अलास्का


अलास्का हे अमेरिकेच्या ५० राज्यांपैकी एक आहे. अलास्का व हवाई ही दोन राज्ये अमेरिकेच्या एकमेकांशी संलग्न असलेल्या अन्य ४८ राज्यांपासून वेगळी पडली आहेत. अलास्काच्या पूर्वेला कॅनडा देशाचे युकॉनब्रिटिश कोलंबिया हे प्रांत, उत्तरेला आर्क्टिक महासागर व पश्चिम व दक्षिणेला प्रशांत महासागर आहे. पश्चिमेला बेरिंगची सामुद्रधुनी अलास्काला रशियापासून वेगळे करते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अलास्का हे अमेरिकेचे सर्वात मोठे राज्य आहे, परंतु लोकसंख्या घनतेच्या दृष्टीने अलास्का अमेरिकेतील सर्वात तुरळक लोकवस्तीचे (०.४९ व्यक्ती प्रति चौरस किमी) राज्य आहे.

अलास्का
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
अलास्का राज्याचा ध्वजअलास्का राज्याचे राज्यचिन्ह
चिन्ह
टोपणनाव: The Last Frontier
ब्रीदवाक्य: North to the Future
अलास्का दर्शविणारा नकाशा
अलास्का दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर अलास्काचे स्थान
अधिकृत भाषा-
इतर भाषाइंग्लिश
रहिवासीअलास्कन
राजधानीजुनू
मोठे शहरॲंकरेज
सर्वात मोठे महानगरॲंकरेज
क्षेत्रफळ अमेरिकेत १वा क्रमांक
 - एकूण१७,१७,८५४ किमी² (६,६३,२६८ मैल²)
  - रुंदी३,६३९ किमी 
  - लांबी२,२८५ किमी 
 - % पाणी१३.७७
लोकसंख्या अमेरिकेत ४७वा क्रमांक
 - एकूण७,३१,४४९ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता०.४९/किमी² (अमेरिकेत ५०वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न $६४,३३३
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश(४९वावा क्रमांक)
गव्हर्नरशॉन पार्नेल
संक्षेपAK  US-AK
संकेतस्थळwww.alaska.gov

इ.स. १८६७ साली अमेरिकेने अलास्का प्रदेश रशियन साम्राज्याकडून ७२ लाख डॉलर्स किंमतीला विकत घेतला. ११ मे १९१२ रोजी अलास्काला अमेरिकेचा एक प्रदेश बनवण्यात आले तर ३ जानेवारी १९५९ रोजी अलास्का अमेरिकन संघामधील ४९वे राज्य बनले. जुनू ही अलास्काची राजधानी तर ॲंकरेज हे येथील सर्वात मोठे शहर व महानगर आहे. अलास्कामधील ५० टक्के रहिवासी ॲंकरेज महानगर क्षेत्रामध्येच राहतात.

अलास्काची अर्थव्यवस्था खनिज तेल, नैसर्गिक वायूमासेमारी ह्या नैसर्गिक संपत्तीवर अवलंबून असून येथील वार्षिक दरडोई उत्पन्न अमेरिकेमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.


गॅलरी

संदर्भ

बाह्य दुवे

  • Alaska.gov – अधिकृत संकेतस्थळ
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: