विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती









प्रस्तावित मसुदा

नीती ठरवण्यासाठी दिशा

  • संचिकां विषयीचे निती धोरण आणि परवाना[परवान्यांची गरज काय? १] धोरण यांची दखल घेणारी, मराठी विकिपीडियाची ही स्वतंत्र परवाना नीती[गरज काय १], भारतीय कायद्यांच्या अधीन राहून[असे का? १], विकिमीडिया फाऊंडेशनच्या वापरण्याच्या अटी लक्षात घेऊन, खास करून रास्त व्यवहार वापर (Fair Dealing) दाव्यांच्या बाबत, शक्य तेथे विकिमीडिया कॉमन्सच्या परवाना निती प्रमाणे, व शक्य तेवढी नेमस्त (conservative) स्वरूपाची[असे का? २][असे का? ३]असावी. ही नीती मराठी विकिपीडिया नीतींच्या व भारतीय कायद्यांच्या कक्षेत राहून, शक्यतो http://freedomdefined.org/Definition version 1.0 येथील व्याख्येस न्याय देणारी [असे का? ४] असावी. या नितींवर अथवा मुक्त सांस्कृतिक कामावर परिणाम करणारे अथवा संचिका चढवणाऱ्या सदस्यांची कायदे विषयक जोखीम प्रथमदर्शनी वाढू शकेल असे वाटणारे कायदे, त्यांचे अर्थ अथवा न्यायालयीन निर्णय नवे अथवा नव्याने आढळून आलेले दिसल्यास अथवा या नितीच्या चर्चा पानावर सुचीत केले गेल्यास प्रचालक त्यांना प्रथम दर्शनी पटल्यास त्यांच्या अधिकारांतर्गत <ref group="असे का?">कारण: </ref> टॅग लावून नितीस कंझर्वेटीव्ह बनवतील ज्या बद्दल काळाच्या ओघात सहमती होऊन नितीस दीर्घकाळासाठी स्विकारले जाईल अथवा ढिले केले जाईल. [असे का? ५]

प्रताधिकारमुक्त असलेल्या, वा परवानामुक्त करावयाच्या (छाया)चित्रांबाबतची/संचिकांबाबतची निती

  • स्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, शक्यतोवर विकिमिडिया कॉमन्स' प्रकल्पातूनच चढवाव्यात. [असे का? ६]
    • अपवाद १.: विकिमीडिया कॉमन्सवरून 'ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेच्या कारणावरून नाकारली गेलेली', परंतु स्थानिक स्तरावर मराठी विकिपीडियाने उल्लेखनीयता स्वीकारलेली व उचित वापर दाव्यांचा समावेश नसलेली [असे का? ७]संचिका चढवायला हरकत नाही.
    • अपवाद २: विकिमीडिया कॉमन्सवरील संचिकांच्या बाबतीत, जेथे संचिकेचे नाव तेच राहून उत्पात अथवा इतर कारणांनी आतील छायाचित्र बदलण्याची शक्यता असू शकेल अशी संचिका. म्हणूनच, भारताची सीमा दर्शविणारे सुयोग्य नकाशे मराठी विकिपीडियावर आणण्याची सुविधा स्वतंत्रपणे उपलब्ध ठेवणे आणि भारतीय सीमा असलेल्या सुयोग्य नकाशांसाठी अधिक सुरक्षित वातावरण उपलब्ध करणे.[असे का? ८] [२]
    • आधीपासून चढवलेल्या ज्या संचिकांना व्यवस्थित परवाने नाहीत, किंवा निर्मात्याव्यतिरिक्त ज्या इतर व्यक्ती/बॉट यांनी परवाने डकवले आहेत, अशा सर्व सदस्यांनी सर्वमाध्यमी अभियान राबवून परवाने अद्ययावत करवून घ्यावेत. सुयोग्य परवाने मिळवून, चढवणे शक्य असलेल्या संचिका विकिमीडिया कॉमन्सवर स्थानांतरित कराव्यात. पहा {{परवाना अद्ययावत करा}}
    • सामान्य सदस्यांत प्रताधिकारासंबंधीचे कायदे आणि परवाने यांविषयक सजगता विकसित होईपर्यंत, सदस्यांना मराठी विकिपीडियावर छायाचित्र चढवण्यास मान्यता देण्यासाठी काही किमान निकष असावेत. उदाहरणार्थ, मराठी विकिपीडियावर किमान १०००० संपादनांचा (१०००० संपादनांवरून सजगता वाढत जाईल तसे हा निकष कमीकमी करत १०० संपादनांच्या अनुभवापर्यंत कमी करता येईल) आणि विकिमीडिया कॉमन्सवर किमान २० स्वीकार्य चित्रे चढवल्याचा अनुभव असावा (सोबत किमान दोन इतरांच्या छायाचित्रांना अधिकृत लेखी परवानगीने OTRS प्रक्रीया वापरुन चढवण्याचा अनुभव असावा); अथवा प्रताधिकारविषयक लेखांत ज्ञानकोशीय परिच्छेद लेखनाचा स्वीकार्य अनुभव असावा.
  • संचिका भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे वेळोवेळी सुचीत केलेल्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१ मध्ये अनुस्यूत खाजगीपणाचे उल्लंघन करणाऱ्या नसाव्यात; म्हणजे व्यक्ती आणि घटना उल्लेखनियतेच्या निकषास पात्र ठरणारी आणि सार्वजनिक ठिकाणी काढलेली असावीत, यात खाजगी, कौटूंबीक, विवाह, प्रजनन, मातृत्व, बाळंतपण अथवा विद्यार्थ्यांचा इत्यादी बाबत पात्र लेखी परवानगी शिवायचे (विशीष्ट व्यक्तीची ओळख पटेल असे) छायाचित्र नसावे. अशी लेखी परवानगीस commons:Commons:Email templates येथे नमुद विहीत नमुन्यात permissions-commons -at- wikimedia.org या इमेलवर सुद्धा सुचीत करुन मान्यता घेतली जाणे अभिप्रेत आहे.
  • सर्वच छायाचित्रांसाठी छायाचित्राचा स्रोत नमूद करणे जरुरीचे आहे. चित्र चढवण्यासाठी सुयोग्य परवाना असणे अत्यावश्यक असेल.

रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल खालील पैकी एक निती स्विकारावी

  • हि निती मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल. रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल खालील पैकी एक निती स्विकारावी. निती विषयक चर्चांमध्ये काही कारणाने सहभाग न लाभल्यास उपलब्ध पर्यायातील शक्यतोवर कंझर्वेटीव्ह पर्यायांचे पालन केले जाईल. [गरज काय २]


पर्याय १ ला ) उचित उपयोग अपवाद विकिपीडियावरील छायाचित्रांना लागू पडण्याची शक्यता कमी असल्यामुळे विकिमिडीया कॉमन्स प्रमाणे अशा संचिकांना सरसकट नकार द्यावा [असे का? ९]


* या पर्याया मागची भूमिका
१) कंझर्वेटीव्ह दृष्टीकोणानुसार भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मधील कलम ५२ मधील रास्त व्यवहार वापर (Fair Dealing) तरतुदी खुप मर्यादीत आहेत. यात चित्र, छायाचित्र, लोगो चित्रे, वर्ग:पोस्टर चित्रे, अथवा व्यक्ती इत्यादी चित्रांबद्दल संबंधीत प्रताधिकार धारकाकडून, अथवा कॉपीराईट बोर्डाकडून परवाना न मिळवता अशा छायाचित्रांच्या सरळ वापराबद्दल सुस्प्ष्ट कायदा मान्य अपवाद तुर्तास दिसत नाही. आणि भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ च्या कलम १६ चा दृष्टीकोण कायद्यात जे आहे ते आहे जे नाही ते नाही अशी भूमिका विषद केलेली आहे. विकिमिडीया फाऊंडेशनचे परवाना निती धोरण ज्या अर्थी स्थानिक कायद्यांना अनुसरून निती असावी असे मानते त्यादृष्टीने परवाना घेण्याची अथवा न्यायालयीन मान्यता घेण्याची कायद्याची सुविहीत प्रक्रीया न पार पाडता, अशा संचिका चढवत राहणे कायद्याचे आणि विकिमिडीया फाऊंडेशन चे नितीस धरून रहात नाही. या भूमिकेची सविस्तर मांडणी
२) कायदे विषयक तरतुदी आणि जोखीमींबाबत सजगतेचा अभाव असलेल्या व्यक्तींकडून अनवधानाने कायद्याचे उल्लंघन होत असेल तर जरी असे उल्लंघन करणाऱ्यांची व्यक्तीगत जबाबदारी असली विकिपीडीयाचे इतर सदस्य आणि विकिमिडीया फाऊंडेशन याबाबत उत्तर दायकत्वास नकार देते हे लक्षात घेऊनही; आपण चांगलेच काम करतो आहोत या गैरसमजुती खाली काम करणाऱ्या व्यक्तींकडून अनवधानातून होणारी जोखीम निर्मीती टाळणे.
३) पहिल्या दोन मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले तरीही संबंधीतांची सुयोग्य परवाना संमती न मिळवता संचिकांचा वापर विकिमिडीया फाऊंडेशनला अभिप्रेत मुक्त सांस्कृतीक काम व्याख्येचा अपेक्षा भंग ठरतो.
अथवा
पर्याय २ रा) जोखीमी बद्दल सजगतेची शक्य ती कल्पना देऊन लोगो आणि ट्रेडमार्कच्या बाबतीत लोगो आणि ट्रेडमार्कच्या बद्दल वर्णनात्मक परिच्छेद लेखन[असे का? १०] + संबंधीत छायाचित्राच्या वापराबाबत आढाव्यात सयुक्तीक तर्कसुसंगत स्पष्टीकरण लिहिणे बंधन कारक करून; सोबत {{साचा:संकोले}} हा मथळा साचा वापरणे बंधन कारक करून, समीक्षण नसलेली चित्रपट पोस्टर्स मात्र नाकारावीत (लेखास केवळ मनोवधक बनवण्याच्या उद्देशासाठी उचित उपयोग चित्र चा उपयोग केला जाऊ शकत नाही.[असे का? ११]) अशी छायाचित्रे विकिपीडियाबाहेर इतर संस्थळावर विकिपीडियातून एंबेडकरण्यास अनुमती नसल्या बद्दल संबंधीत कॉपीराईटेड टॅग मध्ये सुस्पष्ट सुचना असावी. (असा उपयोग आढळल्यास पहारा आणि गस्त पानावर संचिकेचे नाव आणि वापरल्या गेलेल्या संस्थळाचे नाव पाहील्याच्या वेळ तारखेसहीत सुस्पष्ट नमुद करून संबंधीत संचिकेवर अयोग्य संचिका वापर नावाची संचिका चढवावी का संचिका वगळावी या बद्दल निती बनवून तद नुसार कारवाई करावी) जाणत्या सदस्यांनी प्रचालकांच्या साहाय्याने वेळोवेळी गरज अभ्यासून शर्तींमध्ये ताठरता अथवा लवचीकता आणावी.
याच पर्यायामध्ये छायाचित्र विषयक समीक्षणांवर आधारीत समीक्षणात्मक लेखासाठी लागणारी छायाचित्रे सुद्धा चढवू द्यावीत.
या पर्यायात १) मुक्त सांस्कृतीक काम या संकल्पनेचा परीचय करून घेतला असणे आणि लोगो (छाया)चित्रासाठी अधीक मुक्त आणि कायदेशीर विकल्प उपलब्ध करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्यासाठी तत्वत: बांधील असणे २) भारतीय प्रताधिकार कायदा, ट्रेडमार्क कायदा, डिझाईन्स कायदा ब्रॉडकास्टींग कायदा, केसस्टडीज आणि इतर संबंधीत कायद्यांतर्गत उद्भवू शकणारी जोखीमीची किमान स्वरूपाची माहिती घेतली असणे ३) लोगो / चित्र / छायाचित्र विकिपीडियाबाहेर प्रकाशित झालेले असणे ४) ते प्रकाशन प्रताधिकार धारकाच्या परवानगीने झालेले असणे ५) विकिपीडियावर घेताना अशा छायाचित्राचा स्रोत नोंदवणे ६) प्रताधिकार धारक/ मालकांच्या मालकीची नोंद करणे (attribution) ७) मुक्त विकल्प उपलब्ध नसणे अथवा मुक्त विकल्प बनवणे शक्य नसणे ८) उद्देश लेखास मनोवेधक बनवणे हा नसणे' ९) शक्यतो कॉपीराइट धारकाचे कोणतेही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नसावी १०) गूड फेथ मध्ये कल्पना नसल्याचा अपवाद वगळता ट्रेडमार्क / लोगो इत्यादी लेखात संबंधीत संस्थेचा असेल याची पुरेशी खात्री करणे ११) कमीत कमी उपयोग /वापर (एका चित्राने जे काम भागते त्यासाठी अधिक चित्रे वापरु नयेत) १२) चित्राचा छोटा भाग अथवा कमी रिझोल्यूशनचे चित्रवापरलेले चालत असल्यास पहावे (याने भारतीय कायद्यातील जोखीम कमी होत असेलच असा गैर समज टाळावा) १३) छायाचित्र आणि संबंधीत मजकुर विकिपीडियाच्या इतर निती आणि ज्ञानकोशीय उल्लेखनीयता निकषास अनुसरुन असावा १४) मराठी विकिपीडियाच्या छायाचित्र विषयक इतर निकषांना ही पात्र ठरणारा असावा १४) (छाया)चित्र चढवण्या आधी पासून किमान दोन परीच्छेदांचा ज्ञानकोशीय लेख उपलब्ध असावा १५) ज्या लेखात वापरावयाचे त्या लेखातील मजकुराशी महत्वपूर्णपणे सुसंगत असावे १६) लेखात लोगो छायाचित्रण लावल्यानंतर त्याचे वर्णन करणारा समीक्षणात्मक परिच्छेद असावा[असे का? १२] १७) असे छायाचित्र / लोगो ज्या कोणत्या लेखात वापरावयाचे आहे तेथे ते वापरणे कसे सयुक्तीक तर्कसुसंगत स्पष्टीकरण प्रत्येक लेखाच्या बबतीत स्वतंत्रपणे छायाचित्र संचिकेच्या चित्रनामविश्वातील आढाव्यात नमुद करणे अत्यावश्यक आहे, (स्पष्टीकरण नसणे /अपुरे असणे/ अयोग्य असणे याने संबंधीत लेखातून संचिका वगळली जाईल, आणि एकाही लेखास न जोडलेली संचिका त्या कारणाने वगळली जाईल) १८) अशा लोगो छायाचित्रांचा वापर मुख्यनामविश्वात आणि चित्रनामविश्वात स्वपानावर पानावरच असावा, निंसंदिग्धीकरण पानांवर उपयोग नसावा चर्चा नामविश्वात चर्चेत गरज भासल्यास केवळ दुवा द्यावा. १९) अ) चित्रनामविश्वातील छायाचित्र पानावर स्रोत प्रताधिकार धारक/ मालकाचे नाव कॉपीराईटचे वर्ष ॲट्रीब्यूशन प्रकाशक इत्यादी माहिती आ) कॉपीराइट टॅग इ) प्रत्येक वापरा बद्दल ते वापरणे कसे ज्ञानकोशातील माहितीच्या दृष्टीने सयुक्तीक आहे आणि उद्देश केवळ सुशोभीकरणाचा नाही याचे तर्कसुसंगत स्पष्टीकरण दिलेले असावे. उपरोक्त सर्वकृती पूर्ण करणे याची जबाबदारी छायाचित्र चढवणारे आणि वापरणारे दोन्हीचीही राहील. २०) संबधीत आस्थापना अथवा व्यक्तींना विनंती करून वापर अधिकृतपणे अधीक मुक्त अथवा संमत करून घेण्याचा प्रयास करून असा अधिक मुक्त अथवा संमत विकल्प वापरून संचिका वापर बदलणे.
या पर्याया सोबत स्विकार्ह तात्कालीक अपवाद' ) महाराष्ट्रात आलेली मोठी जिवीत हानीची शक्यता असलेली राष्ट्रीय आपत्तीतील अथवा प्राणघातक साथींच्या आजाराची अशी स्थिती कि ज्याच्या छायाचित्र लवकर प्रदर्शीत करण्याने जनतेस सार्वजनिक हितसाधण्याच्या दृष्टीने भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१ मध्ये नमुद जिवीत्वाच्या आधिकाराच्या विस्तारीत परिघाचा भाग म्हणून माहितीचा अधिकार अंतर्गत जिवीत हानी टाळण्यास विकिपीडियातील संबंधीत लेखाच्या माध्यमातून हातभार लागणार असेल तर अशी छायाचित्रे आपत्तीचा कालावधी पुरेसा मागेपडे पर्यंत, जर दुसरे वैकल्पीक प्रताधिकार मुक्त (छाया)चित्र उपलब्ध तातडीने होणे शक्य नसेल तर बाकी विकिपीडियाच्या अटींना अनुसरून.
इंग्रजी विकिपीडियाच्या निती पेक्षा या निती पर्यात प्रामुख्याने ३ गोष्टी वेगळ्या आहेत १) पोस्टर चित्रांना मान्यता नाही (कारण रास्त उपयोग क्रायटेरीआ सुशोभनाच्या उद्देशाला मान्यता देत नाही) २) अशा संचिकांचे वापराचे चित्र नामविश्वात स्पष्टीकरण द्यावेच लागेल ३) सोबतच लेखात लोगो (छाया)चित्राचे समीक्षण करणारा वर्णनात्मक परिच्छेद बंधनकारक असेल.


* या पर्याया मागची भूमिका

मराठी विकिपीडियावर जोखींमींची चर्चा केलेलीच आहे तरी सुद्धा ज्यांना कायद्याचा उदार अर्थ काढावयाचा आहे अथवा जोखीम असेल नसेल पुरेशी काळजी घेऊन पुढे जावयाचे आहे त्यांच्यासाठी हा उदार पर्याय.



अथवा
पर्याय ३ रा) उचित उपयोग अपवाद असल्याचा दावा करून छायाचित्रे चढवू इच्छिणाऱ्यांना जोखीमी बद्दल सजगतेची शक्य ती कल्पना देऊन त्यांना परवाना वापरल्या नंतर अशी छायाचित्रे चढवू वापरु द्यावीत.
पर्याया मागची भुमिका: जो जे वांछिल तो ते लाहो. ज्याला जे हवे त्याला ते करू दे. (अर्थात या पर्यायाच्या निवडीने स्थानिक स्तरावर संचिका चढवण्याचे स्वातंत्र्य वेळ प्रसंगी विकिमिडीया फाऊंडेशनकडून बाधीत हो शकते कि ज्यामुळे प्रचालकांशिवाय इतर कुणालाही संचिका चढवण्याची परवानगी नाही असे होऊ शकते. मराठी विकिपीडियाने एकदा हा दबाव झेलून पाहीला आहे तो वाढू शकतो. दुसऱ्या बाजूला मुक्त सांस्कृतीक काम या चळवळीस बाधा पोहोचण्याची आणि अनवधानात सदस्यांची जोखीम वाढण्याची शक्यता असू शकते.


  • आणि
कोणत्याही पर्याया सोबत मान्य अपवाद' ) लोगो/ट्रेडमार्क आणि चित्रपट पोस्टर्स/पुस्तक कव्हर्स/ स्क्रिनशॉट्स उचित उपयोगकरण्यास सुलभ व्हावा म्हणून जिथे स्वत: कोपीराईट धारक/मालकानेच विहीत परवान्याने मान्यता दिली आहे अशी छायाचित्रे कोपीराईट धारक/मालकाने नमुद केलेल्या सुविहीत परवान्यासहीत चढवल्यास या अपवादास मान्यता असेल.


कोणत्याही पर्याया सोबत अत्यावश्यक शर्ती' )उचित वापर छायाचित्रास नितीने क्रमांक २ अथवा ३ ने मान्यता दिल्यासही विकिमिडीया फाऊंडेशनच्या नितीतून येणारे निकष लागतातच ते असे
  • उचित उपयोग फ़ाइल तेव्हाच अपलोड करा जर विषयाबद्दलचा लेख तयार असेल. अप्रयुक्त ग़ैर मुक्त फ़ाइलींना लवकर वगळले जावे.
  • लेखास केवळ मनोवधक बनवण्याच्या उद्देशासाठी उचित उपयोग चित्र चा उपयोग केला जाऊ शकत नाही.
  • शक्यतो कॉपीराइट धारकाचे कोणतेही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नसावी. गूड फेथ मध्ये कल्पना नसल्याचा अपवाद वगळता ट्रेडमार्क / लोगो इत्यादी लेखात संबंधीत संस्थेचा असावा.
  • विकिमिडीया नितीनुसार ग़ैर मुक्त फ़ाइल तेव्हाच उपयोग करावी जेव्हा त्याचा कोणताही मुक्त विकल्प उपलब्ध नसेल, आणि बनवणेही संभव नसेल
  • Media used under EDPs are subject to deletion if they lack an applicable rationale. They must be used only in the context of other freely licensed content
  • मुक्त स्वरूपाचा विकल्प उपलब्ध होण्याच्या/ किंवा संबंधीतांकडून परवानगी मिळवण्याचा प्रयास करून मुक्त अथवा सुयोग्य परवानगी असलेला विकल्प उपलब्ध होताच तो वापरण्यास प्राधान्य द्यावे.


वगळणे विषयक निती

  • पुरेसे रॅशनल न दिलेल्या, सुयोग्य टॅग अथवा परवाना न वापरणाऱ्या, किंवा लेखात वाचकांची दिशाभूल होईल अशी प्रथमदर्शनी शक्यता वाटणाऱ्या, out of context असलेल्या, किंवा कोणत्याही लेखात पुरेशा विवरणासहीत उपयोग न केलेल्या प्रताधिकारीत संचिकांना लवकर वगळले जावे. छायाचित्रे वगळण्याच्या सर्वसाधारण विनंत्यांसाठी {{छायाचित्र वगळा}} साचा वापरावा.
  • नियमीत वगळण्याचे प्रक्रीयेत पुरेशा कालावधीची सुचना देण्याची व्यवस्था असावी. या संबंधाने वि.कॉमन्सवर उपलब्ध विस्तार आयात करावा. छायाचित्रे वगळण्याच्या सर्वसाधारण विनंत्यांसाठी {{छायाचित्र वगळा}} साचा वापरावा.

छायाचित्र चढवण्याच्या अभियानांच्या संदर्भाने निती

  • हि निती जि काही असेल उपरोक्त निकषांना आधी बांधील असेल.
  • शक्यतोवर छायाचित्र चढवणाऱ्यांनी स्वत:च परवान्यासहीतच छायाचित्रे चढवावीत.
  • पहा {{परवाना अद्ययावत करा}}

मराठी विकिपीडियास स्वतंत्र नितीची गरज काय ?

परवान्यांची गरज काय?

असे का?

संदर्भयादी

हे सुद्धा पहा

इंग्रजी मराठी संज्ञावली glossary of terms used

या लेखातील कठीण शब्द आणि वाक्यांची संज्ञावली बनवण्यात साहाय्य हवे आहे.

* या लेखात वापरलेल्या इंग्रजी मराठी विकि संज्ञा, उपयुक्त तांत्रिक शब्दांचे सामान्य अर्थ यादी
विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती वापरलेले शब्दसुचीत अर्थ
बेअर ॲक्ट (bare act)विश्लेषणात्मक टिपांशिवाय असलेला संसद/ विधी मंडळांनी पारीत केलेला मूळाबर हुकूम कायदा
कलम (section)कायद्याच्या पुस्तकातील प्रत्येक नियम


  • freely - मुक्तपणे
  • expressions - अभिव्यक्ती
  • document - दस्तावेज

इंग्रजी मराठी संज्ञावली additional glossary of terms used contd

  • Summary - सारांश
  • Preamble - उपोदघात
  • ecosystem -नैसर्गीक व्यवस्था
  • graceful functioning - सुविहीतपणे कार्यरत
  • copyright - प्रताधिकार
  • redistribute - पुर्नवितरण (पुर्न-वितरण)
  • copies - प्रति
freedomdefined.org/Definition वर प्रयुक्त शब्दअनुवादात प्रयुक्त मराठी शब्द रचनाfreedomdefined.org/Definition वर प्रयुक्त शब्दअनुवादात प्रयुक्त मराठी शब्द रचना
freelyमुक्तपणेexpressionsअभिव्यक्ती
documentदस्तावेजSummaryसारांश
Preambleउपोदघातecosystemनैसर्गीक व्यवस्था
graceful functioningसुविहीतपणे कार्यरतcopyrightप्रताधिकार
redistributeपुर्नवितरणcopiesप्रति

आपले https://freedomdefined.org चे वाचन सुलभ व्हावे म्हणून काही केवळ इंग्रजी-मराठी शब्दार्थ (कायद्यातील व्याख्या नव्हे); काही शब्दार्थ मराठीभाषा डॉट ऑर्ग च्या साहाय्याने. कायद्यातील व्याख्यांसाठी भारतीय प्रताधिकार कायद्याचे आणि न्यायालयीन निकालांचे वाचन करावे.

freedomdefined.org/Definition वर प्रयुक्त शब्दअनुवादात प्रयुक्त मराठी शब्द रचनाfreedomdefined.org/Definition वर प्रयुक्त शब्दअनुवादात प्रयुक्त मराठी शब्द रचना
format→प्रारुप-साचाsource code of a computer application→संगणकीय उपयोजनाचे संकेतांकीय स्त्रोत
source-file→स्रोत-संचिकाsource data→स्रोत-विदा
copyleft →प्रतसोड(कॉपीलेफ्ट)symmetric collaboration →परस्परावलंबी सहकार्य
attribution →श्रेय देणे, लेखकाचा संदर्भ नमुदकरणेcopy →प्रतिमुद्रित
swapped →देवाणघेवाणcollection →साठा,संग्रह,संचय

आपले https://freedomdefined.org चे वाचन सुलभ व्हावे म्हणून काही केवळ इंग्रजी-मराठी शब्दार्थ (कायद्यातील व्याख्या नव्हे); काही शब्दार्थ मराठीभाषा डॉट ऑर्ग च्या साहाय्याने. कायद्यातील व्याख्यांसाठी भारतीय प्रताधिकार कायद्याचे आणि न्यायालयीन निकालांचे वाचन करावे.

freedomdefined.org/Definition वर प्रयुक्त शब्दअनुवादात प्रयुक्त मराठी शब्द रचनाfreedomdefined.org/Definition वर प्रयुक्त शब्दअनुवादात प्रयुक्त मराठी शब्द रचना
reverse engineering →व्युत्क्रम अभियांत्रिकीlicensee →परवानाधारक
to examine →चिकित्साinterpreting →अर्थनिर्णयन
performing →सादरOpen Access →'खुली उपलब्धता'
Free content →→ 'मुक्त मजकुर'convey →संप्रेषित/व्यक्त
identification →तादात्मीकरण/ओळख/परिचयFree Cultural Works" →'मुक्त सांस्कृतीक काम'

आपले https://freedomdefined.org चे वाचन सुलभ व्हावे म्हणून काही केवळ इंग्रजी-मराठी शब्दार्थ (कायद्यातील व्याख्या नव्हे); काही शब्दार्थ मराठीभाषा डॉट ऑर्ग च्या साहाय्याने. कायद्यातील व्याख्यांसाठी भारतीय प्रताधिकार कायद्याचे आणि न्यायालयीन निकालांचे वाचन करावे.

freedomdefined.org/Definition वर प्रयुक्त शब्दअनुवादात प्रयुक्त मराठी शब्द रचनाfreedomdefined.org/Definition वर प्रयुक्त शब्दअनुवादात प्रयुक्त मराठी शब्द रचना
Free Cultural Works" →मुक्त सांस्कृतीक काम'enjoy the benefits of using it →उपयोगाच्या फायद्यांचा लाभ (संबधितांस घेऊ) देण्यास स्वतंत्र असले पाहिजे
works of authorship should be free →(कोणत्याही) कामांची निर्मिती (मालकी-अधिकार मात्र) मुक्त(स्वतंत्र) असली पाहिजेderived Work" →'निष्पादित काम', बेतलेले, मिळवलेले, व्युत्पन्न, साधीत
creative ways" →'सर्जक निर्मिती'free license →मुक्त उपयोगाचा परवाना
applied →'उपयोजन'convey →संप्रेषित/व्यक्त
Free Cultural Works" →'मुक्त सांस्कृतीक काम'Free Cultural Works" →'मुक्त सांस्कृतीक काम'

आपले https://freedomdefined.org चे वाचन सुलभ व्हावे म्हणून काही केवळ इंग्रजी-मराठी शब्दार्थ (कायद्यातील व्याख्या नव्हे); काही शब्दार्थ मराठीभाषा डॉट ऑर्ग च्या साहाय्याने. कायद्यातील व्याख्यांसाठी भारतीय प्रताधिकार कायद्याचे आणि न्यायालयीन निकालांचे वाचन करावे.