विजू खोटे

विजू खोटे (जन्म:१७ डिसेंबर, १९४१ - ३० सप्टेंबर २०१९) हे हिंदी चित्रपटांतून काम करणारे मराठी अभिनेते होते. त्यांनी ४४०पेक्षा अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांतून कामे केली होती.[१]

विजू खोटे
विजू खोटे
जन्मविजू खोटे
१७ डिसेंबर, १९४१
मुंबई
मृत्यू३० सप्टेंबर, २०१९ (वय ७७)[१]
मुंबई
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रअभिनय
भाषामराठी
वडीलनंदू खोटे
नातेवाईकदुर्गा खोटे(चुलती),
शुभा खोटे(बहिण),
भावना बलसावर(भाची)

कुटुंब

अभिनेत्री शुभा खोटे ही विजू खोटेंची बहीण असून 'झाँसी की रानी'त ज्यांनी काम केले होते ते नंदू खोटे हे त्यांचे वडील आणि दुर्गा खोटे ही त्यांची चुलती होती.[१]

विजू खोटे यांची भूमिका असलेले मराठी चित्रपट

  • अदाबदली
  • अशी ही बनवाबनवी
  • आयत्या घरात घरोबा
  • एक उनाड दिवस
  • उत्तरायण
  • माझा नवरा तुझी बायको
  • या मालक
  • मास्तर एके मास्तर
  • नवरा माझा भवरा

विजू खोटे यांचे चित्रपटांतील प्रसिद्ध उद्गार

"सरदार मैने आपका नमक खाया है ('शोले' चित्रपटातला काल्या डाकू.).

" गलतीसे मिस्टेक हो गया" ('अंदाज अपना अपना' मधला राॅबर्ट)


संदर्भ