शिग्मो

शिग्मो हा गोवा राज्यात साजरा होणारा होळीचा सण आहे.[१]

स्वरूप

शिग्मो उत्सवात सहभागी युवक

गोव्यामध्ये साजरा होणारा हा वसंत ऋतूतील महत्वाचा सण मानला जातो. एकूण १४ दिवस हा सण साजरा करण्याची गोव्यामध्ये पद्धती आहे. हिंदू पौराणिक परंपरा आणि गोव्यातील परंपरा यांच्या एकत्रित मिश्रणातून हा सण साजरा केला जातो.[२]हा सण गोव्यात दोन प्रकारे साजरा होतो- १. धाकला आणि २. थोरला .[३]धाकला शोग्मो नवमी तिथीपासून पौर्णिमा तिथीपर्यंत साजरा होतो. प्रामुख्याने पोंडा, कलंगुट या ठिकाणी हा साजरा करतात. गोवायातील प्राचीन देवता रवळनाथ, शांतादुर्गा, मंगेशी,सांतेरी , म्हाळसा या देवीदेवतांची विशेष पूजा या काळात केली जाते.[४]

लोकसंस्कृती

रोमट, मेल, गोफ,दशावतारी खेळ असे पारंपरिक लोककलाप्रकार या उत्सवात खेळले जातात. होळी पेटविणे, रंग खेळणे यातूनही उत्सवाचा आनंद घेतला जातो.

शोभायात्रा

या उत्सवाच्या काळात गोव्यातील विविध रस्त्यांवरून आयोजित केल्या जाणा-या शोभायात्रा हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. विविध रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेले स्त्री पुरुष- नृत्य करणारे लोक असे या शोभायात्रेचे स्वरूप असते. शिग्मो उत्सवी पर्वातील शोभायात्रा हे पर्यटकांचे विशेष आकर्षण असते.[५]गोवा पर्यटक महामंडल या शोभायात्रेच्या आयोजनात पुढाकार घेते. गोव्याच्या पणजी, वास्को, पोर्वोरीम, पोंडा अशा ठिकाणी या यात्रांचे आयोजन केले जाते.[६]

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन