हवामानदर्शक नकाशा

हवामानदर्शक नकाशा एका विशिष्ट क्षेत्रावर वेळच्या वेळी वेगवेगळ्या हवामानशास्त्रीय वैशिष्ट्ये दर्शवितो आणि त्यात विशिष्ट अर्थ असणारी विविध चिन्हे असतात. [१] असे नकाशे १९ व्या शतकाच्या मध्यापासून वापरात आहेत. हे नकाशे संशोधन आणि हवामान अंदाज या उद्देशाने वापरले जातात. आइसोथर्म्स वापरणारे नकाशे तापमानातील बदल (ग्रेडियंट्स) दर्शवितात, [२] ते हवामानातील बदल अगोदरच शोधण्यात मदत करू शकतात. आयसोटाच नकाशे, सरख्या वाऱ्याच्या वेगाच्या ओळींचे विश्लेषण दर्शवितात, [३] ३०० किंवा २५० एचपीएच्या स्थिर दाब पृष्ठभागावर जेट प्रवाह कोठे आहे हे दर्शविते. ७०० आणि ५०० ​​एचपीए स्तरावर स्थिर दबाव चार्टचा वापर उष्णकटिबंधीय चक्रीवादळ गती दर्शवू शकतो. विविध स्तरावर वाराच्या गतीवर आधारित द्विमितीय प्रवाह हे वारा क्षेत्रात अभिसरण आणि विचलनाचे क्षेत्र दर्शवितात, जे पवन नमुन्यात वैशिष्ट्यांचे स्थान निश्चित करण्यात मदत करतात. पृष्ठभागावरील हवामान नकाशाचा एक लोकप्रिय प्रकार म्हणजे पृष्ठभागाचे हवामान विश्लेषण, जे उच्च दाब आणि कमी दाबाचे क्षेत्र दर्शविण्याकरिता स्थंबआलेख (आयसोबार्स) काढतात. क्लाउड कोडचे प्रतीकांमध्ये भाषांतरित केले जाते आणि या व्यावसायिक नकाशावर इतर हवामानशास्त्रीय माहिती सह प्लॉट केले जातात जे व्यावसायिक प्रशिक्षित निरीक्षकांद्वारे पाठविलेल्या सिंनोप्टिक अहवालात समाविष्ट असतात.

२१ ऑक्टोबर २००६ रोजी अमेरिकेचे हवामान विश्लेषण

इतिहास

सर फ्रान्सिस गॅल्टन, हवामानदर्शक नकाशाचा जनक.

आधुनिक जगतात हवामानदर्शक नकाशाचा वापर वादळ प्रणालीवरील सिद्धांत तयार करण्यासाठी १९ व्या शतकाच्या मध्यात सुरू झाला. [४] क्राइमीन युद्धाच्या वेळी वादळाने बालाक्लाव येथे फ्रेंच नौकांचा ताफा उध्वस्त केला. फ्रेंच शास्त्रज्ञ उरबाईन ले वेरियर याने हे दर्शवले की जर वादळाचा कालक्रमानुसार नकाशा अभ्यासला असता तर वादळाच्या मार्गाचा अंदाज लावता आला असता आणि त्या ताफ्याला वादळापासून वाचवता आले असते.

इंग्लंडमध्ये शास्त्रज्ञ फ्रान्सिस गॅल्टन यांनी रॉबर्ट फिट्झरोयचे हवामानाच्या अंदाजाबद्दलच्या कामाबद्दल ऐकले. ऑक्टोबर १८६१ च्या महिन्याचे देशभरातील हवामानची स्थिती विविध स्थानकांवर माहिती गोळा केल्यानंतर, त्याने स्वतःच्या प्रतीकांची प्रणाली वापरून हवामानदर्शक नकाशा बनविला. अशारितीने जगातील पहिला हवामानदर्शक नकाशा तयार झाला. उच्च दाबाच्या क्षेत्राभोवती हवेचे घड्याळ दिशेने फिरते हे सिद्ध करण्यासाठी त्याने हा नकाशा वापरला; त्याने या घटनेचे वर्णन करण्यासाठी 'अँटीसाइक्लोन' हा शब्द तयार केला. वृत्तपत्रात हवामानदर्शक पहिला नकाशा प्रसिद्ध करण्यातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते, ज्यासाठी त्याने पेंटोग्राफमध्ये (रेखाचित्रांची प्रत बनविण्याचे एक साधन) मुद्रण ब्लॉक्सवर नकाशाचे शिलालेख लिहिले. टाइम्सने हवामानशास्त्रीय कार्यालयाच्या माहितीसह या पद्धतींचा वापर करून हवामान नकाशे मुद्रित करण्यास सुरुवात केली. [५]

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन