आल्बेर काम्यू

आल्बेर काम्यू (फ्रेंच albɛʁ kamy) (जन्म - ५ नोव्हेंबर, १९१३ मृत्यू - ४ जानेवारी, १९६०) हा एक नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक होता.

आल्बेर काम्यू

जीवन

आल्बेर काम्यूचा जन्म ७ नोव्हेंबर, इ.स. १९१३ रोजी फ्रेंच अल्जिरीयातील मांडोवी (हल्लीचे ड्रीन) येथे झाला. त्याचे वडील ल्युसिए हे गरीब शेतमजूर होते. १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धाच्या काळात त्याच्या वडिलाचा मृत्यू झाला.[१] त्याचे बालपण अतिशय दारिद्र्यात गेले. अर्धवेळ शिक्षण घेऊन त्याने पैसे मिळवण्यासाठी खाजगी शिकवण्या घेतल्या, मीटरालॉजिकल इन्स्टिट्यूटमध्ये कारकून म्हणून नोकरी केली तसेच मोटारकारचे स्पेअर पार्टही विकले. आल्बेर काम्यूने इ.स. १९३५ साली बी.ए. व इ.स. १९३६ साली एम.ए. पूर्ण केले. दरम्यान इ.स. १९३४ साली सिमॉ हाई हिच्याशी त्याचा विवाह झाला. पण त्याचे हे वैवाहिक जीवन लौकरच संपुष्टात आले. नंतर इ.स. १९४० साली काम्यूने फ्रान्सिन फॉर या पियानोवादक स्त्रीशी विवाह केला. तिच्यापासून आल्बेरला कॅथरीन आणि जीन या दोन जुळ्या मुली झाल्या.

कारकीर्द

आल्बेर काम्यूने फ्रेंच कम्युनिस्ट पार्टीमध्ये प्रवेश केला होता पण दोनच वर्षात स्वतंत्र विचारसरणीच्या आल्बेरला पक्षातून काढून टाकण्यात आले. इ.स. १९३८ साली त्याने रिपब्लिकन नावाच्या वर्तमानपत्रात राजकीय वार्ताहर म्हणून काम चालू केले. नंतर त्याने कॉम्बॅट या पॅरीसमधल्या एका वर्तमानपत्रात संपादक म्हणूनही काम केले. इ.स. १९४६ साली कॉम्यूनी संपादकपदाचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ लेखन करायचे ठरवले. इ.स. १९५७ साली त्याला रिफ्लेक्शन्स ऑन दि गिलोटीन या लेखमालेसाठी साहित्यासाठीचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.[२] ४ जानेवारी, १९६० रोजी आल्बेरचा प्रकाशक मित्र मायकेल गॅलीमर्द याच्या मोटारीमध्ये बसून जाताना मोटार अपघात होऊन काम्यूचे निधन झाले.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

मागील
हुआन रमोन हिमेनेझ
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९५७
पुढील
बोरिस पास्तरनाक