रावसाहेब कसबे

डॉ. रावसाहेब राणोजी कसबे ( १२ नोव्हेंबर, १९४४) हे मराठी लेखक आहेत. त्यांच्या झोत या पुस्तकात त्यांनी माधव सदाशिव गोळवलकर यांच्या द बंच ऑफ थॉट्स या पुस्तकातील विचारांची व त्या अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीची समीक्षा केली आहे.[१]

रावसाहेब राणोजी कसबे
जन्म१२ नोव्हेंबर, १९४४ (1944-11-12) (वय: ७९)
राष्ट्रीयत्वभारतीय
धर्मबौद्ध
भाषामराठी
साहित्य प्रकारसमिक्षा
प्रसिद्ध साहित्यकृतीझोत
प्रभावडॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, कार्ल मार्क्स

पुस्तके

रावसाहेब कसबे यांनी लिहिलेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत.[२]

  • डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना[३]
  • आंबेडकर आणि मार्क्स[४]
  • आंबेडकरवाद - तत्त्व आणि व्यवहार[५]
  • झोत
  • देशीवाद समाज व साहित्य
  • धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह
  • भक्ती आणि धम्म
  • मानव आणि धर्मचिंतन
  • रेषेपलीकडील लक्ष्मण
  • हिंदू मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद
  • सम्यक प्ररिवर्तन

मिळालेले सन्मान व पुरस्कार

  • गदिमा प्रतिष्ठानचा स्नेहबंध पुरस्कार (२०११)
  • मिलिंद कला महाविद्यालयातर्फे मिलिंद समता पुरस्कार (२०१४)
  • रावसाहेब कसबे हे नाशिकमध्ये भरलेल्या पाचव्या "कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे‘ अध्यक्ष होते. (४-५ जानेवारी २०१४)
  • सुगावा प्रकाशनाचा ’सुगावा पुरस्कार’ (२०१४)
  • रावसाहेब कसबे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे २०११ ते २०१६ या काळासाठीचे दोघांतले एक उपाध्यक्ष आहेत. (दुसरे चंद्रकांत शेवाळे)
  • २०१५ सालच्या ५व्या सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • रावसाहेब कसबे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष

संदर्भ

  • झोत सुगावा प्रकाशन, पुणे. लेखक परिचय.
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन