हेड (युनिक्स)


head (असे वाचा- हेड) ही यूनिक्स आणि युनिक्स सारख्या ऑपरेटिंग सिस्टीमवरचा एक प्रोग्राम आहे जे फाइलची किंवा पाइप डेटाची सुरुवात दाखवते.

हेड (युनिक्स)
संकेतस्थळ'

लिहिण्याची पद्धत

हेड आदेश लिहिण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे.

head [पर्याय] < फाईलचे‌-नाव > 

जर कोणतीही संख्या आदेशामध्ये दिली नसेल तर हेड त्याच्या इनपुटच्या पहिल्या 10 ओळी मानक आउटपुटवर दाखवेल. कमांड लाइन पर्याय वापरून दाखवलेल्या ओळींची संख्या बदलली जाऊ शकते. खालील उदाहरण फाइलच्या पहिल्या 20 ओळी दाखवते.

 head -n 20 फाइलचे‌-नाव 

हे 'foo' या नावापासून सुरू होणाऱ्या सर्व फायलींच्या पहिल्या 5 ओळी दाखवते.

head -n 5 foo*

बऱ्याचशा आवृत्त्या n वगळण्याची परवानगी देतात आणि फक्त -५ म्हणू देतात. फाइलचा शेवटच्या ओळी दाखवण्यासाठी GNU हेड -n या पर्यायासाठी नकारात्मक संख्यांना परवानगी देते.

ध्वज

 -c < x(बाइट्सची संख्या) > प्रथम x क्रमांकाचे बाइट्स कॉपी करा. 

इतर

युनिक्सच्या सगळ्यात सुरुवातीच्या आवृत्यांमध्ये हा आदेश नाही आणि त्यामुळे दस्तऐवजांमध्ये व पुस्तकांमध्ये हे काम करण्यासाठी sed होते.

sed 5q फाइलचे‌-नाव 

हा आदेश सांगतो कि पहिल्या ५ ओळी दाखवा आणि बाहेर पडा.

sed हा आदेश हेडचे काम उलटे करण्यासाठीही वापरले जाऊ शकते. उदाहरणार्थ खालील आदेश फाइलच्या पहिल्या ५ ओळी न दाखवण्यासाठी वापरता येते.

 sed -n '1,5!p' फाइलचे‌-नाव

अंमलबजावणी

head आदेश आस्कीच्या एमएसएक्स-डॉससाठी एमएसएक्स-डॉस२ साधने आवृत्ती 2 [१] चाही भाग आहे.

हे सुद्धा पहा

  • tail
  • dd
  • युनिक्स आदेशांची यादी

संदर्भ

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन