विनायक महादेव कुलकर्णी

(वि.म. कुलकर्णी या पानावरून पुनर्निर्देशित)

वि.म. कुलकर्णी (ऑक्टोबर ७, इ.स. १९१७ - मे १३, २०१०) हे मराठी भाषेतील कवी आणि बालकुमार-साहित्यिक होते.

विनायक महादेव कुलकर्णी
जन्ममहाराष्ट्र, भारत
मृत्यू,महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट, शिक्षण
भाषामराठी
साहित्य प्रकारकथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र लेखन, वृत्तपत्रलेखन

जीवन

कुलकर्ण्यांचा जन्म महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या कुलकर्णी यांनी १९४० मध्ये तर्खडकर सुवर्णपदकासह बी.ए.ची पदवी प्राप्त केली. ते मुंबई विद्यापीठातून १९४२ मध्ये एम.ए. झाले आणि मराठी विषयात प्रथम क्रमांक मिळवून ते चिपळूणकर पारितोषिकाचे मानकरी ठरले. ’नाटककार खाडिलकर’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी १९५० मध्ये पीएच.डी. संपादन केली. बेळगाव येथील लिंगराज कॉलेजमध्ये १९४४ ते १९५० या काळात ते मराठीचे प्राध्यापक होते. त्यानंतर ते सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये रुजू झाले आणि १९७७ मध्ये निवृत्त होऊन पुण्याला स्थायिक झाले.

डॉ. यू.म. पठाण, निर्मलकुमार फडकुले आणि सुशीलकुमार शिंदे हे त्यांचे विद्यार्थी. यू.म. पठाण पुढे दयानंद कॉलेजमधे प्राध्यापक झाले.

प्रकाशित सहित्य

  • अंगत पंगत (बालकवितासंग्रह)
  • आश्विनी (काव्यसंग्रह)
  • कमळवेल (काव्यसंग्रह)
  • गाडी आली गाडी आली झुक झुक झुक (बालगीत)
  • गरिबांचे राज्य (चित्रपटकथा)
  • चंद्राची गाडी (बालकवितासंग्रह)
  • चालला चालला लमाणांचा तांडा(पाठ्यपुस्तकातली कविता)
  • छान छान गाणी (बालकवितासंग्रह)
  • झपूर्झा (ग्रंथसंपादन)
  • नवी स्फूर्तिगीते (बालगीते)
  • नौकाडुबी (अनुवादित कादंबरी)
  • न्याहारी (कथासंग्रह)
  • पहाटवारा (काव्यसंग्रह)
  • पाऊलखुणा (काव्यसंग्रह)
  • पेशवे बखर (ग्रंथसंपादन)
  • प्रसाद रामायण (काव्यसंग्रह)
  • फुलवेल (बालकवितासंग्रह)
  • भाववीणा (काव्यसंग्रह)
  • मराठी सुनीत (ग्रंथसंपादन)
  • मला जगायचंय (कादंबरी)
  • मुक्तेश्वर सभापर्व (ग्रंथसंपादन)
  • मृगधारा (काव्यसंग्रह)
  • रंगपंचमी (बालकवितासंग्रह)
  • रामजोशीकृत लावण्या (ग्रंथसंपादन)
  • रामसुतकृत साधुविलास (संपादित ग्रंथ)
  • ललकार (बालकवितासंग्रह)
  • विसर्जन (काव्यसंग्रह-१९४३)
  • वृत्ते व अलंकार (भाषाशास्त्र)
  • साहित्य दर्शन (ग्रंथसंपादन)
  • साहित्यशोभा वाचनमाला (संपादित ग्रंथ)

प्रसिद्ध कविता

  • आम्ही जवान देशाचे (कविता) (गायक : पंडितराव नगरकर)
  • एक अश्रू (कविता)
  • एक दिवस असा येतो (कविता)
  • गाडी आली गाडी आली झुक झुक झुक (कविता)
  • माझा उजळ उंबरा (कविता) (गायक : गजानन वाटवे)
  • माझा (कविता) (गायक : गजानन वाटवे)
  • माझ्या मराठीची गोडी (कविता) (गायक : कमलाकर भागवत)
  • लमाणांचा तांडा (कविता)
  • सावधान (कविता)(गायक : वसंतराव देशपांडे)
  • ते अमर हुतात्मे झाले

पुरस्कार

  • गदिमा पुरस्कार
  • कविश्रेष्ठ भा. रा. तांबे पुरस्कार
  • दिनकर लोखंडे बालसाहित्य पुरस्कार
  • उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून राज्यशासनाचा पुरस्कार
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन