सातारा जिल्हा

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा.

सातारा जिल्हा (Satara.ogg उच्चार ) भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुणे विभागातील एक जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे । सातारा जिल्हा हा संत महात्मे व योग्यांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो । सप्तर्षिंपैकी एक वैदिक ऋषि व ब्रम्हदेवांचे मानसपुत्र महर्षि भृगु ह्यांचे तपःस्थान व समाधी मंदिर साताऱ्यात आहे । श्री समर्थ रामदास स्वामी ह्यांचा सज्जनगड , श्री गगनगिरी महाराज ह्यांचे जन्मस्थान पाटण हे देखील साताऱ्यात आहे । सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. आधुनिक भारतातसुद्धा सातारा जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ह्या जिल्ह्याच्या बहुतांश गावांमध्ये युवक भारतीय सेने मध्ये भरती होण्याची परंपरा जपतात. त्यामुळे शूरवीरांचा जिल्हा अशी ओळख ह्या जिल्ह्याने निर्माण केली आहे.

  ?सातारा

महाराष्ट्र • भारत
—  जिल्हा  —
Map

१७° ४२′ ००″ N, ७४° ००′ ००″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ१०,४८४ चौ. किमी
हवामान
वर्षाव

• १,४२६ मिमी (५६.१ इंच)
मुख्यालयसातारा
तालुका/के
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
२७,९६,९०६ (२००१)
• २६६.७७/किमी
१.००५ /
७८.५२ %
• ८८.४५ %
• ६८.७१ %
कलेक्टर व जिल्हा मजिस्ट्रेटशेखर सिंह
जिल्हा परिषदसातारा
संकेतस्थळ: एनआयसी संकेतस्थळ


भूगोल

महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४८० चौ. किमी तर लोकसंख्या ३०,०३,९२२ (२०११) आहे.

सातारा जिल्ह्याची राजधानी हे सातारा शहर आहे। शहराचे नाव शहराभोवती असलेल्या सात किल्ल्या (सात-तारा) पासून आहे । हे कृष्णा नदी व त्याच्या उपनदी, वेण्णा यांच्या संगमाजवळ स्थित आहे ।

सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात येतो. सातारा जिल्ह्याच्या


इतिहास

ई.स.पूर्व २०० मधील प्राप्त कोरीव लेखानुसार सातारा जिल्ह्यातील सर्वात जुने ठिकाण म्हणून कराड (पूर्वी क-हाकड) प्रसिद्ध होते. व पांडवांनी जिथे १३ वर्षांचा वनवास भोगला त्या वाई तालुक्याला ‘विराटनगरी’ म्हणून संबोधले जायचे. दक्षिणात्य मौर्य साम्राज्याच्या काळात दोन दशकापर्यंत (ख्रिस्ती वर्ष ५५०-७५०) सातवाहनांचे राज्य होते. त्यानंतर बदामीचे चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार, देवगिरीचे यादव, बहमनी व आदिल शहा (मुस्लिम राज्यकर्ते ), छत्रपती शाहू महाराज आणि शाहू -२ प्रतापसिंह यांनी राज्य केले. आधुनिक शहर हे १६ व्या शतकात स्थापित झाले होते आणि श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज यांच्या राज्याभिषेकनंतर मराठी राज्‍याची राजधानी झाली. सातारा हे छत्रपती शाहू शहराचे नाव शहराभोवती असलेल्या सात किल्ल्या (सात-तारा) पासून आहे.


वैशिष्ट्ये

सातारा हे गोड: कदी पेढे. म्हणून प्रसिद्ध आहे.सातारा हा प्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. सातारायात छत्रपती शिवाजी महाराजांची एक अनोखी मूर्ती पवई नाका येथे कॅनॉनजवळ उभी आहे. साधारणत: शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांना घोड्यावर बसताना दिसतो. [उद्धरण आवश्यक] कास पठार / फ्लॉवर पठार, आता एक जागतिक नैसर्गिक वारसा आहे. शहराच्या मध्यभागी साताऱ्यात दोन राजवाडे आहेत, जुना पॅलेस (जुना राजवाडा) आणि न्यू पॅलेस (नवा राजवाडा) एकमेकांना लागून आहे. जुना पॅलेस सुमारे 300 वर्षांपूर्वी बांधला गेला होता आणि नवीन पॅलेस सुमारे 200 वर्षांपूर्वी बांधला गेला. साताऱ्याच्या पश्चिमेला 20 कि.मी. पश्चिमेस ठोसेघर धबधबा आहे. पश्चिम घाटातील मॉन्सून पर्यटन स्थळांपैकी एक आहे. विशेषतः जुलै ते ऑक्टोबर दरम्यान पावसाळ्यात लोक या धबधब्याला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातून येतात.सातारापासून २२ किमी अंतरावर वज्रई धबधबा ,सज्जनगड, सातारा पासून सुमारे 15 किमी. सातारा दरवर्षी 'सातारा हाफ हिल मॅरेथॉन' आयोजित करतो. 2015 मध्ये त्यांनी २,6१18 धावपटूंसह बहुतेक लोकांसाठी माउंटन रन (सिंगल माउंटन) साठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पुस्तकात प्रवेश केला. सातारा शहर हे एक सैनिकांचे शहर तसेच निवृत्तीवेतनाचे शहर म्हणून ओळखले जाते.कास पठार येथे वेगवेगळ्या रंगाची आकर्षक फुले पर्यटकाचे मान खेचून घेतात.ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यात या फुलांचा बहार असतो.सातारा जिल्‍हा मराठी राज्‍याची राजधानी होती.त्‍याचा विस्‍तार सुमारे १४लक्ष कि .मी. इतका होता. ई.स.पूर्व २०० मधील प्राप्त कोरीव लेखानुसार सातारा जिल्ह्यातील सर्वात जुने ठिकाण म्हणून कराड (पूर्वी क-हाकड) प्रसिद्ध होते. व पांडवांनी जिथे १३ वर्षांचा वनवास भोगला त्या वाई तालुक्याला ‘विराटनगरी’ म्हणून संबोधले जायचे

सातारा हे सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक जिल्हा आहे.साताराला शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहे.सज्जनगड हा किल्ला सातार मध्ये आहे.सज्जनगड मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू समर्थ रामदासस्वामीची समाधी आहे.रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते.सात डोंगरांनी मिळून बनलेला हा सातारा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे. सातारा मध्ये वास्तुसंग्रहालय आहे.पांडवांनी जिथे १३ वर्षांचा वनवास भोगला त्या वाई तालुक्याला ‘विराटनगरी’ म्हणून संबोधले जायचे .दक्षिणात्य मौर्य साम्राज्याच्या काळात दोन दशकापर्यंत (ख्रिस्ती वर्ष ५५०-७५०) ‘सातवाहनांचे ‘ राज्य होते.हा जिल्हा दक्षिण महाराष्ट्राचाच एक भाग असून आतापर्यंत बदामीचे ‘ चालुक्य ‘ ,’ राष्ट्रकुट ‘,’ शिलाहार ‘, देवगिरीचे यादव ,’ बहामनी ‘ व ‘ आदिल शहा ‘,(मुस्लिम राज्यकर्ते ),’ शिवाजी महाराज ‘ (मराठी राज्यकर्ते ), ‘शाहू महाराज ‘, आणि ‘शाहू -२ प्रतापसिंह ‘यांनी राज्य केले.{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

प्रशासन

तालुक्यांची लोकसंख्या व क्षेत्रफळ

सातारा जिल्ह्यातील एकूण ११ तालुके असून त्यांची सूची पुढीलप्रमाणे आहे.(संदर्भ जनगणना २००१)

क्रतालुकाक्षेत्रफळ (चौ. कि. मी.)लोकसंख्या
महाबळेश्वर३७८.९५४,५४६
वाई६२२.६१,८९,३३६
खंडाळा६००.२१,१९,८१९
फलटण१,१७९.६३,१३,६२७
माण१,६०८.२१,९९,५९८
खटाव१,३७४.०२,६०,९५१
कोरेगाव९५७.९२,५३,१२८
सातारा९५३.५४,५१,८७०
जावळी८६९.०१,२४,६००
१०पाटण१,४०७.८२,९८,०९५
११कऱ्हाड१,०८४.८५,४३,४२४
  • जिल्ह्यातील नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था
क्रतपशील संख्यानावे
नगरपालिका०९सातारा, कऱ्हाड, फलटण, रहिमतपूर, म्हसवड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, मलकापूर
जिल्हा परिषद०१सातारा
पंचायत समित्या११सातारा, वाई, खंडाळा, महाबळेश्वर, कऱ्हाड, पाटण, कोरेगाव, माण, खटाव, फलटण, जावळी
ग्रामपंचायती१४८३---------------------

प्रीतिसंगम

मुख्य लेख: प्रीतिसंगम

कऱ्हाड येथे कृष्णा-कोयना नद्यांचा संगम झाला आहे. या ठिकाणास प्रीतिसंगम म्हटले जाते. येथे कृष्णामाईचे मंदिर आहे. कऱ्हाडचे नाव यशवंतराव चव्हाण यांनी भारतात प्रसिद्ध केले. कऱ्हाडच्या (सातारा जिल्ह्याच्याही) शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीत यशवंतराव चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असणाऱ्या यशवंतरावांची केंद्रीय मंत्रिपदाची व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द गाजली, यशस्वी ठरली. ज्यांच्याकडे सांस्कृतिक जाण होती, विकासात्मक दूरदृष्टी होती अशा यशवंतराव चव्हाण यांची समाधी प्रीतिसंगमावर आहे.

फलटण येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले गेली अनेक वर्षे वास्तव्यास होते. आपल्या ओघवत्या वाणीने, वैशिष्ट्यपूर्ण अशा वक्तृत्वशैलीच्या माध्यमातून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, श्रीरामकृष्ण परमहंस या व्यक्तिमत्त्वांचे एक निराळेच दर्शन महाराष्ट्राला घडवले होते.

ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारताला पहिले पदक मिळवून देणारे श्री. खाशाबा जाधव हे कऱ्हाड तालुक्यातील गोळेश्र्वर या गावचे होते. श्री. जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कुस्ती या खेळात कांस्य पदक मिळविले होते. यांचे शालेय शिक्षण कऱ्हाडमध्ये झाले होते. ऑलिंपिकला जाण्यासाठी कऱ्हाडमधील लोकांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले होते.

ज्येष्ठ लोककलावंत शाहीर साबळे व महाराष्ट्रातील प्रमुख उद्योजक श्री. बी.जी. शिर्के यांचा जन्म जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी या गावचा. आपापल्या क्षेत्रात उच्च शिखर गाठल्यानंतरही या दोहोंनी आपल्या गावाशी संपर्क ठेवलेला होता.

आर्थिक स्थिती

सैन्यात भरती

सातारा जिल्ह्यातून सैन्यात जाण्याची परंपरा आहे. तिच्यात अपशिंगे हे लहान गाव अग्रेसर आहे. या गावातल्या प्रत्येक घरातला निदान एकातरी सदस्य भारतीय सैन्यात भरती झाला आहे. १९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धात चार, १९६५ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात दोन, तर १९७१ च्या युद्धात एक जवान देशासाठी शहीद झाला आहे. देशाच्या सैन्यात योगदान देण्याची या गावची परंपरा लक्षात घेत, लॉर्ड माऊंटबॅटनपासून तर जनरल करिअप्पापर्यंत बऱ्याच बड्या मंडळींनी अपशिंगेला भेट देऊन त्या अनमोल योगदानाची नोंद घेतली आहे.

बाह्य दुवे

भेट कशी द्यावी

सातारा मुंबईपासून राष्ट्रीय महामार्ग 48 वर (मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि पीबी रोड मार्गे) 250 किमी अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक, मुंबई ते कोल्हापूर मार्गे सातारा मार्गे रेल्वे सेवा. बोरिवली, दादर, मुंबई सेंट्रल आणि ठाणे ते सातारा अशी खासगी ट्रॅव्हल्स आणि सरकारी राज्य परिवहन बसेस उपलब्ध आहेत. सातारा हे पुण्यापासून 110 किमी अंतरावर आहे (पुणे विमानतळ सर्वात जवळचे विमानतळ आहे) रस्त्याने.

आकडेवारी संद़र्भ

महाराष्ट्र मार्गदर्शक नकाशासमर्थ उद्योग, औरंगाबाद.

मराठी विश्वकोश खंड १९.

मराठी विश्वकोश १९.