एडो

एडो (जपानी: 江戸, "खाडीचे प्रवेशद्वार" किंवा "महाना"), टोकियोचे पूर्वीचे नाव आहे.[१]

एडो
江戸
शहर

भूतपूर्व एडो शहराचे जपानमधील स्थान
देश जपान ध्वज जपान
प्रांत मुसाशी
स्थापना वर्ष १४५७
लोकसंख्या  
  - शहर १०,००,००० (१७२१)


इडो शहर मुसाशी प्रांतात पूर्वी एक जोकामाची (किल्ल्याचे शहर) होते. शहराच्या केंद्रात इडो किल्ला होता. टोकुगावा शोगुनाटेची गादी म्हणून १६०३ पासून इडो जपानची अप्रत्यक्षितरित्या  राजधानी बनली. एडो टोकुगावाच्या कारकिर्दीत जगातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक बनले. १९६८ मध्ये मेजी जीर्णोद्धारानंतर मेजी सरकारने एडोचे टोकियो (東京, "पूर्व राजधानी") असे नामकरण केले आणि जपानच्या सम्राटाचे ऐतिहासिक राजधानी क्योटो येथून टोक्यो शहरात स्थलांतर केले. १६०३ ते १८६८ पर्यंत जपानमधील टोकुगावा राजवटीचा काळ इडो कालावधी म्हणून ओळखला जातो.[२]

इतिहास

टोकुगावा पूर्वी

दहाव्या शतकापूर्वी, या भागातील काही वसाहती वगळता ऐतिहासिक नोंदींमध्ये एडोचा उल्लेख नाही. एडो प्रथम अझुमा कागामीच्या ऐतिहासिक लेखनात आढळते, एडो हे नाव कदाचित हेयान कालावधीच्या उत्तरार्धापासून वापरले जात आहे. त्याचा विकास अकराव्या शतकाच्या उत्तरार्धात कानमू-तैरा कुळाच्या (桓 武平氏) एका शाखेने सुरू झाला, ज्याला चिचिबू कूळ (秩 父 氏) म्हणतात. हे कूळ त्यावेळच्या इरुमा नदीच्या काठावरून, सध्याच्या अरकावा नदीच्या वरच्या बाजूने एडोला आले होते. चिचिबू कुळाच्या प्रमुखाचा एक वंशज या भागात स्थायिक झाला आणि बहुधा त्या जागेसाठी वापरल्या जाणाऱ्या नावावर आधारित, त्याने स्वतःचे इडो शिगेत्सुगु (江戸重継) असे नामांतर केले, आणि एडो कुळाची स्थापना केली. शिगेत्सुगुने आपले तटबंदीचे निवासस्थान बहुधा मुसाशिनो पठाराच्या टोकाभोवती बांधले, जे पुढे चालून इडो किल्ला बनले. शिगेत्सुगुचा मुलगा, एडो शिगेनागा (江 戸 重), याने ११८० मध्ये मिनामोटोनो योरिटोमो विरुद्ध टायराची बाजू घेतली परंतु अखेरीस मिनामोटोला शरण गेला आणि कामाकुरा शोगुनेटचा गोकेनिन बनला. चौदाव्या शतकात शोगुनेटच्या पतनाच्या वेळी, एडो कुळाने दक्षिणेकडील दरबाराची बाजू घेतली आणि मुरोमाची काळात एडो कुळाची ताकद कमी झाली.[३]

टोकुगावा कालखंड

१८०३ मधील एडो मधील प्रसिद्ध ठिकाणे
१८४० च्या दशकातील एडोचा नकाशा

ऑक्टोबर १६०० मध्ये सेकीगाहाराच्या लढाईत विजय मिळवल्यानंतर टोकुगावा इयासू सेनगोकू काळातील सर्वोत्कृष्ट सेनापती म्हणून उदयास आला. त्याने १६०३ मध्ये टोकुगावा शोगुनेटची औपचारिक स्थापना केली आणि त्याचे मुख्यालय एडो किल्ला येथे स्थापन केले. क्योटो शहर सम्राटाचे आसन म्हणून फक्त नावापुरती जपानची राजधानी राहिली, आणि एडो हे राजकीय सत्तेचे केंद्र बनले आणि अप्रत्यक्षितरित्या जपानची राजधानी बनले. एडोचे १४५७ मध्ये मुसाशी प्रांतातील मासेमारीच्या गावापासून १७२१ पर्यंत अंदाजे १०,००,००० लोकसंख्या असलेल्या जगातील सर्वात मोठ्या महानगरात रूपांतर झाले.[४]

संदर्भ