सांगली

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर
हा लेख सांगली शहराविषयी आहे. सांगली जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


सांगली Sangli.ogg उच्चार हे महानगर पश्चिम महाराष्ट्रात (पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख महानगर आहे) वसलेले आहे.

  ?सांगली

महाराष्ट्र • भारत
—  महानगर  —
Map

१६° ५२′ ००″ N, ७४° ३४′ ००″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ११८.१८ चौ. किमी
जिल्हासांगली जिल्हा
लोकसंख्या
घनता
५,०२,७९३ (२०११)
• ४,२५४/किमी
महापौरदिग्विजय सूर्यवंशी
उपमहापौरउमेश पाटील
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१६४१६
• +०२३३
• MH-10, MH-60
संकेतस्थळ: सांगली o संकेतस्थळ

सांगली शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे कृष्णा नदीच्या काठावर वसले असून कृष्णा-वारणा नद्यांचे संगमस्थान हरिपूर या शहराच्या नैर्ऋत्येस ४ किमी. वर आहे. सांगली येथे इ.स १८७६ ते ८ फेब्रुवारी १९९८ पर्यंत नगरपालिका होती. ९ फेब्रुवारी १९९८ पासून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर मिळून महानगरपालिका अस्तित्वात आली. इ.स २०११ च्या जनगणनेनुसार या महापालिकेची एकूण लोकसंख्या ५,०२,७९३ असून त्यामध्ये २,४९,१५३ पुरूष व २,५३,६४० स्त्रिया होत्या. [१] एकूण क्षेत्रफळ ११८ चौ. किमी. असून प्रभागांची संख्या २० आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) प्रादेशिक कार्यालय सांगली येथे असून जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे जिल्हास्तरावरील केंद्र व राज्यस्तरावरील शासकीय, निमशासकीय व महामंडळांची कार्यालये येथे आहेत. वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने सांगलीला प्रामुख्याने कृषी उत्पादनांचा व्यापार मोठा आहे. हळदीची आशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ येथे असल्याने या शहराला ‘हळदीचे शहर’ असे संबोधले जाते. शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्याही सांगली प्रसिद्घ आहे. कला वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र, विधी, व्यवस्थापनशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुशिल्प, औषधनिर्माणशास्त्र, आयुर्वेदिक, वैद्यक, दंतविज्ञान, पर्यावरण विज्ञान इ. शाखांची महाविद्यालये सांगलीत आहेत. मराठी नाटकाचे हे उगमस्थान असल्याने सांगलीला ‘नाट्यपंढरी’ असे संबोधले जाते. सांगलीचे अधिपती सर चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन यांनी राजाश्रय दिल्यामुळेच विष्णुदास भावे यांनी इ.स १८४३ साली लिहिलेल्या सीता स्वयंवर या नाटकाचा प्रथम प्रयोग सांगली येथे झाला. [२] सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१ चा सहकारी साखर कारखाना आहे. सांगली शहर हे पहिलवानांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. हिंदकेसरी मारुती माने [३] तसेच बिजली या नावाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात ओळखले जाणारे माजी आमदार कै. संभाजी पवार हेही याच मातीतले. [४] कुस्तीगीरांचे शहर अशीही सांगलीची ओळख आहे.

सांगली नावाची व्युत्पत्ती

सांगली गावाच्या नावाची व्युत्पत्तीविषयी अनेक ग्रह प्रचलित आहेत. काहींच्या मते कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांच्या पवित्र संगमाजवळ वसलेलं गाव म्हणून गावाचं नाव र्संगमहल्ली. काहींच्या मते मूळ नांव संगलगी या कानडी नावाचा अपभ्रंश होऊन 'सांगली' नाव रूढ झाले. जुन्यात जुना कागदोपत्री पुरावा गांवकामगार पाटील कै. पद्माण्णा वीरगोंडा यांच्या इ.स. १८५६-५७ सालची जमाखर्चाच्या वहीत “सा-ग-ली असे "सा" वर अनुस्वार नसलेले गावाचे नाव आढळते. तथापि कृष्णा नदीकाठी सहा गल्ली ( गांव भाग , पेठ भाग , गवळी गल्ली , चांभार वाडा , वखार भाग , जांभवाडी ) असलेलं गाव म्हणजे `सांगली' ही त्यातल्या त्यात सर्वमान्य असलेली समजूत. सांगलीच्या नावाविषयी अशा अनेक समजुती, आख्यायिका दिसून येतात. [५]

इतिहास

सांगली शहराला सुंदर चेहरा मिळाला तो इ.स. १८०१ साली. त्याच्या आधी गाव अस्तित्वातच नव्हतं असं नाही, पण ते अगदीच नगण्य होतं. पेशवाई काळात पटवर्धन राजाची मिरज ही जहागिरी होती.[६] त्यांच्या २२ कर्यातींपैकी सांगली एक होती. या पटवर्धन घराण्यात मालमत्तवरून वाद झाल, आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या संमतीने पटवर्धन घराण्यात वाटण्या झाल्या. त्यापैकी थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यानी आपला हिस्सा घेऊन बाहेर पडले. कृष्णातटाकी आणि उंचवट्यावर सांगली हे गाव त्यांना आवडलं. इ.स. १८०१ साली चिंतामणराव पटवर्धन यांनी सांगली संस्थान स्थापन केलं.[७] तरी सुरुवातीची काही वर्षे, धोंडजी वाघ , करवीरकरांविरुद्ध चाललेल्या युद्धातच गेली. नंतर सांगली गावाच्या संरक्षणासाठी सुप्रसिद्ध 'गणेशदुर्ग' त्यानी बांधून घेतले. चारी बाजूंनी खंदक असलेला म्हणजे 'भुईकोट किल्ला'  सांगलीचे एक वैशिष्ट्य होतं ! (गणेशदुर्गाच्या तुरुंगातून स्वातंत्र्यसंग्रामात वसंतदादा पाटील यांनी खंदकात उड्या टाकून ऐतिहासिक पलायन केलं होतं.) [८] संरक्षणासाठी गणेशदुर्ग बांधल्यावर पूजेसाठी आता देऊळ हवंच. पटवर्धन राजे हे परम गणेशभक्त. म्हणून इ.स. १८११ साली चिंतामणराव पटवर्धन नी सांगलीचं भूषण ठरणारं गणपती मंदिर बांधायला घेतलं.[९] इ.स. १८१४ मध्ये पायाभरणी झाली. ३० वर्षानंतर काम पूर्ण होऊन . अहिल्याबाई होळकर यांनी महाबळेश्वर येथे आणलेल्या संगमरवरी दगडांपैकी काही दगड चिंतामणरावांनी आणले. त्यातून पंचायतनच्या पाच मूर्ती बनविण्यात आल्या. इ.स. १८४५ मध्ये चैत्र शुद्ध दशमीला मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना व पूजाअर्चा विधी झाला. यानंतर दोन वर्षांनी म्हणजे इ.स. १८४७ साली मंदिराच्या शिखराचे काम पूर्ण करण्यात आले. इ.स. १८४७ साली मार्गशीर्ष महिन्यात मंदिराचा कलशारोहण समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. [१०]सुशिक्षितांचं गाव म्हणून पुण्याच्या खालोखाल नाव घेतल्या जाणाऱ्या सांगलीत १८६१ मध्ये सार्वजनिक शिक्षणाची सुरुवात झाली. १९०३ साली सांगली संस्थानच्या गादीवर आलेल्या दुसऱ्या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या कारकिर्दीत. सांगलीचा खरा पाया घातला गेला. १९०५ ते १९१० या पाच वर्षात दुसरे श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालयाची इमारत, तसेच नगरपालिका आणि सांगली हायस्कूलची सध्याची इमारत. संस्थानचे प्रशासक कॅप्टन बर्क यांच्या कल्पकतेतून. बांधकामे झाली आणि सांगलीच्या वैभवात ऐतिहासिक भर पडली.[११]सांगलीचं व्यापारीदृष्ट्या विकास सन इ.स. १९२९ साली आयर्विन पूलाच्या उभारणीनंतर सुरू झाला. आयर्विन पुलाला त्र्याण्णव हून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत.[१२]

भूगोल

कृष्णाकाठची अतिशय सुपीक अशी जमीन सांगलीला लाभलेली आहे. त्यामुळे येथे चवदार भाजीपाला पिकवला जातो. ऊस व द्राक्षे इथे पिकतात. ज्वारी व बाजरी इथे बहरतात.तासगाव तालुक्यातील द्राक्षे व बेदाणे तर जगभर प्रसिद्ध आहेत.

पेठा

सांगली मिरज हे जुळे शहर म्हणुन ओळखले जाते. अमराई बाग( Garden ) फार सुंदर आहे. सध्या बापट मळा म्हणजेच महावीर उद्यान शहरवासीयांचे आवडते ठिकाण झाले आहे.

हवामान

माहिती हवामान तक्ता - सांगली
जाफेमामेजुजुनोडी
 
 
3.8
 
31
12
 
 
0.5
 
33
15
 
 
5.3
 
36
18
 
 
22.1
 
38
21
 
 
48.3
 
37
22
 
 
71.1
 
31
22
 
 
108.7
 
28
21
 
 
79.8
 
28
21
 
 
99.6
 
30
20
 
 
88.9
 
32
19
 
 
33.5
 
30
16
 
 
6.9
 
30
13
तापमान °C मध्ये पाउस मात्रा mm मध्ये
दुवा: Government of Maharashtra
इंपेरीयल कंव्हर्जन
जाफेमामेजुजुनोडी
 
 
0.1
 
88
54
 
 
0
 
91
59
 
 
0.2
 
97
64
 
 
0.9
 
100
70
 
 
1.9
 
99
72
 
 
2.8
 
88
72
 
 
4.3
 
82
70
 
 
3.1
 
82
70
 
 
3.9
 
86
68
 
 
3.5
 
90
66
 
 
1.3
 
86
61
 
 
0.3
 
86
55
तापमान °F मध्येपाउस मात्रा इंचेस मध्ये

जैवविविधता

सांगली परिसर वेगवेगळ्या वनस्पती व प्राण्यांनी समृद्ध आहे. कृष्णा नदी आणि लहानमोठ्या तलावांमुळे परिसर समृद्ध आहे.

अर्थकारण

सांगलीचे अर्थकारण मुळ व्यापार आहे. सबंध जिल्ह्यातून तसेच शेजारील जिल्ह्यातील व कर्नाटकातील काही भागाचा दैनंदिन व्यवहार सांगलीतूनच चालतो. येथील अर्थकारण व राजकारण यांचा मिलाप येथे दिसून येतो. येथील ऊस, द्राक्ष तसेच दूध याभोवती समाजकारण व त्याभोवती राजकारण फिरते. 

बाजारपेठ

सांगलीची हळदीची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. शेअर मार्केट प्रमाणे संगलीमध्ये हळदीचा वायदा बाजार देशात प्रसिद्ध आहे. तसेच द्राक्ष उत्पादनातही सांगली आघाडीवर आहे. साखरेसाठी ही सांगली प्रसिद्ध आहे. सांगली व तासगावची बाजारपेठ बेदाणे सौदयासाठी प्रसिद्ध आहे.

प्रशासन

नागरी प्रशासन

जिल्हा प्रशासन

अधिक माहितीसाठी पहा - http://sangli.nic.in/

वाहतूक व्यवस्था

सांगली रेल्वे स्थानक पुणे-मिरज रेल्वेमार्गावर असून येथे अनेक महालक्ष्मी एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस इत्यादी अनेक लांब पल्ल्याच्या जलद गाड्या थांबतात. रत्‍नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 सांगलीमधून जातो. पुणे-बंगळूर महामार्गावरून पेठ ह्या गावापासून सांगली ४५ किमी अंतरावर आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अनेक हिरकणी,निमआराम,शयनयान आसनी व शिवशाही बसेस सांगलीला महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व प्रमुख शहरांसोबत जोडतात. शहरांतर्गत वाहतूकीसाठी शहरी परिवहन बसेस मिरज, कुपवाड,जयसिंगपूर, माधवनगर,अहिल्रियानगर उपलब्ध आहेत.मोठ्या प्रमाणात महाविद्यालये असल्यामुळे वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे सांगली मध्ये कोणत्याही वाहतुकीच्या अडचणी निर्माण होत नाहीत.आता येथून शासनातर्फे 'शिवशाही' ही वातानुकुलीत बससेवा सुरू झाली आहे.या वातानुकुलीत बससेवेद्वारे सांगली मुंबई,पुणे,औरंगाबाद,शेगांव, नाशिक,सोलापूर,लातूर,नांदेड या शहरांना जोडले गेले आहे. रत्‍नागिरी ते हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाला असून तो सांगली मधून जातो

लोकजीवन

सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे सर्व वर्गातील लोक अगदी गुण्या-गोविंदाने राहतात. सर्व धर्माचे लोक आपली संस्कुती जतन करतात. सांगली शहरात ब-याच जातीचे लोक रहात असून सर्व भाऊ भाऊ प्रमाने वागत असतात.

संस्कृती

मराठी रंगभूमीचा जन्म सांगली शहरात झाला.विष्णूदास भावे हे पहिले नाटककार येथे होऊन गेले. त्यांनी मराठी नाटक आणि रंगभूमीला अधुनिक चेहरा दिला. त्यांची अनेक नाटके आजवर गाजली असून सांगलीत त्यांच्या नावाचे प्रशस्त अशी नाट्यगृहं उभारण्यात आली आहेत.[ संदर्भ हवा ] नाटकांमुळे कलाकारांची मोठ्या प्रमाणावर शहरात वर्दळ असते. सांगली शहराची नाट्यपंढरी अशीही ओळख आहे. सांगली जशी नाट्यपंढरी आहे तसेच सांगलीची ओळख बुद्धिबळाचे माहेरघर म्हणून देखील प्रसिद्ध आहे. [१३]

प्रसारमाध्यमे

शैक्षणिक विकासाबरोबरच वृत्तपत्रांचा विकासही या शहरात दिसून येतो. १९३७ मध्ये सांगलीत दक्षिण महाराष्ट्र आणि विजय ही साप्ताहिके प्रकाशित होत असत.[१४] तेंव्हापासून सांगलीमध्ये वृत्तपत्रांची परंपरा आहे. आजमितीला सांगलीतून लोकमत, पुढारी, सकाळ, दक्षिण महाराष्ट्र , केसरी ,राष्ट्रशक्ती, जनप्रवास आणि तरुण भारत ही वृत्तपत्रे प्रकाशित होतात. सांगलीमध्ये फार पूर्वी पासून आकाशवाणीचे शक्तिशाली केंद्र असून याची सेवा अगदी धारवाड पर्यंत ऐकली जात होती. एफ एम केंद्राद्वारे ही सांगली आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता येतात. त्याच बरोबर ९०.४ ग्रीन एफ एम, ९१.१ रेडीओ सिटी आणि ९१.९ आपलं एफ एम ही रेडिओ चैनल सुद्धा अग्रभागी आहेत.

शिक्षण

प्राथमिक व विशेष शिक्षण

सांगली शहरात अनेक नावाजलेल्य प्राथमिक शिक्षण संस्था आहेत

  • सांगली शिक्षण संस्था

सिटी हायस्कूल, हि. हा. रा. चिं. पटवर्धन हायस्कुल, रामदयाल मालु हायस्कुल, कै.ग.रा. कन्यापुरोहित प्रशाला, म के आठवले विनय मंदिर, बापटबाल शिक्षण मंदिर ,सिटी इंग्लिश मिडीयम स्कूल, इत्यादी .

  • डेक्कन एजुकेशन सोसाइटी

सांगली हायस्कूल, आरवाडे हायस्कूल

महत्त्वाची महाविद्यालये

  • वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय (विश्रामबाग).
  • विलिंग्डन महाविद्यालय
  • लठ्ठे एज्यूकेशन सोसायटी
  • आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर
  • शांतिनिकेतन महाविद्यालय
  • भारती विद्यापीठ
  • आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी
  • आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनियरींग
  • पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
  • चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स
  • आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन
  • कस्तुरबाई वालचंद कॉलेज (के डब्लू सी)
  • गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स (जी.ए. कॉलेज)
  • राजारामबापू इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
  • पद्मभूषण वसंतदादा पाटील दंत महाविद्यालय
  • मिरज मेडिकल कॉलेज
  • मथु बाई गरवारे महाविद्यालय
  • पतंगराव क़दम महाविद्यालय
  • मिरज महाविद्यायालय, मिरज

पर्यटन स्थळे

सांगलीतील पर्यटनस्थळे ही अगदी मोजकीच आहेत, जी काही जणांसाठी एकांतातले भक्तीचे आध्यात्मिक स्थान, तर काही जणांसाठी पिकनिक पॉईंट तर काही जणांसाठी कपल्स् आणि जोडप्यांचे रमणीय ठिकाण वा मित्रांसाठी एकदिवसीय ट्रिपची एक प्रकारची अविस्मरणीय पर्वणीच आहे. यात प्रामुख्याने काही मंदिरे आणि काही बाह्य परिसरातील ठिकाणे आहेत. ज्यामध्ये खालील ठिकाणांचा समावेश होतो.

आमराई बाग

आमराई ही सांगलीतील सर्वात मोठी बाग आहे. आणि सुमारे १७३ वर्षांपूर्वी श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांनी वसवली होती. त्यावेळी अस्तित्वात असलेल्या मोठ्या संख्येने असलेल्या आंब्याच्या झाडांवरून त्याचे नाव पडले असल्याचे सांगितले जाते. हे जवळजवळ ६.०७ हेक्टर ( १५ एकर) क्षेत्र व्यापते आणि ३०४, ८० मीटर (१,००० फूट) लांब प्रवेशद्वार आहे ज्यात भव्य झाडे आहेत. यात औषधी मूल्याची विविध झाडे आणि झुडपे अशा तब्बल २०० प्रकारांचा समावेश आहे. प्रमुख झाडांपैकी चिंच, बदाम, देवदार, कासुरिना, आंबा आणि इतर अनेक जाती आहेत. या उद्यानाची देखभाल आता शासनाकडून केली जाते आणि ती उद्यान व उद्यान अधीक्षक, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे आहे. एक रोपवाटिका विभागही स्थापन करण्यात आला असून सांगलीतील वनस्पती शास्त्रात संशोधन करणाऱ्या महाविद्यालयांना आवश्यक रोपांचा पुरवठा केला जातो. वन-महोत्सवाला २४ विविध जातींची एक ते चतुर्थांश लाख रोपे पुरवण्याबरोबरच रोपवाटिका दोन लाख अतिरिक्त रोपे तयार करते जी नाममात्र दरात विकली जातात. विविध प्रकारच्या फुलझाडांच्या बिया आणि रोपेही विकली जातात. उद्यानाच्या देखभालीवर शासन दरवर्षी सुमारे दोन लाख रुपये खर्च करते.[१५]

प्रतापसिंह उद्यान

सांगलीचे दुसरे श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन राजाने दान केलेली बाग महानगरपालिकेच्या इमारतीजवळ आहे. ही बाग १४८१.२२ मीटर २ (१७५० चौ. यार्ड) क्षेत्रफळात पसरलेली आहे. मध्यभागी प्रतापसिंहाचा संगमरवरी अर्धपुतळा बसवला आहे आणि बागेला शोभा देणारे तीन कारंजे पैकी दोन आहेत. कोयनेल वनस्पतींच्या मदतीने मार्ग आणि क्रॉस-पाथ सोडून चौरस तयार केले जातात. काही सुबक लॉनही तयार करण्यात आले आहेत. क्रॉस-पाथ लताच्या कुंड्यांनी सजवलेले आहेत. मानव आणि प्राणी आकृत्या कलात्मकरित्या वनस्पतींमधून कापल्या गेल्या आहेत आणि आकारात ठेवल्या आहेत. त्यातील काही भाग महिलांसाठी बाजूला ठेवला आहे. पण बागेचे सर्वात लक्षवेधक वैशिष्ट्य म्हणजे चाकरव्यूहा किंवा कोयनेल वनस्पतींनी बनलेला एक प्रकारचा लढाईचा प्रकार.[१६]

सांगली संस्थानचे गणपती मंदिर

गणपती मंदिर हे सांगलीचे आराध्य दैवत आहे. पेशव्यांच्या काळात चिंतामणराव पटवर्धन यांनी इ.स. १८४५ मध्ये हे मंदिर बांधले. मंदिराचे शिखर ८०० फूट उंच आहे. मंदिराचा परिसर अडीच एकर असून. मंदिर दिशा साधन तंत्राचा वापर आणि राजस्थानच्या लाल दगडांनी बांधले आहे. मंदिरात चतुर्भूज मूर्ती हे डाव्या सोंडेची असून सोबत रिद्धी – सिद्धीही आहेत. मंदिर हे तीन मुख्य चौकात विभागला आहे. मधल्या चौकात मुख्य मंदिर असून भोवताल श्री चिंतामणीशेश्वर (श्री शंकर), श्री सूर्यनारायण, श्री चिंताणेश्वरी देवी , श्री लक्ष्मी – नारायण अशी पाच मंदिरे आहेत.[१७]

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा

छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ स्थिती, पूर्वेकडील कांस्य. त्यांच्या नावावर असलेल्या भाजी मंडईसमोर बसवले आहे. इतर अनेक पुतळ्यांप्रमाणे, येथे तो सरपटत्या स्थितीत चित्रित केलेल्या घोडीवर स्वार होताना दाखवला आहे. हे ३.६५ मीटर (१२') रुंद आणि २.४३ मीटर (८') उंचीच्या पायथ्याशी बसवले आहे. महाराजांची पुतळ्याची स्थिती ३.२० मीटर (१० १/२) उंच आहे आणि अतिशय भव्य आणि आकर्षक दिसते. त्याची स्थापना इ.स ३१ जुलै १९६२ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि भारताचे विद्यमान गृहमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.[१८]

आयर्विन ब्रिज आणि परिसर

आयर्विन पुलाला 93 वर्ष पूर्ण झाले.[१९] पुलाच्या परिसरामध्ये माई घाट, [२०] श्री स्वामी समर्थ मठ आणि स्वर्गवासी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची समाधी सुद्धा याच परिसरामध्ये आहे.[२१]

संदर्भ

बाह्य दुवे