राष्ट्रीय महामार्ग १

राष्ट्रीय महामार्ग १ (National Highway 1) हा भारताच्या जम्मू आणि काश्मीरलडाख ह्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये धावणारा एक राष्ट्रीय महामार्ग आहे. जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांकनानुसार हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग १ डी ह्या नावाने ओळखला जात असे. सुमारे ५३४ किमी लांबीचा हा महामार्ग श्रीनगरला लेहसोबत जोडतो. हिमालयामधील दुर्गम भागातून वाट काढणारा हा महामार्ग भारत-पाकिस्तान नियंत्रणरेषेच्या जवळून धावतो. बारामुल्ला, सोनमर्ग, झोजी ला, द्रास, कारगिल इत्यादी स्थाने ह्याच महामार्गावर स्थित आहेत.

राष्ट्रीय महामार्ग १
Map
राष्ट्रीय महामार्ग १ चे नकाशावरील स्थान
मार्ग वर्णन
देशभारत ध्वज भारत
लांबी५३४ किलोमीटर (३३२ मैल)
सुरुवातश्रीनगर
शेवटलेह
स्थान
शहरेश्रीनगर, बारामुल्ला, द्रास, कारगिल, लेह
राज्येजम्मू आणि काश्मीर, लडाख

लडाखला उर्वरित भारतासोबत जोडणाऱ्या २ महामार्गांपैकी हा एक आहे (दुसरा: लेह-मनाली महामार्ग).

जुळणारे प्रमुख महामार्ग

  • कारगिल - राष्ट्रीय महामार्ग ३०१