचबरोबर अनुभवाच्या शाळेमध्ये बरेच काही शिकले होते. इ.स. १९८१ मध्ये जे. आर. डी. टाटा यांनी त्यांच्याकडे टाटा इंडस्टीजची सूत्रे सोपविली. त्याच वेळेस ते त्यांचे वारसदार आणि टाटा उद्योगसमूहाचे भावी प्रमुख असणार हे स्पष्ट झाले होते. इ.स. १९९१ मध्ये जे. आर. डी. यांनी स्वतःच उद्योगसमूहाची सर्व सूत्रे रतन टाटांकडे सोपवून निवृत्ती पत्करली.त्यानंतर सुरू झालेली यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत. कोरस, जग्वार, टेटली सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. या भरारीनं देशातल्या तरुणांना नवी ऊर्जा दिली.` मोठी स्वप्न पाहाणं आणि ती प्रत्यक्षात आणणं ` हा रतन टाटांचा स्वभाव. याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनोची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे टाटांनी सिद्ध केलं.हे यश मिळवत असतांना टाटांनी कधीच आपल्या मुल्यांशी तडजोड केली नाही. यामुळंच सचोटी, गुणवत्ता म्हणजे टाटा हे समीकरण तयार झालंय.निवृत्ती नंतर ते नव उद्योजकांना प्रोत्साहन देत आहेत.रतन टाटा[permanent dead link] यांनी आपले शिक्षण Cathedral and john cannon school(मुंबई)आणि Bishop Cotton School(शिमला) या ठिकाणी पूर्ण केले.

Jaguar आणि Land Rover सारखेच रतन टाटा यांनी बऱ्याच कंपन्या विकत घेतल्या त्यात २००० मध्ये टेंटलीला विकत घेतले आणि जगातील सर्वात मोठी टी बेग्ज बनवणारी कंपनी निर्माण केली. २००४ मध्ये साऊथ कोरिया मधील Daewoo Commercial Vehicleला रतन टाटा यांनी विकत घेतले. २००७ मध्ये टाटा ने लंडनमधील Corus Group ही स्टील कंपनी विकत घेतली. नंतर तिचे नाव Tata Steel Europe ठेवण्यात आले. [१]

विकिक्वोट
रतन टाटा हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन