लॉकहीड सी-१३० हर्क्युलीस

(सी.१३० या पानावरून पुनर्निर्देशित)

लॉकहीड सी-१३० हर्क्युलीस हे अमेरिकेच्या लॉकहीड कॉर्पोरेशन (आताची लॉकहीड मार्टिन)ने तयार केलेले चार टर्बोप्रॉप इंजिने असलेले लष्करी मालवाहू विमान आहे. हे विमान सैनिक, सामान तसेच वैद्यकीय मदतीची ने-आण करणारे हे विमान असल्या-नसल्या धावपट्टीवरून चढू-उतरू शकते.

लॉकहीड सी-१३० हर्क्युलीस
अमेरिकी वायुसेनेचे सी-१३० हर्क्युलिस
प्रकारलष्करी वाहतूक विमान
उत्पादक देशFlag of the United States अमेरिका
उत्पादकलॉकहीड मार्टिन
पहिले उड्डाण२३ ऑगस्ट १९५४
सद्यस्थितीसेवेत आहे
उपभोक्तेअमेरिकी वायुसेना
अमेरिकी मरिन कॉर्प्स
रॉयल वायुसेना
रॉयल कॅनडियन वायुसेना
उत्पादन काळ१९५४ - सद्य
उत्पादित संख्या२,५०० पेक्षा जास्त, २०१५ पर्यंत[१]
प्रति एककी किंमतसी-१३०इ: $१.१९ कोटि[२]
सी-१३०एच: $३.०१ कोटि[२]

या विमानाचे अनेक इतरही उपयोग करून घेण्यात आलेले आहेत. एक उपप्रकार, एसी-१३०, हा गनशिप[मराठी शब्द सुचवा] आहे तसेच छत्रीधारी सैनिकांनी सोडणे, शोधबचाव मोहीम, शास्त्रीय संशोधन, हवामान टेहळणी, हवेतल्या हवेत इंधन पुरवठा, समुद्री टेहळणी तसेच वणवे विझवण्यासाठीही हे विमान वापरले जाते. ४० पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारांत तयार केलेले हे विमान ६०हून अधिक देश आपल्या सैनिकी वाहतूकीसाठी वापरतात. भारतीय वायुसेनेने सी-१३०जे प्रकारचे एक विमान २०११ मध्ये दाखल करून घेतले व अधिक पाच विमानांची मागणी नोंदवली आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन