विकिपीडिया:मासिक सदर/जुलै २०१७

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) हे अंतराळात बांधले जाणारे संशोधन केंद्र आहे. याचे बांधकाम १९९८ मध्ये चालू झाले.१९९८ मध्ये अंतराळात पाठवलेले हे स्थानक २०११ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित झालेले आहे, ते आतापर्यंत अंतराळात पाठवलेले सर्वांत मोठे स्थानक आहे. ते फुटबॉलच्या मैदानापेक्षाही मोठे आहे. जगभरातील सोळा देशांनी एकत्र येऊन हा प्रकल्प राबविला आहे. अमेरिका, रशिया, जपान, कॅनडा आणि १० युरोपियन देशांचा त्यात प्रत्यक्ष सहभाग आहे.तासाला २७,७२४ किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालते; म्हणजे ९१ मिनिटांत एक प्रदक्षिणा पूर्ण होते. हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३५० कि.मी. उंचीवर आहे. हे स्थानक म्हणजे एक कृत्रिम उपग्रह असून, तो आतापर्यंतच्या कोणत्याही कृत्रिम उपग्रहापेक्षा खूप मोठा आहे. स्थानकाला रशियन ऑर्बिटल सेगमेंट (आरओएस) आणि युनायटेड स्टेट्स ऑर्बिटल सेगमेंट (युएसओएस) अशा दोन भागात विभागण्यात आले आहे. याची लांबी २४० फूट, तर रुंदी ३३६ फूट आहे. यामध्ये सहा व्यक्ती एका वेळेस राहण्याची व्यवस्था आहे. २ नोव्हेंबर २००० पासून या स्थानकात सलग &0000000000000023.000000२३ वर्षे, &0000000000000226.000000२२६ दिवस अंतराळवीरांचे वास्तव्य आहे. आयएसएस २०२४ पर्यंत अनुदानित आहे आणि २०२८ पर्यंत कार्यरत राहण्याची शक्यता आहे.

पुढे वाचा... आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन