वरद गणपती

पुणे शहरात शनिवारवाड्याकडून ओंकारेश्वराकडे येताना नेने घाट-आपटे घाटाकडे जाणाऱ्या उजवीकडील रस्त्यावर वळल्यावर समोर हे गणपतीचे देऊळ दिसते. या देवस्थानाची उभारणी चिंचवड येथील रामचंद्र विष्णू गुपचूप यांनी इ.स. १८९२मध्ये केली आहे. म्हणून या गणपतीला गुपचूप वरद गणपती म्हणतात.[ संदर्भ हवा ] १८९४ साली या मंदिराचा सभामंडप बांधण्यात आला. देवळातली गणेशाची मूर्ती चतुर्भुज व उत्तराभिमुख असून तिची उंची ३ फूट आहे. सभामंडप दुमजली असून आत देवतांची जुनी चित्रे, हंड्या व झुंबरे आहेत. गाभाऱ्याला कळस असून प्रदक्षिणामार्गावर मागे एकेकाळी शमीचे झाड होते.

मोठा लाकडी दरवाजा, दिंडी दरवाजा, लाकडी सभामंडप आणि गाभारा असे या देवळाचे स्वरूप आहे. गणपतीची मूर्ती अष्टविनायकांची आठवण करून देते. अर्धपद्मासनबद्ध अशी ही मूर्ती आहे. गणपतीच्या वरील दोन्ही हातांत शस्त्रे आहेत. खालचा उजवा हात अभयमुद्रेत, तर डाव्या हातात मोदक आणि त्यावर सोंड आहे. अंगभूत मुकुट नसल्याने गंडस्थळ आणि मोठे कान स्पष्ट दिसतात.

लोकमान्य टिळक वरद गणपतीच्या दर्शनास येत असत. पानशेतच्या पुरात सबंध मंदिर पाण्याखाली गेले तरी मंदिरास काही हानी पोचली नाही.

हे वरद गणपती मंदिर सकाळी ७ ते २ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळात उघडे असते.

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन