हालडोर लाक्सनेस

हालडोर लाक्सनेस (इस्लेन्स्का: Halldór Kiljan Laxness; २३ एप्रिल १९०२ - ८ फेब्रुवारी १९९८) हा एक आइसलँडिक लेखक होता. लाक्सनेसने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक कविता, लघुकथा, कादंबऱ्या, वृत्तपत्र लेख लिहिले. त्याच्या साहित्यासाठी लाक्सनेसला १९५५ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. नोबेल मिळवणारा तो आजवरचा एकमेव आइसलँडिक साहित्यिक आहे.

हालडोर लाक्सनेस
जन्म२३ एप्रिल १९०२ (1902-04-23)
रेक्याविक, आइसलँड
मृत्यू८ फेब्रुवारी, १९९८ (वय ९५)
रेक्याविक
भाषाआइसलँडिक
पुरस्कारनोबेल पुरस्कार

बाह्य दुवे

मागील
अर्नेस्ट हेमिंग्वे
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९५५
पुढील
हुआन रमोन हिमेनेझ